नवी मुंबईतील पत्रकारांना सिडको निर्मित घरांच्या लॉटरीमध्ये सुलभतेने घरे मिळावीत म्हणून सिडकोकडून आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.परंतु हे आरक्षण पत्रकारांनासाठी केवळ मृगजळ ठरले असून मागील पाच वर्षामध्ये विविध सोडतीमध्ये पत्रकारांसाठी आरक्षित ठेवलेल्या एकूण घरांच्या केवळ १० टक्के सदनिका प्रत्यक्षात पत्रकारांच्या पदरामध्ये पडल्या असून उर्वरीत ९० टक्के सदनिका ज्या पत्रकारांना मिळणे हा त्यांचा हक्क होता, त्या सदनिका पत्रकारांच्या हातून सूटून गेल्या आहेत.माहितीच्या अधिकारामधून सदर सांख्यकीय माहिती बाहेर आली असून पत्रकारांकडून वारेमाप प्रसिद्धी करून घेणारे सिडको महामंडळ हे प्रत्यक्षात पत्रकारांना सुलभतेने घरे मिळावित या बाबत मात्र उदासिन असून सिडकोने घरांचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात पत्रकारांच्या हातात बाबाजीचा ठूल्लू दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारण २०१९ नंतर जाहीर झालेल्या मास हौसिग योजनेमधून पत्रकांराना त्यांच्या राखीव कोट्यातून एकही सदनिका मिळालेली नाही.
अनेक वेळा या संबंधी पत्रकारांनी सिडकोचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक तसेच जनसंपर्क विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या.शेवटी यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी पत्रकारांना घरे मिळण्याची प्रक्रिया सूलभ करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा आता जानेवारी २४ नंतर निघणाऱ्या सोडतीमध्ये म्हाडाच्या धर्तीवर पत्रकार कोट्यातून अर्ज करणाऱ्या अर्जदारांची पत्रकार असल्याची पात्रता सिडको स्तरावरच निश्चित असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे छोटी वर्तमानपत्रे,साप्ताहिके व फ्रि लॉन्स काम करणारे पत्रकार यांच्यावर या पुढे अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आहे.
सद्या सिडको महागृहनिर्माण योजना २०२४ चे अर्ज भरण्यांची मुदत २७ मार्च अखेर पर्यंत चालू आहे.या योजनेत पत्रकांरासाठी एकूण ३१ सदनिकां राखीव असून पत्रकारांना याचा पूर्ण लाभ सिडकोने पत्रकारांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा पत्रकार वर्गाकडून होत आहे
सुभाष बसवेकर
माहिती अधिकार कार्यकर्ता
पनवेल - 9223516920
0 टिप्पण्या