आपल्या नद्या जीवनदायिनी आहेत है मान्य करणे आणि भारतीय उपखंडामध्ये नद्यांचे अनन्यसाधारण पर्यावरणीय, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे हे देखिल मान्य करणे. आपल्या जीवनात चेतना जगवणारी नद्यांमधिल शक्ती तसेच नदीविषयी वेद, उपनिषदे आणि पौराणिक, पारंपरिक कथा ह्या दोन्ही गोष्टीवर आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. भीमा ही द्वीपकल्पीय भारतातील एक अत्यंत महत्वाची नदी आहे आणि ती व तिच्या उपनद्याच्या तीरावर महत्वाची तीर्थक्षेत्रे आहेत.
नैसर्गिक जलचक्रात नद्यांची महत्त्वाची भूमिका असते. नद्यांचे अस्तित्व आणि त्यांच्यातले बदल हे पूरक्षेत्र, पाणलोट क्षेत्र, मानवी हस्तक्षेप यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते आणि आता पर्यावरण बदलामुळे हे अधिकच आव्हानात्मक बनले आहे. आपले जीवन नद्या आणि पाण्यावर अवलंबून आहे. नद्या आपल्याला पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी देतात. सुपीक माती देतात व त्यामुळे कोट्यवधी लोकांना अन्न मिळते. मानवी संस्कृतीत आदि काळापासून नद्यांनी अन्न, मनोरंजन आणि मानवाची सांस्कृतिक जडणघडण घडवलेली आहे. सांडपाणी, प्लास्टिक कचरा, शेतीतल्या रसायनांमधून निघणारे रोगजन्यक घटक, उद्योगातील रासायनिक कचरा, आणि प्रदूषणाचे इतर अनेक प्रकार यामुळे जगभरातील नद्या आणि महत्वाच्या जलस्रोतांना मानवाने प्रचंड प्रदूषित केले आहे. त्यामुळे पाण्यातले जीव, त्यांचे आरोग्य आणि जैवविविधतेत घट झाली आहे आणि मानवी आरोग्यावरही मोठे दुष्परिणाम होत आहेत.
आपण जलमार्ग वळवले आहेत, बदलले आहेत आणि बुजवलेसुद्धा आहेत. भूजल पाणी उपसा करण्यात आपण जगात प्रथम क्रमांकावर आहोत. पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्यांचा मूळ प्रवाह कमी करून आपण नदयांचे गटारांमध्ये रुपांतर केले आहे आणि आता तर त्यात स्वच्छ, वाहते पाणी उरलेलेच नाही. नदीचा पुरेसा स्वच्छ, वाहता प्रवाह हा नदीतल्या आणि नदीवर अवलंबून असलेल्या परिसंस्थेचा प्राण आहे, त्यांचे अस्तित्व टिकविणारा अत्यावश्यक भाग आहे हयावर वैज्ञानिक सहमती आहे. तरीही आपण तो संपवत आहोत. भीमेचे खोरे सर्वात जास्त धरणग्रस्त आहे आणि त्यामुळे खंडित अधिवास, कमी झालेली जैवविविधता आणि स्थानिक माशांची झपाट्याने घटलेली संख्या असे इथले चित्र आहे. माशांच्या तिलापिया आणि मांगूरसारख्या आक्रमक प्रजातींनी ताबा घेतलेला आहे. उजनी धरणाचे पाणी वापरणारे लोक गंभीर रोग, नापीक जमीन आणि उपजीविकेच्या नुकसानास सामोरे जात आहेत. प्रदूषित नद्यांमुळे मासेमारी समुदायाला उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. नदी दर वर्षी एक एक किलोमिटर मृत होत चालली आहे.
निसर्गाचे हक्क ओळखणे आणि विशेषतः या घोषणेत समाविष्ट असलेल्या नदीच्या हक्कांना मान्यता देणे, निसर्गाशी जोडले जाऊन जगणे आणि निसर्ग व मानवी हक्क या दोन्हींचा आदर राखणे या तत्त्वांवर आधारित नवीन कायदेशीर आणि सामाजिक धारणा तयार करता येतील. भीमा खोऱ्यातील सर्व समुदायांच्या तातडीच्या गरजा आणि त्यांनी दीर्घकाळ संरक्षित केलेल्या परिसंस्थेच्या संदर्भात हे विशेष महत्वाचे आहे.राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान, जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील प्राधिकरणाने (EPA 07 October 2016 अधिसूचना अंतर्गत) ध्येयदृष्टी सांगितलेली आहे. त्यामध्ये नदीचे भौगोलिक आणि पर्यावरणीय अस्तित्व आणि अखंडत्व टिकविण्यासाठी "अविरल धारा" (अखंड प्रवाह) आणि निर्मल धारा (स्वच्छ, अप्रदूषित प्रवाह) अशा सज्ञा वापरल्या आहेत
अविरल चंद्रभागा, तिच्या उपनद्या, एक ते सात प्रवाहक्रम नैसर्गिक पावसाळी ओढे, ओहोळ आणि भूजलाचा विसर्ग
1. भीमा खोयातील मुख्य पाणी पश्चिमेकडे वळवण्याबाबत खुल्या मंचावर चर्चा केली जाईल आणि त्यावर उपाय शोधले जातील.
2. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्वाची ठिकाणे असलेल्या उगम क्षेत्रातील वने, नदीचे उगमस्थान यांचे स्थानिक समुदायांसह संरक्षण केले जाईल.
3. पर्यावरण बदलाला तौड देणे पृष्ठभागावरील पाणी, नदीमुखातले पाणी आणि भूजल यांच्यासाठी जल आराखडा आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येतील. प्रदूषण रोखणे व कमी करणे, पाण्याच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे, पाण्यातल्या परिसंस्थेचे संरक्षण व सुधारणा आणि पूर व दुष्काळाचे परिणाम कमी करणे इ. या आराखड्याचे उद्देश असतील.
४. भीमा खोरे भूजलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. खोज्यातील भूजल व्यवस्थापनासाठी भूजल व्यवस्थापन कायद्यावर (2009) चर्चा, आवश्यक ते बदल आणि अंमलबजावणी केली जाईल. सर्व विद्यमान विहिरी, झरे आणि भूजल स्रोतांचे सीमांकन आणि अधिसूचन ( अधोरेखन ) केले जाईल. जलस्रोतांची माहिती सर्व हितसंबंधी गटांना पारदर्शकपणे आणि वेळेवर दिली जाईल.
५. भीमा खोज्यातील एकूण पाणीसाठा आणि विशेषतः सर्व धरणांमधली पाण्याची सद्यस्थिती समजून घेण्यात येईल आणि त्याचे न्याय्य व कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यात येईल.
६. उजनी धरणासाठी पाणी शिल्लक ठेवले जाईल आणि उजनीतून पाणी वळवणाऱ्या अयोग्य योजना शोधल्या जातील.
७. भीमा खोऱ्यातील धरणांमधून होणाऱ्या पूर व्यवस्थापनाची माहिती खोऱ्यातील सर्व नागरिकांना दिली जाईल. नियमावली सर्वांसाठी खुल्या असतील आणि पुरांबाबतचे धोरण व्यवस्थापन पारदर्शक आणि लोकतांत्रिक असेल
८. नदीच्या विभागांचा आदर
- अ ) निळा विभाग - नदीच्या दोन्ही काठामधील नैसर्गिक पूर आणि प्रवाहाची जागा
- आ) हिरवा विभाग- नदीच्या काठचा नैसर्गिक हिरवा पट्टा आणि त्यावर अवलंबून जैवविविधता
- इ) लाल विभाग - शंभर वर्षात येणारी पूर पातळी ( जी आता पर्यावरण बदलामुळे आणि प्रवाहातील अडथळ्यांमुळे वारंवार येते)
९. भीमा खोच्यातील नदीकाठ विकास प्रकल्पांचे पर्यावरण प्रभाव मूल्यांकन आणि जनसुनावणी प्रक्रिया करणे अनिवार्य असेल. कोणत्याही परिस्थितीत नदीची रुंदी कमी केली जाणार नाही, किना-यांचे काँक्रिटीकरण केले जाणार नाही किंवा नदीकाठच्या नैसर्गिक वनस्पती ( झाडी झाडोरा) तोडल्या, गाडल्या किंवा हलवल्या जाणार नाहीत.
१० . खोव्यातील सर्व धरणांच्या गाळाचे आणि व्यवस्थापनाचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यांचा कारभार पारदर्शक आणि उत्तरदायी केला जाईल. . दुष्काळाच्या काळात शहरांसह सर्व भागधारकांसह तूट सामूहिकरीत्या विभागली जाईल,
११ शहरी भाग पाणी वापर कार्यक्षमतेवर काम करतील आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करून पाण्याचे प्रमाण कमी करतील, प्रदूषण आणि पाणी गळतीवर सक्त नियोजन करतील, तसेच पाणी वापराचे दर आणि सांडपाणी निर्मिती आणि पुनरवापर, भूजल पुनर्भरण प्रोत्साहन, पावसाचे पाणी साठवण आणि पाणी बचत तंत्र याचे नियोजन आणि नियंत्रण
१२. एकवीरा मंदिर, भीमाशंकर, देहू, आळंदी, तुळापूर, धुळेश्वर, नीरा नरसिंहपूर, इत्यादी सांस्कृतिक केंद्रांना सामाजिक पर्यावरणीय कैद्रे म्हणून जाहीर केले जाईल आणि तिथे नदी पुनर्संचयन आणि पर्यावरण शिक्षणाची प्रात्यक्षिके आणि उदाहरणे उभी करण्यात येतील.
१३. सती आसरा, मावळ्या, म्हसोबा या सर्व सांस्कृतिक नदी देवताचे संरक्षण केले जाईल आणि त्यांच्या सभोवतालचा नदीकाठचा प्रदेश सांस्कृतिक अभयारण्य म्हणून घोषित केला जाईल. हयातून स्थानिक भावनांचा आदर राखला जाईल आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षणही होईल, १४. संगमक्षेत्र, देवमासा डोह, पक्षी तीर्थ यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या पूजनीय आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांची यादी करून त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जातील. निर्मल चंद्रभागा, आणि तिच्या प्रदूषणमुक्त उपनद्या तसेच ओढे, ओहोळ प्रवाह, नैसर्गिक पावसाळी नाले आणि भूजलाचा विसर्ग
• भीमा खोज्यातील प्रदूषणाचा तेथील सर्व लोकांच्या जीवनावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळांवर नागरिकांच्या गटांकडून देखरेख ठेवण्यात येईल. सर्व एसटीपी आणि ईटीपीची देखरेख करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी बाह्यतज्ज्ञ आणि हितसंबंधी गटांच्या देखरेख समित्या असतील. सर्व विद्यमान एसटीपी आणि ईटीपीच्या कामांचे मूल्यमापन करून त्यांचे उत्तरदायित्व तपासले आणि ठरवले जाईल.
• भीमा खोच्यातील सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणीवापराच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शिका तयार करण्यात येईल.
* मानवासाठी आणि नदीसाठी हानिकारक असलेल्या जैविक आणि अजैविक प्रदूषकांचा बंदोबस्त करणे
* पाण्याची गळती शोधून त्यावर उपाय करणे
* औद्योगिक, कृषी, घरगुती, इतर कोणल्याही प्रदूषणाचे प्राथमिक स्रोत ओळखणे
*सरकार, शैली, उद्योग, रुग्णालये किंवा खाजगी संस्था यांना उत्तरदायी ठरवणे
* प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी व्यवस्था तयार करणे
• सर्व शहरे आणि गावे ड्रेनेज लाईनने जोडली जातील आणि ड्रेनेज लाईन नद्या, उपनद्या आणि ओढ्यांपासून दूर असतील.
• ग्रीन स्टॉर्मवॉटर (मौसमी पावसाचा नैसर्गिक निचरा) उपक्रम संपूर्ण खोन्यात राबविण्यात येईल. सर्व सरकारी इमारती आणि शाळांमध्ये जलपुनर्भरण, विहिरी पुनर्भरण, हरित छते, पावसाचे पाणी साठवण इ. उपक्रम करून वादळी पावसाचा नैसर्गिक निचरा करण्यात येईल
• दुष्काळाच्या काळात पाण्याची कपात शहरांसह सर्व हितसंबंधी गटांसाठी करण्यात येईल. शहरी भाग पाणीवापर कार्यक्षमतेने करतील त्यासाठी पाण्याचा वापर कमी करणे, गळती कमी करणे, सांडपाणी कमी करणे, दुर्बिण-दरांचा वापर इ. उपाययोजना केल्या जातील. तसेच भूजल पुनर्भरण, पावसाचे पाणी साठवण आणि पाणी बचत तंत्रांना प्रोत्साहन देण्यात येईल.
नदी प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी योजना राबवित असताना जर पहिले तर आपल्या कडे तंत्रद्यान, निधी व काम करणारी यंत्रणा पण आहे पण यश येत नाही. यासाठी लोकसहभाग वा जनसहभाग घेतला जात नाही किंवा त्याची कमतरता दिसुन येते. यासाठी जनजागृती किंवा लोकशिक्षण यावर भर दिला पाहिजे. यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, अभियंते, राजकीय संघटना, सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या व सामान्य जनता हयांनी एकत्र येउन काम केले तर हे आव्हान सहज रित्या पेलवले जाईल.
0 टिप्पण्या