Top Post Ad

अखेर... डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याणची उमेदवारी जाहीर


  लोकसभा उमेदवार यादीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केवळ एकच नाव जाहीर झाले आहे. तर यवतमाळ वाशिम आणि हिंगोली या दोन मतदारसंघातील उमेदवारांची स्वतंत्र घोषणा करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहिर होत नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध पाहता श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी लांबली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणची उमेदवारी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. 

श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबरीपणे उभा राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे- भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उमेदवार आहेत.

कल्याण डोंबिवलीची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे आगामी काळात काय होणार आता याची चर्चा कल्याण-डोंबीवलीत रंगली आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या लोकसभेच्या दोन्ही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस आहे. भाजपचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन आक्रमक आहेत. कल्याण डोंबिवलीची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. यासंबंधी एक बैठक देखील कल्याण पूर्वेत पार पडली. याला २४ तासही होत नाहीत, तोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महायुतील हा वाद शमणार की वाढणार, भाजप कार्यकर्ते अधिकृत घोषणेनंतर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची  बैठक पार पडली त्यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील  संमत केल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा मागण्यांचं सह्या केलेले एक निवेदनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे यांना सादर करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. कल्याण लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी कल्याण पूर्वेत ही भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांची निर्णय आणि चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. याआधी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो बॅनर न लावण्याचा निर्णय कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी यांनी घेतला होता. पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com