ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेचे विविध उपक्रम, जाहीर अवाहन, जनहितार्थ प्रसारित करण्यात येणारी फिल्म इ. ठाणे शहरातील स्थानिक ३२ वृत्तवाहिनी ( इन केवल वाहिनी) मार्फत प्रसिध्द करणेत येते. त्याबदल्यात या प्रत्येक वाहिनीला दरमहा २० हजार रुपये मानधन म्हणून कायम स्वरूपी देण्यात येते. या वृत्तवाहिन्या तलावपाळी, आंबेडकर रोड, टेंभो नाका, राबोडी, लोहा, कापुरबावडी नाका, इानपुर इंटर मानपायरिया, कोलशेत वायबोल, लोकमान्य नगर, पकड़ा नं.०३०४ किसन नगर नं. १ व २, उपवन, वसंतलिला, साकेत विकास कोमलेस परई पोलीस लाईन केसलमिल, बाळकुम वसंतविहार, गार्डन इस्टेट मनोरमा नगर, डोगरी पाङ, कासारवडवली पाचपाखाडी, शांतीनगर, पीली कोपरी, विजय नगर, आनंद नगर, राम मारुती रोड़, रावलेनगर, खोपट, मानिवडा, छब्बेया पार्कमा हिलाल चोकालो, ब्रम्हांड, वर्तकनगर, हनिनिवास, लोकपुरम हिरानंदानी विजय अनक्स, मनिषा नगर, डिसोजा वाडी, नौपाडा, भिवंडी जकात नाक्यापर्यंत प्रसारण होत असतात. अशी माहीती ठाणे महानगरपालिकेचे प्र.जन माहिती अधिकारी (जनसंपर्क) विकास मोरे यांनी दिली.
अशा तऱ्हेने लाडकी वृत्तवाहिनी योजना राबवणारी ठाणे महानगर पालिका ही स्वायंत्तसंस्था देशात पहिली आहे. मात्र या योजनेत काही ठरावीक वृ्त्तवाहिन्यांचाच समावेश करण्यात आला आहे. या योजनेचे निकष काय आहेत. कोणत्या वृत्तवाहिन्यांना ही योजना लागू पडते याबाबत मात्र कोणतीही माहिती तसेच ठाण्यात अनेक वृत्तवाहिन्या कार्यरत आहेत. मात्र त्यांना अद्यापही या योजनेपासून दूर ठेवण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यास पालिका अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.
0 टिप्पण्या