Top Post Ad

नानांच्या गाडीचा अपघात.... की घातपात... महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण

 


भंडार गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी या स्वगावी परत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये नानांच्या गाडीचा मागच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून कारवाईला सुरुवात केली. 

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना या निवडणुकीत नाना पटोले यांचाच दूसरा चेहरा मानला जात असून या निवडणुकीला नानांनी अधिकच गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांच्या प्रचार करीत दिवस रात्र एक केली आहे. अशातच कालच्या प्रचार सभा आटोपून नाना आपल्या ताफ्यासोबत रात्रीच्या सुमारास भंडारा येथून स्वगावी जायला निघाले. भंडाऱ्यावरुन पाच किलोमीटर अंतरावरील भीलवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली.  या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपात असल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. नाना पाटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारीला आपल्या अस्तित्वाची निवडणूक मानली असून त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढला आहे. यामुळे विरोधकांना याची धडकी भरली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत असून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेऊन गांभीर्याने विचारपूस सुरू केली आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत, - अतुल लोंढे,  मुख्य प्रवक्ते प्रदेश काँग्रेस

काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी येथे जाताना भिलेवाडा जवळ माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. ट्रकचालकाने मुद्दामहून माझ्या वाहनाला कट मारला. या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न? याची चौकशी आता पोलीस करतील.   आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम व परमेश्वराच्या कृपेने मी सुखरूप आहे. काळजी नसावी, -  नाना पटोले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com