मुंबईतील चेंबूर या उपनगरात श्री हरिहरपुत्र भजन समाज (रजि) संस्थेच्या चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना २००२ साली करण्यात आली. या मंदिरामध्ये धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास आहे. 'शंकरालय' हे अर्थातच देवत्व आणि अध्यात्मिकता यासाठी सुपरिचित आहे. येथे चालणारे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे जनतेच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी नियमितपणे राबविले जातात. याच ठिकाणी संस्थेच्या वतीने दि. १ मे रोजी शंकरायलम 'स्थित दैवतांचा तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा महाकुंभाभिषेकम संस्थेचे आद्य जगद्गुरु बदरी शंकराचार्य श्रीविद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ श्री क्षेत्र शकटपुरम (कर्नाटक) यांच्या करकमलाद्वारे संपन्न होत आहे. या महा-कुंभाभिषेकमपूर्व जे धार्मिक विधी आहेत ते संस्थेचे अग्रगण्य पुरोहित श्री लक्ष्मीनारायणा सोमय्याजी, श्रृंगेरी आणि शकट पुरम मठाचे अस्थाना धर्मगुरु हे पार पाडतील. यापुर्वी २००२ आणि २०१४ साली महा-कुंभाभिषेकमाचे शंकरालयम येथे जगदगुरुंच्याच हस्ते आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. कोविडमुळे आणि त्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे हा महाकुंभाभिषेकम सोहळा लांबला होता. यंदा भारतातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाकुंभाभिषेकम सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शंकरालयमचे अध्यक्ष जयंत लापसिया यांनी दिली.
महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे धार्मिक विधी अग्रगण्य पुरोहित ब्रम्हश्री लक्ष्मीनारायणा सोमय्याजी आणि त्यांचे सहकारी पार पाडतील तर महाकुंभाभिषेकम पुर्व सोहळ्याचे धार्मिक रामासुब्बू आणि त्यांचे सहकारी पार पडतील. आयुष्यात एकदाच अशा घटनेचे साक्षी होण्याचे भाग्य लाभणाऱ्या अपुर्व अशा या धार्मिकसोहळ्याला भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आद्य श्री शंकराचार्यानी शंकरालयाला 'प्रति शबरीमाला' असे संबोधले असून तेथील धर्म सस्थ म्हणजेच श्री अय्यप्याची मूर्ती ही तितकीच सामर्थ्यवान असत्याचे प्रतिपादन केले आहे. ज्या भक्त-श्रद्धाळूंना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला सारख्या पवित्र स्थानी जाने शक्य होत नाही त्यांनी ‘शंकरालया’ला भेट देऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला आद्य श्री शंकराचार्य यांनी दिला आहे. अशी माहिती जयंत लापसिया यांनी दिली. या सोहळ्यात भारताचे अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी, , त्रावणकोर राजघराण्याच्या यूवराज्ञी आणि तिरुवनंतपुरमची महाराणी, श्रीमती थंब्रत्ती, भारताचे माजी शास्त्रीय सलागार डॉ. आर. चिदंबरम्, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी, श्री षण्मूरखानंद फाईन आर्टस आणि संगीत सभाचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, महिंद फायनान्स लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर , ऑटोटेक इंडस्ट्रिज-चेन्नईचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. जयरामन, अॅपकॉन्सचे उपाध्यक्ष डॉ. के. सुब्रमणियन, व्यवस्थापकीय संचालक एस. परमसिवन, रेडियन्स रिन्युएबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिकन संगमेश्वरम, अखिल भारतीय अय्याप्पा धर्म प्रचार सेवा समितीचे अध्यक्ष अय्यप्पा दास, रेडी टू वेट महिला संघटनेच्या पद्मा पिलुई, मेळ शान्ती समाजमचे अध्यक्ष शशी नम्बुथिरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
"शंकरालयम- श्री हरिहरपुत्र भजन समाज (रजि) यां मुंबईतील चेंबूर या उपनगरातील संस्थेच्या चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना २००२ साली करण्यात आली. या मंदिरामध्ये धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास आहे. ‘शंकरालय’ हे अर्थातच देवत्व आणि अध्यात्मिकता यासाठी सुपरिचित आहे. येथे चालणारे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे जनतेच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी नियमितपणे राबविले जातात.या मंदिरातील तळ मजल्यावर सुमारे ६ हजार चौरस फुटाचे सभागृह भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग अशा विविध कार्यक्रमांसाठी नेहमीच उप्लब्ध असते याशिवाय प्रासादातील अन्य मजल्यांवरील सभागृहांचा विनियोग सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना, धर्मादाय आणि एकूणच धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी मकरम उत्सव आयोजित करण्यात येतो. या उत्सवाद्वारे अय्यप्पाच्या भक्तांना तसेच या पंथातील विद्वान मान्यवरांना सन्मानित केले जाते. 'शबरीमाला वाचवा' या अभियानाशी निगडित अय्यप्पा दास, पद्मा पिल्लई, श्रीसाई दीपक, सिनू जोसेफ, अरविंद सुब्रमणियन, पंडलम राजघराणे आणि अलंगद योगम यांच्या कुटुंबियांना / सदस्यांना या उत्सवाला आमंत्रित करुन त्यांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला भक्त-भाविक आणि शुभेच्छुक बहुसंख्येने उपस्थित होते
या उपक्रमांमुळे ईश्वराचा शोध घेऊन त्याच्या सान्निध्यात राहू इच्छिणाऱ्या भक्त, साधक भाणि श्रद्धांळूना एक प्रकार मार्गदर्शन प्राप्त होत असते. सदाचरण, प्रामाणिकपणा आणि स्वःत्वाची जाणीव चा मार्गावर सलणान्या सामान्यजनांना 'शंकरालयम' हे एक आदर्श असे स्थान असल्याची अनुभुती समाजाला आली आहे. शंकरालयाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गणपती आणि श्री अजनेय (हनुमान) यांच्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात. या मूर्ती दाक्षिणात्य स्थापत्यशैलीला अनुसरून उलस प्रकारच्या पाषाणापासून कोरल्या गेल्या आहेत. या देवतांच्या दर्शनामुळेच येणाऱ्या भक्तांना प्रचंड उर्जा प्राप्त होऊन त्यांचा उत्साह वाढतो. शंकरालयाचा गाभारा दाक्षिणात्य मंदिर स्थापत्यशैलीधा उत्तम नमुना असून दर्शनाला येणाऱ्या भक्त-श्रध्दाळूना येथे नेहमीच सकारात्मक ऊर्जा आणि देवी शक्तीच्या कंपनांचा प्रभाव जाणवतो, अनुभवता येतो. शंकरालयामध्ये नित्यनेमाने वेदशास्त्रसंपदा अशा पुरोहितांकरवी पूजा-अर्चा पार पडत असते. गाभाऱ्यामधील श्री धर्म संरक्षक अय्यपाची मूर्ती ही पंचधातूपासून निर्मित केली आहे तर कामाक्षीदेवीची मूर्ती एका खास अशा पोषाणापासून निर्माण केली गेली आहे. या मंदिरातील तळ मजल्यावर सुमारे ६ हजार चौरस फुटाचे सभागृह भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, सत्संग अशा विविध कार्यक्रमांसाठी नेहमीच उप्लब्ध असते
शंकरालयामधील सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा आमचे आद्य जगद्गुरु बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ श्री क्षेत्र शकरपुरम (कर्नाटक) यांच्या करकमलांद्वारे संपना झाली. आद्य श्री शंकराचार्यानी शंकरालयाला 'प्रति शबरीमाला' असे संबोधले असून तेथील धर्म सस्थ म्हणजेच श्री अय्यप्याची मूर्ती ही तितकीच सामर्थ्यवान असत्याचे प्रतिपादन केले आहे. ज्या भक्त-श्रद्धाळूना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला सारख्या पवित्र स्थानी जाने शक्य होत नाही त्यांनी 'शंकरालया'ला भेट देऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला आद्य श्री शंकराचार्य यांनी दिला आहे. शंकरालय ही नोंदणीकत संस्था आहे आणि सार्वजनिक ट्रस्टच्या सर्व कायदे-कानून- नियमांचे कसोशीने पालन करत आली आहे. या संस्थेने व्यवस्थापन सुविध, सक्षम आणि जाणकार अशा विश्वस्तांच्या समूहाच्या हाती सुपूर्द केले असून या सर्व व्यक्तींच्या निष्ठा ईश्वरचरणी वाहिलेल्या असून सामाजिक आणि सांस्कृतिक सेवांकडे त्यांचा कल आहे हे सर्वश्रुत आहे.
शंकरालय वेळोवेळी समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. त्यासाठी अनेक विद्वान, आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती तसेच व्याख्याते, कलाकार आपल्या सेवा अर्पण करत असतात. या मंदिराचे देवत्व त्यांना त्यासाठी नेहमीच प्रवृत्त करत असते. शंकरालय हे समाजातील दुर्बल घटकांच्या अडी अडचणी, समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. वंचितांसाठी 'अन्नदान, त्यांच्या पाल्यांसाठी पाल्यांच्या शिक्षणासाठी साह्य आणि अन्य सामाजिक उपक्रम नित्यनेमाने राबविले जातात. संस्थेने समाजातील संबंधित घटकांना एका छत्राखाली एकत्र आणून 'शबरीमाला वाचवा' हे अभियान यशस्वीरित्या राबविले. हिंदू धर्म रक्षण हाच या अभियानामागचा प्रामाणिक उद्देश होता. आम्ही यामध्ये आघाडीवर राहून मुंबईतील अन्य समविचारी संस्थांना सोबत घेऊन हे साध्य करु शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. याशिवाय प्रासादातील अन्य मजल्यांवरील सभागृहांचा विनियोग सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामूहिक प्रार्थना, धर्मादाय आणि एकूणच धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. अशी माहिती यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आली.
0 टिप्पण्या