Top Post Ad

महाराष्ट्रातला मीडिया किती बढिया....


 महाराष्ट्र शासन मीडियात काम करणाऱ्यांना अधिस्वीकृती पत्र देते ज्याचा मीडियात काम करणाऱ्यांना खूप उपयोग होतो पण ज्यांना अधिस्वीकृती पत्र मिळते किंवा मिळालेले असते त्यातले बहुतांश या अत्यंत प्रभावी अशा अधिस्वीकृती पत्राचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर करतात थोडक्यात या अधिस्वकृती पत्राचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी दुरुपयोग करवून घेतात अशी माझी पक्की माहिती आहे तशी माझी खात्री आहे. हे अधिस्वीकृती पत्र मीडियात खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांना मिळावे त्यावर शासनाने किंवा शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने एक समिती नेमलेली असते ज्यात मीडियात काम करणाऱ्यांचा समावेश केलेला असतो, हि समिती डोळ्यात तेल घालून मीडियात काम करणाऱ्या नेमक्या मंडळींना असे शासकीय अधिस्वीकृती पत्र देण्याची छान भूमिका बजावते पण गम्मत अशी कि अलीकडे काही वर्षात हि समिती राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या बैठका आयोजित करतांना दिसते, हा खर्चिक प्रकार आधी कधीही अस्तित्वात नव्हता पण एका चलाख वार्ताहराचे डोके चालले आणि त्यानंतर हे सतत घडत आले, घडत असते म्हणजे अगदी गोव्यात जाऊन मुक्काम करून देखील हि मंडळी लावाजम्यासहित सतत विविध ठिकाणी त्यांच्या मिटींग्स घेऊन मोकळी होते. पुढली मीटिंग थेट थायलंड मध्ये जाऊन बँकॉकला घेण्यात यावी अशी मागणी देखील अलीकडे एक समिती सदस्य उदय तानपाठक यांनी केल्याचे समजते....

अधिस्वीकृती पत्र समितीच्या बैठकी राज्यात विविध ठिकाणी घेण्याचे नेमके प्रयोजन असे कि एकतर सरकारी खर्चाने फिरायला मिळते आणि स्थानिकांकडून छान लाड देखील करवून घेतले जातात पण त्यातला सुप्त मुद्दा असा कि या समिती मध्ये काम करणाऱ्या काहींना पत्रकार म्हणून विधान परिषदेवर जाण्याची अतिशय तीव्र इच्छा आहे जी इच्छा एस एम देशमुख सारख्या आणखीही काही मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांची आहे. आम्हा पत्रकारांचा मीडियाचा राज्याच्या कानाकोपऱ्यात कसा मोठा प्रचंड दबदबा आहे विशेषतः हे सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या काही नेत्यांना दाखवून द्यायचे आहे असते आणि त्यातूनच मोठ्या खुबीने सरकारी खर्चाने यापद्धतीने दौरे काढले जात असल्याची माझी माहिती आहे, मीडियाच्या या अफलातून डोक्याला दाद द्यायलाच हवी. अर्थात जे कपिल पाटील पद्धतीचे काही पत्रकार आजवर सभागृहात आमदार म्हणून गेले किंवा दर्डा घराण्याने जशी अनेकदा केवळ मीडियाच्या भरवशावर सत्ता मिळविली, त्यांनी सत्तेचा किंवा सभागृहाचा केवळ आर्थिक किंवा व्यक्तिगत प्रचंड फायदा करून घेतला, पत्रकारितेच्या मीडियाच्या भरवशावर सभागृहात जाणारे असे अनेक महाभाग आजवर आमदार खासदार मंत्री झालेले आहेत पण या मंडळींनी आपल्या या पदाचा आपल्याच क्षेत्रात काम करणार्याचा कधीही कवडीचीही फायदा करवून दिलेला नाही किंबहुना मीडियातले जे सत्तेत किंवा सभागृहात आले त्यानंतर ते आपणहून मुद्दाम मीडियाला टाळण्यात मीडियाकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत होते, माननीय राज्यपालांच्या यादीत नाव आणून आमदार  होण्याचा काहींचा मनसुबा आहे त्यात वाईट असे काहीही नाही फक्त नेमणुकीनंतर मीडियाकडे दुर्लक्ष आणि व्यक्तिगत आर्थिक फायद्यांकडे लक्ष हे दर्डा पद्धतीचे दरोडा घालण्याचे कसब अमलात न आणता जर पत्रकार बांधवांचे भले करण्यात ते सरसावले तर पुण्य त्यांच्याच पदरात पडेल...

आम्ही मीडियातले नेते आहोत मान्यवर आहोत आम्ही तुम्हाला क्षणार्धात संपवू शकतो हे सांगण्याची मीडियात काम करण्याऱ्या बहुतेकांची विशेषतः सत्ते सभोवताली येऊन पत्रकारिता करणाऱ्यांची किंवा वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या वार्ताहरांची संपादकांची ती कायम सतत धडपड असते तसा त्यांचा सततचा आटापिटा असल्याने, कायम पुढे पुढे करून या पद्धतीची भ्रष्ट मंडळी व्यक्तिगत हलकट दुकानदारी करण्यात उभे आयुष्य खर्ची घालते अर्थात त्यात जे हाताच्या बोटावर काम करणारे मृणाल नानिवडेकर किरण तारे दिवंगत सतीश नांदगावकर शुभांगी खापरे पद्धतीचे काही निस्वार्थी सुसंस्कृत देखील आहेत पण अपवादानेच, बहुतेकांचा कल फक्त आणि फक्त दलाली करून पैसे मिळविण्याकडे असतो हीच वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यातले सारेच दरोडा घालणारे दर्डा नसतील पण इतरही जे पदरात पाडून घेतात ते बघून मन अस्वस्थ होते, मीडिया किती आणि कशी नीच आहे असते त्याची प्रचिती येते. आता हे लिखाण मी ऐन निवडणुकांच्या तोंडावर यासाठी केले कि मीडियातल्या बहुतेकांची भूमिका खाऊन पिऊन मोकळे, पद्धतीची असते म्हणजे हि मीडिया ज्यांचे खाते ज्यांच्या भरवंशावर प्रचंड संपत्ती जमा करते, नेमकी गरज असतांना हीच खादाड मीडिया ज्यांनी खाऊ घातले त्यांच्यावरच उलटून मोकळी होते थोडक्यात पाक विचारांचे जे मुसलमान असतात हुबेहूब त्याच पद्धतीने वागून बेईमान होते, नेमके हेच मी यापुढे अजिबात खपवून घेणार नाही. ज्या मीडियाने विविध काम करवून घेत मलिद्यावर मोठा ताव मारलेला आहे त्यांची यादी माहिती माझ्याकडे आहे, या दलाल मीडिया मंडळींनी जर हिंदुत्व विरोधात भूमिका घेतली मग तो हिंदू विचारांचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा असेल, तर गाठ थेट माझ्याशी आहे, मीडियाने एकतर गु खायचा नसतो पण ज्यांना सतत सत्तेतल्यांची विष्ठा चघळण्यात रस असतो त्यांनी निदान ज्यांची विष्ठा चघळली त्यांच्याशी प्रामाणिक असावे. मीडियातले बहुतेक दबाव तंत्राचा किंवा पित पत्रकारितेचा आधार घेत खाजगी मलिद्याची कामे विशेषतः शासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा सत्तेतल्या मंडळींकडून करवून घेतात, या पद्धतीच्या मीडियाला अजिबात भीक घालू नये किंवा थेट मला माहिती देऊन मोकळे व्हावे, पुढल्या क्षणी या हलकटांना सरळ करण्याची जबाबदारी माझी, अजिबात टेन्शन घेऊ नये, विनंती. मीडियाची घाण विषय येथेच संपत नाही...

: हेमंत जोशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com