Top Post Ad

लडाखवासियांच्या न्याय्य मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषण


  


 समर्पित सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक  लडाखवासियांच्या न्याय्य मागण्या व पर्यावरणासाठी करीत असलेल्या उपोषण(क्लायमेट फास्ट) आंदोलनास  मुंबईतून समर्थन मिळत आहे. यासाठी वांगचुक यांनी देशातील प्रमुख शहरांतील लोकांनासुद्धा आवाहन केले आहे.⁠ त्यानुसार आपापल्या शहरांमध्ये या चळवळीशी अधिकाधिक लोक जोडले जात आहेत.

⁠लडाखवासियांच्या न्याय्य मागण्या, पर्यावरणाचे जतन, लोकशाही  मुलतत्वांचे रक्षण व पालन तसेच राजकीय नैतिकतेचा आग्रह यांबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मुंबईतही आंदोलन केले जाणार आहे. ⁠रविवार, १७ मार्च रोजी स. १० वा. आझाद मैदान, मुंबई येथे समर्थनार्थ उपोषण/आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये ही कृती आयोजित करण्यात मदत करायची असेल किंवा तुमच्या संस्थेचे नाव या वर्णनात जोडायचे असेल, तर फ्रेंडस् ऑफ लडाख आणि निसर्ग या  गृपशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.⁠ समाज माध्यमे आणि पारंपारिक मीडियावर आमच्या या आंदोलनास सहकार्य करावी असे आवाहन.'फ्रेंडस् ऑफ लडाख आणि निसर्ग' कृती दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/wangchuksworld

*संपर्क - दिलीप जैन  9819347791



_सोनम वांगचुक, ज्यांच्यावर 'थ्री इडियट' सिनेमामधील आमिर खानची 'रँचो' भूमिका साकारली गेलीय, आज त्यांनीच "माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे” असं खर्‍याखुर्‍या रँचोसारखा गंभीर आरोप करत, लडाखमधील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी व जम्मू-कश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर लडाखला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण सुरु केलंय... *एकूणच लडाखमधील नाजूक परिस्थिती व भारत सरकारचं त्याबाबतचं सततचं अक्षम्य दुर्लक्ष, सीमेवरील चीनच्या घातकी हालचाली व पंजाब-हरियाणा शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे; तसेच, लष्करातील 'अग्निपथावरील अग्निवीर' योजनेमुळे, लष्कराच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊन, जी भयंकर विस्फोटक व संवेदनशील स्थिती चीन-पाकिस्तानला लागून असलेल्या सरहद्दीवर निर्माण झालीय...* त्याविषयी 'सोनम वांगचुक' पोटतिडकीनं जे बोलतायत, कृपया ते प्रत्येक 'जातिवंत देशभक्ता'नं (भाजपाई-संघीयांसारख्या बेगडी-बनावट देशप्रेमींनी नव्हे) ऐकावंच!_

_...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com