मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघातून महाविकास आघाडीमधील काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे.विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या उज्ज्व निकम यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. कायदेपंडित अशी ओळख असलेल्या उज्ज्वल निकम यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात काम केले आहे. ज्यात १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यासह मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला, खैरलांजी, सोनई येथील दलित अत्याचाराच्या खटल्यांमध्ये निकम यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. महाविकास आघाडीकडून दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भाजप वर्षा गायकवाड यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी देते याची उत्सुकता होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी दिली जाते की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते याबाबत चर्चा सुरू असताना आशिष शेलार यांचे नाव देखील समोर आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे म्हटले आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात संघातून रा. स्व. संघ- भाजपाने एड्वोकेट उज्ज्वल निकम यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाचे कट्टर विरोधी असलेल्या उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे. उज्ज्वल निकम हे रमाबाई नगर हत्याकांड खटल्यातील वकील होते. त्यांच्यामुळेच या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी मनोहर कदम यास कठोर शिक्षा होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे खैरर्लंजी हत्याकांड खटल्यात सुद्धा उज्ज्वल निकम यांनी अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत खटला चालविण्यास विरोध केला. यामुळे या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकली नाही.
पुण्यातील मोहासिन शेख या तरुण इंजींनियरची हिंदू राष्ट्र सेनेच्या जमावाने दिवसाढवळ्या हत्या केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांना नेमण्यात आले होते. निकम यांनी खटला निर्णायक वळणावर आला तेव्हा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला. परिणामी या हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. उज्ज्वल निकम यांचा हा इतिहास पाहता ते रा. स्व. संघाचे कट्टर सेवक आहेत हे उघड होते. यामुळे उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे.
या मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात एकूण 20 लाख मतदार आहेत. यात बौद्ध-दलित मतदार 2 लाख, मुस्लिम मतदार 6 लाख,ख्रिश्चन मतदार 1 लाख आहेत. या मतदार संघात उत्तर भारतीय तसेच मराठी मतदार मोठ्या संख्येत आहेत. मराठी मतदारांपैकी बहुसंख्य शिवसेना उबाठा पक्षाला मानणारे आहेत. म्हणजेच जवळपास 70 टक्के मतदार हे रा.स्व. संघ भाजपाच्या संविधान नष्ट करण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या मतदार संघात भाजप ने 4,86,672 मते (५४ % ) मिळवून विजय मिळवला होता तर काँग्रेस उमेदवारला 3,56,667 मते (४०%) मिळाली होती. वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अब्दुर रहमान यांना 33,703 (४%)मते मिळाली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत VBA च्या उमेदवाराला केवळ 21 हजार मते मिळाली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड या मागील 20 वर्षे आमदार आहेत. वैद्यकीय,उच्च,तंत्र शिक्षण खात्याच्या तसेच महिला विकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.त्या मानाने उज्ज्वल निकम हे राजकारणात पहिल्यांदाच उतरले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील असल्याने त्यांना जातीय समीकरणाचा फारसा फायदा मिळण्याची शक्यता नाही. त्यांची मुख्य मदार 1 लाख गुजराती-बनिया व काही प्रमाणात उत्तर भारतीय मतदारांवर आहे. ही समीकरणे पाहता येथे प्रा. वर्षा गायकवाड यांना अगदी सहजपणे विजय मिळेल अशी स्थिति आहे.
सुनील खोबरागडे
........................
आर.एस.एस. ने उज्ज्वल निकम यांना तिकिट देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड तर केली, पण त्यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कोर्टातील सुनावणीमध्ये या हल्ल्याशी संबंधीत आर्.एस्.एस् च्या अतिरेक्यांना वाचविण्याचे फार मोठे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले होते. त्यातील फक्त दोन मुद्दे खाली दिले आहेत.
१) पाकीस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली असल्याबद्दलची इत्तंभूत माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दि. १९ नोव्हें. २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. ही माहिती पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळविण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही व हा हल्ला होऊ दिला. त्यामागे त्यांचा नक्कीच काही अप्रामाणिक हेतु होता. भारत सरकारचे तत्कालीन कॅबिनेट सचिव के.एम्. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती त्यांच्या अहवालात वरील सर्व माहिती उघड झाली आहे. या अहवालातील प्रमुख मुद्दे इंडियन एक्स्प्रेस या प्रसिध्द इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन अंकात प्रसिध्द केले गेले आहेत (इंडियन एक्स्प्रेस दि. ११ डिेसेंबर २००८, दि. १५ डिसेंबर २००८ व दि. २६ डिसेंबर २००८). श्री. प्रभाकर अलोक यांनी ही माहिती संबंधीतांना वेळीच कळविली असती तर हा हल्ला झालाच नसता व शेकडो लोकांचे बळी गेले नसते. त्यामुळे या हल्ल्यात जे १६८ लोक मृत झाले व शेकडो जखमी झाले त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते कारण त्यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतील गोटातील आहेत.
२) हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हालव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हालव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही, कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे व तो आर्.एस्.एस्.शी संबंधीत आहे.
अशा प्रकारे उज्ज्वल निकम यांनी आर्.एस्.एस्.वर फार मोठे उपकार केले होते. त्यांना २०२४ च्या लोकसभेचे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे तिकीट देऊन आर्.एस्.एस्.ने त्यांच्या उपकाराची अंशत: फेड केली आहे. पण वरील सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांना निवडून देणे तर दूरच, उलट जनता त्यांच्या अटकेची मागणी करू लागेल.
- एस्.एम्. मुश्रीफ
- आय्.पी.एस्. (निवृत्त) माजी पोलीस महानिरीक्षक
0 टिप्पण्या