धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांती संदेश समाजात रुजवावा- शामसुदर महराज सोन्नर यांचे आवाहन.
प्रत्येक धर्मातील लोकांना आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. मलाही तो आहे. पण अलिकडे आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यापेक्षा इतर धर्माचा द्वेष समाजात पसरवला जात आहे. विद्वेषाचा हा वनवा कमी करण्याचे काम 'अमन कारवा' करील, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. तर सर्व धर्मातील धर्म गुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचा संदेश समाजात रुजवावे, असे ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांनी सांगितले.
पुणे येथील समता भूमी फुले वाडा येथून समाजात शांतीचा संदेश देण्यासाठी सर्धर्मीय 'अमन का कारवा' सुरू करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते मोहम्मद पैगंबर जयंतीपर्यंत हा कारवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यात जाणार आहे. मूल निवाशी मुस्लिम संघाचे अंजुम इनामदार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात लोकशाही आंदोलन, जमाते इस्लाम हिंद, जमियत उलेमा हिंद, युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा समुह महाराष्ट्र, मातंग एकता आंदोलन, स्वराज अभियान, दलित पँथर, नागरी हक्क सुरक्षा समिती, संदेश लॅब्ररी आदी संघटना सहभागी झाल्यात आहेत.
यावेळी बोलताना खासदार कोल्हे पुढे म्हणाले की, पवित्र विचारांनी समृध्द अशा समता भूमीत एका अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. समता भूमीतून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नमन करून "अमन का कारवाँ" या उपक्रमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात समतेचा संदेश दिला जाणार आहे, हे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार उपभोगत असताना देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. हा 'कारवा' ही जाणीव समाजातील लोकांना करून देईल, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला विविध धर्माचे धर्म गुरू उपस्थित होते. त्यांना उद्देशून ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर म्हणाले की, सर्वच धर्मात शांती, प्रेम, जिव्हाळ्याची शिकवण दिली आहे, परंतु काही लोक स्वार्थासाठी धार्मिक उन्माद करून इतर धर्माचा द्वेष समाजात पेरून सामाजिक ऐक्याला धोका निर्माण करीत आहेत. अशा वेळी सर्वच धर्मातील धर्म गुरूंनी आपल्या धर्मातील शांतीचा संदेश समाजात रुजायला हवा, असेही शामसुदर महराज सोन्नर म्हणाले.
यावेळी निर्भिड पत्रकार अश्विनी डोके, कारी इद्रिस अन्सारी, भंते बुद्धघोष, बिशप थॉमस डाबरे, अमनजित सिंग मोखा, अंजुम इनामदार, संतोष शिंदे, दत्ताभाऊ पोळ, जांबुवंत मनोहर, अमजद शेख, इब्राहिम ऐवतमाळ आदी मान्यवर उपस्थिती होते. कार्यक्रमचा सूत्रसंचालन लुकस केदारी यांनी केले तर आभार प्रकट प्रशांत कोठडीया यांनी केले
0 टिप्पण्या