Top Post Ad

महिला दिन की मैला दिन ।

८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येईल. अनेक ठिकाणी महिलांच्या प्रगतीच्या ओव्या गाईल्या जातील. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारावर भाषणे झाडली जातील. मात्र, महिलांच्या समस्येच्या मुळाशी, त्यांच्या प्रगतीला बाधक ठरणारी प्रवृत्ती कोणती? त्या प्रवृत्तीला जबाबदार कोण ? याचा शोध घेऊन त्यांच्या मुळाशी जाऊन त्या मुळांचा नायनाट केला पाहिजे. परंतु महिला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी, आत्मसन्मानासाठी, खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून हल्लाबोल करीत नाही. त्यामुळे त्यांचे क्षणोक्षणी शोषण करीत असतो. त्यांना सातत्याने नागवे करीत असतो. त्यांची क्षणा क्षणाला अबू लुटीत असतो. त्यांच्या सर्वांगावर हात फिरवित फिरवित त्यांना संपूर्णतः विवस्त्र करून त्यांची आग शमवित असतो. त्यांच्या केसांपासून ते अगदी नखापर्यंत त्यांना बेचेन करावयास लावतो आणि महिला बिचाऱ्या भोळ्या भाबड्या, भावनिकतेच्या मूर्त्या !!! मग, काय हा मनू पुरता हैवान झालेला असल्याने महिलांच्या सर्वांगाचे लचके तोडण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यात महिला ही आपले सर्वस्व त्याच्या हवाली करीत असतात आणि तो मग पुरता बेभान होऊन मनमुरादपणे आपले काम साधीत असतो. 

अशी कित्येक दशके हा अन्याय - अत्याचार, सुरूच आहे. तरीही स्वतःला उच्चशिक्षित असणाऱ्या. समजणाऱ्या महिला अगदी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सभापती, पोलीस महासंचालक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, वैज्ञानिक, कर्नल, महापौर, नगरसेविका, नायिका आदी विविध पदाचा लाभ घेत असतील त्या त्या क्षेत्रांमध्ये ठसा उमटवत असतील तरी त्यांचे शोषण सर्व स्तरावर सुरूच आहे. त्यांना भोगण्याची आणि उपभोगण्याची संधी हा मनू सोडत नाही. तरीदेखील या मनूला मुठमाती देण्यासाठी सर्व महिला आपल्या अस्मितेसाठी, अन् अस्तित्वासाठी पेटत नाही. याउलर किलेक वर्षे अन्याय अत्याचाराला निमूटपणे गिळत असतात. त्यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचाराचा कळस झाला असून त्याला महाकळसाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तरीदेखील सामान्य महिलेपासून उच्चविभूषित महिलांनी आपल्या देहप्रदर्शनाला आळा घालून, नग्नतेचे दर्शन न घडविता आपल्यावर होणाऱ्या अन्याय - अत्याचाराला गाडण्यासाठी, असहाय्य वेदना संपविण्यासाठी एक माणूस म्हणून आपल्याला ही एक मन आहे. भावना आहे. विचार, आचार, कल्पना, लाजलज्जा आहे. भूक आहे. इज्जत आहे. हसू आणि आसू आहे. आपण आई, बहिण, पत्नी, आजी, पणजी, राणी - महाराणी आहोत. तसेच आपण कर्तव्यदक्ष , कठोर , मानी - स्वाभिमानी आहोत. असा आपला ऐतिहासिक वारसा असताना आपल्यावर एवढी वर्षे अन्याय अत्याचार का? ही जोखड का? याचा विचार करण्याची खरी गरज आहे.

जेणेकरून अजून ही महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. त्याचे ताजे, ज्वलंत उदाहरण शनि शिंगणापूरचे देता येईल. अशा कित्येक ठिकाणी महिलांना मज्जाव आहे. मात्र, उच्चविभूषित महिला या सामान्य महिलांसारख्या जोखडात अडकून राहिल्या आहेत. त्या अजूनही रुढी, परंपरा, रितीभातीच्या चक्रव्युहात अडकून पडल्या आहेत. अशा या उच्चविभूषित महिलांची कर्मकहाणी !  तर सर्वसामान्य महिलांची काय? अवस्था असेल. त्यासाठी आदर्श माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झलकारीबाई अशा दिग्गज मातांच्या, महामानवांच्या, संतांच्या पावलावर पाऊल ठेवूनचालण्याचा निश्चय केला पाहिजे. ज्यामुळे महिलांना आपल्या गुलामीला, दास्याला , अन्याय - अत्याचाराला नरकयातनेला, भोगवादाला जबाबदार कोण ? याचा शोध घेता येईल. त्याकरिता महिलांनी मनुस्मृती, वेद, उपनिषदे, स्मृतिपुराणे, आदी ग्रंथांचे वाचन करीत असताना महाला ज्योतीबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, झलकारीबाई, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता रमाई यांचे सह छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, विश्ववंदनीय गौतम बुद्ध आदी महामानवांचे, महापुरूषांचे, महामानवांचे, चरित्र वाचावयास हवे . त्यांच्या विचारांचे, आदर्शाचे पालन केले पाहिजे. ज्यावेळेस महिला संशोधनपर अभ्यास करतील . प्रत्येक विषयाचा तुलनामक, चिकित्सकपणे अभ्यास करतील, त्यावेळेस त्यांना आपल्या तुलामीच्या, दास्याच्या, अन्याय - अत्याचाराच्या मुळाशी कोण? याचा शोध लागेल. त्या शोधामध्ये    मनू जीयंत आहे. तोच क्षणोक्षणी महिलांना जोखडात टाकतोय याचा शोध अन् बोध लागेल.

 त्यांच्या शरीराला भोगण्या पलिकडे ही त्यांच्याकडूनं ही उच्च प्रतीचे सद्गुण घेण्यासारखे आहे. कारण महिला ही फार सोशिक, भावनिक, सौंदर्यवान, कर्तव्यदक्ष, आदर्शशील, त्यागशील, अशा गुणाची मूर्ती आहे. तेव्हा त्या मूर्तीचे सौंदर्य जोपासण्याचे काम महिलांसह पुरुषांनी सांभळले पाहिजे आणि महिला दिन साजरा   करीत असताना पुरुषांनी ही त्यांना क्षणोक्षणी साथ दिली पाहिजे. आणि महिलांवर, लहानं मुलीवर, पोटातील अर्भकावर ते अगदी महिलांच्या शवावर राजरोसपणे अन्याय अत्याचार होत असतील तर अशा नराधमांना जेरबंद केले पाहिजे. पण हे करीत असताना त्या घटनेच्या मुळाशी जाऊन सत्याचां शोध घेऊन त्या घटनेस जबाबदार असणाऱ्या पिपासू वृत्तीच्या हैवानाला कठोर शिक्षा दिली पाहिजे. याच करिता तमाम महिला मंडळीनी आपल्या संस्था, मंडळे, शासकीय, निमशासकीये, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, विविध क्षेत्रात विविध पदावर कार्यरत असताना अगदी सांघिक भावनेने लढा दिला पाहिजे. 

मात्र कुणाही पुरुषांवर खोटे-नाटे, सूडापोटी, द्वेषापोटी वा मत्सरापोटी तसेच अभिषापोटी अन्याय अत्याचार न करता एक आव्हान स्वीकारून पुरुषांचा महिलंप्रति पाहण्याचा मानसिक दृष्टीकोण आहे. त्यांच्या पाहण्याच्या मनोवृत्तीला शह देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढाकार घेत असताना घरापासून दारापर्यंत सर्व स्तरातून सुरुवातीला तीव्र विरोध होणारच, याच विरोधाला आपले सर्वस्व मानून महिला या नुसत्या भोगण्याच्या वस्तू नसून त्यांनाही पुरुषांसारखे मन, भावना, विचार आहेत.  त्यासाठी सर्व महिला संघटनांनी रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गांचा वापर करीत अन्याय अत्याचार करणाऱ्या मनूला गाडले पाहिजे. ही खूणगाठ मनाशी बांधून महिला खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून सर्व महामानवांचा, राष्ट्रमातांचा अभ्यास करून त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आपले शिक्षण, ध्येय पूर्ण करून एक उदात्त ध्येय ऊराशी बाळगून अन्याय-अत्याचा राची जोखड उध्वस्त करण्यासाठी उतरल्यास खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केल्या सारखा होईल, अन्यथा तो प्रत्येक दिन मैला दिन... (कचऱ्या सारखा) होईल, राहिल हे शहाण्यास सांगणे न लगे!!!

सुरेश गायकवाड ९२२४२५०८७३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com