Top Post Ad

इतके गट असलेला समाज कसा सत्तेत येईल ?


काँग्रेसला समर्थ पर्याय उभा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी नंतर सतत काँग्रेसच्या वळचणीलाच राहिली. त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला, पण पक्षाची वाढ मात्र खुंटली. त्यातच नेतृत्वाच्या वादातून पक्षात फूट पडली, गटातटांचे राजकारण फोफावले. बाबासाहेबांच्या स्वप्नातला पक्ष कुणा एका समाजापुरता नव्हता, पण तरीही तसेच चित्र तयार झाले.  या देशातील कष्टक्रयांचा, कामगारांचा आणि सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करणारा असा रिपब्लिकन पक्ष असावा, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर नागपूरमध्ये 3 ऑक्टोबर 1957 रोजी पक्षाची स्थापना झाली. त्यामध्ये बी.सी.कांबळे, राजाभाऊ खोब्रागडे, आर.डी. भंडारे, आवळे असे नेते त्यावेळी होते. पण 3 ऑक्टोबर 1958 ला रिपब्लिकन पक्षात फूट पडली. दुरुस्त आणि नादुरुस्त असे दोन गट पडले. आणि त्यावेळेपासून रिपब्लिकन पक्ष एकत्र येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांना हवा असणारा पक्ष उभा राहात नाही. ही खंत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, प्रत्येकजण प्रयत्न करतो आहोत, परंतु या गटबाजीमुळे एक ताकदवान असा रिपब्लिकन पक्ष अद्याप कुणाला उभा करता येत नाही. सगळे नेते काही एकत्र येत नाहीत. 1984 ला कांशिराम यांनी बहुजन समाज पक्ष स्थापन केला. उत्तर प्रदेशमध्ये आपली सत्ता आणली. सुरुवातीला त्यांची समाजवादी पक्षाबरोबर युती होती, काँग्रेसशी समझोता केला होता. नंतर मायावती स्वत:च्या ताकदीवर मुख्यमंत्री झाल्या.  महाराष्ट्रात 13-14 टक्के दलित असलो तरी त्यातले  8-9 टक्केच आंबेडकरवादी आहोत. त्यामुळे रि.पा.ई.ला महाराष्ट्रात यश मिळत नाही. 9 टक्क्यांत कुणाला निवडून आणायचे व कुणाला पराभूत करायचे हे  रि.पा.ई. ठरवू शकते, परंतु तेवढ्या बळावर निवडून येऊ शकत नाही.  

१) बहुजन समाज पार्टी
२) भारिप-बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाड़ी)
३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 
४) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) 
५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरीपा) 
६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) 
७) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)
८) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)
९) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 
१०) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)
११) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (दिलीप गायकवाड)
१२) युथ रिपब्लिकन (भाई संगारे )
१३) पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे)
१४) रिपब्लीकन प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडिया
१५) रिपब्लीकन बहुजन सेना
१६) रिपब्लीकन सेना
१७) संविधानवादी रिपब्लिकन पक्ष
१८) पँथरस रिपब्लीकन पार्टी
१९) प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी
२१) रिपब्लिकन जनशक्ति पक्ष
२२) डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी
२३) बहुजन रिपब्लीकन एकता पक्ष
२४) बहुजन रिपब्लीकन सोशालिष्ट पार्टी
२५) भारतीय रिपब्लीकन पक्ष
२६) आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी
२७) स्वाभीमानी रिपब्लीकन पक्ष (मनोज नि ससारे)
२८) डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया
२९) डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टी
३०) नवभारत डेमोक्रेटीक पार्टी
३१) नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
३२) प्रबुध्द भारत प्रजासत्ताक पार्टी
३३) बहुजन महासंघ पक्ष
३४) बहुजन विकास आघाडी
३५) भारतीय बहुजन क्रांती दल
३६) आजाद समाज पार्टी
३७) पी पी आई
३८) बहुजन वॉलिटीयर फोर्स
३९) अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित कि समाजसंघ, लातूर
४०) बहुजन मुक्ती पार्टी
४१) ब्लॅक पँथर
४२) आंबेडकरी पार्टी ऑफ इंडिया
४३) अम्बेडकराईट्स पार्टी ऑफ इंडिया ( विजय मानकर )
४४) भारतीय दलीत कोब्रा
४५) भीम टायगर युवा सेना...
४६) भीमसेना
४७) भीम टाइगर सेना
४८) भीम आर्मी
49) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ऐक्यवादी) 

ज्या समाजात इतके गट आहेत तो समाज कधीच सत्तेत येऊ शकत नाही ! त्यामुळे यावर विचार करणे महत्वाचे आहे. अन्यथा आपण फक्त सत्तेचे स्वप्न बघु शकतो सत्तेत येऊ शकत नाही. यातले काही पक्ष तर फक्त आपल्याच लोकांवर टीका टिप्पणी साठी बनलेत. समजून घ्या आपली लढाई बाहेरच्यांशी नसून आपापल्या मध्येच लागलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण होत, ते म्हणजे शिक्षण घ्या. पण दुसरं स्वप्न अजून अपूर्णच आहे. बाबासाहेब म्हणाले होते शासनकर्ती जमात बना, पण आपली जमात आपल्यातच लढते आहे, ही एक शोकांतिका आहे. एकाच समाजात इतके गट आहेत तो समाज कसा सत्तेत येईल ? हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. कारण कितीही कठीण वाटणारी गोष्ट असो ती एकीने सोपी होत असते. हे अगदी लहान मुले ही हे जाणतात. मग एकी का नको ? हा प्रश्न प्रत्येकाला ही तितकाच भेडसावणारा असला पाहिजे. त्यातूनच एकीची भावना निर्माण होऊन त्यासाठी पर्यंत होतील आणि तेच महत्वाचे ठरू शकेल.

सुरुवातीचे दोन पक्ष सोडले तर सध्या कोणत्याच पक्षाला या निवडणुकीत काही स्थान आहे असे दिसत नाही. प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या वळचणीला जाऊन आपली पोळी भाजण्याची धडपड करत आहे. अशा वेळी ऐक्याची हाक देणारे नेहमीचे प्यादे या सर्व गटा-तटांना आपली स्वतंत्र आघाडी निर्माण करण्यासाठी का प्रवृत्त करीत नाही हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. आज रिपब्लिकन जनतेने आपल्या एवढ्या पक्षांना, संस्था-संघटनांना एकत्र करून एखादी रिपब्लिकन आघाडी केली तरी निश्चितच  आपण काही जागा निवडून आणू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com