Top Post Ad

33 वर्षानंतर कोकणातील मतपत्रिकेमधून धनुष्यबाण गायब


 कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणी जनतेनेच शिवसेनेला नेहमीच उर्जा दिली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे समिकरणच झालं आहे. धनुष्यबाण म्हटला की शिवसेना असं गणित असताना लोकसभा निवडणुकीत कोकणात धनुष्यबाण दिसणार नसल्याने अनेक वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. युतीत ही जागा नेहमीच शिवसेनेनं लढवली. पण शिंदेंनी ही जागा भाजपला दिल्यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर लोकसभेच्या मतपत्रिकेवर भाजपचं चिन्ह दिसेल. तर ३३ वर्षांनंतर मतपत्रिकेवर शिवसेनेचं चिन्ह गायब झालेलं असेल. यंदा मतदारांना ईव्हीएमवर धनुष्यबाण दिसणार नाही.

शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण त्यांनी माघार घेतल्यानं भाजपचे नेते आणि मंत्री नारायण मंत्री यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
१९९६ च्या निवडणुकीपासून २००९ चा एकमेव अपवाद वगळता रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनं राखली. शिवसेनेचे उमेदवार इथून सातत्यानं विजयी होत राहिले. पण आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ही जागा सेनेकडून गेली आहे. या मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात १९८४ आणि १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचं चिन्ह मतपत्रिकेवर होतं. त्यावेळी श्रीधर नातू यांनी निवडणूक लढवली. दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. त्यावेळी सेना लोकसभेच्या रिंगणात नव्हती. १९९१ मध्ये सेना आणि भाजपचे उमेदवार युती म्हणून लोकसभा निवडणूक लढले होते.

स्वप्नांचं शहर आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख कधीकाळी गिरण्यांचं शहर अशी होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये लाखो कामगार करायचे. मुंबईत शिवसेना याच गिरणी कामगारांमध्ये रुजली. चाकरमान्यांच्या माध्यमातून शिवसेना कोकणापर्यंत पोहोचली. तिथेही सेनेची पाळमुळं घट्ट रुजली. कोकणी माणूस सेनेचा हक्काचा मतदार झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्गानं लोकसभा मतदारसंघात सेनेला कायम साथ दिली. पण आता शिंदेंनी हाच मतदारसंघ भाजपला दिल्याने कोकणातीलच नव्हे तर मुंबईतील कोकणी जनता देखील प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.


माजी मंत्री आणि बी.आर.एस.चे आमदार हरिश राव यांनी एनटीव्हीला मुलाखत दिली. राज्यातील तुमच्या पक्षाची अवस्था खराब आहे. त्यामुळे तुम्ही माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख केसीआर यांना सोडून जाल आणि एकनाथ शिंदे व्हाल अशी चर्चा होतेय. तसं खरंच होईल का, असा प्रश्न एका पत्रकारानं राव यांना विचारला. पत्रकाराचा प्रश्न ऐकताच राव भडकले. त्यांनी रागाच्या भरात शिवी हासडली. 'माझ्यासाठी माझं चारित्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. निष्ठेला माझ्या लेखी महत्त्व आहे. निष्ठा माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी २४ वर्षांपासून पक्षात आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी रेवंत रेड्डींनी पक्ष बदलला. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले. मी तसा नाही,'  एकनाथ शिंदेंसोबत होणारी तुलना हरिश राव यांना प्रचंड खटकली. त्यांनी यावरुन थेट इशाराच दिला. 'मला एकनाथ शिंदे म्हणालात तर चपलेनं मारेन,' अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी राव यांचा पारा चढला होता. पक्षाची साथ सोडणार नाही. माझ्या आयुष्यात निष्ठेना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं राव यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com