Top Post Ad

मेट्रो स्थानकांवरील गर्दीच्या नियंत्रणासाठी सुनिलकुमार यांचे व्यापक व्यवस्थापन मॉडेल


   मुंबई मेट्रोच्या अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांवरील प्रचंड गर्दी पाहता ही येणाऱ्या काळात जीवघेणी ठरू शकते. या गर्दीमुळे प्रवाशांना वेळेत इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परंतु सद्यस्थितीत यावर कोणताही पर्याय नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र या गर्दीच्या नियंत्रणाकरीता एक प्रभावी व्यापक व्यवस्थापन मॉडेल तयार करण्यात आले आहे. या गर्दीच्या व्यवस्थापन आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्याकरिता  तिसऱ्या पर्यायाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव आज आयटी अभियंता सुनीलकुमार शिंदे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सादर केला. केवळ या स्थानकांवरच नव्हे तर मुंबईतील इतर प्रमुख गर्दीची स्थानके आणि देशभरातील प्रमुख शहरांमधील गर्दी कमी करण्याच्या क्षमतेवर भर देऊन त्यांनी या योजनेचे प्राथमिक तपशील अर्थात व्यापक गर्दी व्यवस्थापन मॉडेल प्रसिद्धी माध्यमांसमोर सादर केले.

गर्दीच्या वेळेत, पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि मध्य रेल्वेच्या घाटकोपर मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागतो. लांबच लांब रांगा, विलंब आणि गर्दीमुळे नेहमीच गैरसोय होत आहे.  या गर्दीचे व्यवस्थित नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी या दोन स्थानकांच्या विस्तारासह तिसऱ्या नवीन प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव शिंदे यांनी मांडला आहे. वेस्टर्न लाईनवर अंधेरी स्थानकावर प्रस्तावित तिसरा प्लॅटफॉर्म बांधला जाऊ शकतो, जो विद्यमान जागेच्या मर्यादेत विस्तारेल. तसेच घाटकोपर स्थानकावरील तिसरा प्लॅटफॉर्म गजबजलेल्या स्टेशन रोडवर बांधता येईल, जो प्रवाशांसाठी प्रवेश आणि कनेक्टिव्हिटीची प्रक्रिया अधिक सुलभ करेल, असे मत  शिंदे यांनी व्यक्त केले. 

यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मची रचना अशा प्रकारे केली आहे की, दूतर्फा प्रवेश असल्याने प्रवासी एका बाजुने बाहेर येतात. जे अंधेरी पूर्व आणि पश्चिम आणि अंधेरी पश्चिम मार्गाला थेट जोडतात. त्यानंतरच काही वेळाने दूसरा दरवाजा उघडेल. जिथून प्रवासी सहजपणे आत चढू शकतील, ज्यामुळे हे व्यवस्थापन सोपे होईल. प्रत्येक मजल्यावर तिकीट काउंटरसह इतर व्यवस्था तुम्ही पाहू शकता.  तळाशी वेस्टर्न लाईन आहे आणि प्रवाशांना अंधेरीच्या वेस्टर्न लाईन प्लॅटफॉर्मवर सहज पोहोचता येईल, अशी व्यवस्था असेल. म्हणजेच, टियर १ सारख्या अत्यंत गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर, प्लॅटफॉर्म १ आणि २ च्या आसपास किंवा वरील तिसरा प्लॅटफॉर्म तयार केला जाऊ शकतो. याचे संपूर्ण प्रस्तावित तिसऱ्या प्लॅटफॉर्मचे पोटोटाइप 30 मॉडेल सुनीलकुमार शिंदे  यांनी बनवले आहे. जे या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.  हा प्रस्ताव एमएमआरडीएसह संबंधित विभाग आणि स्टेकहोल्डर्सपर्यंत पोहोचवण्यात आला असून तो वैयक्तिकरित्या सादर करण्यासाठी प्रत्यक्ष भेट होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही शिंदे म्हणाले.  या डिझाइन मॉडेलचे तपशीलवार वर्णन 'सोलापूर मेट्रो प्रस्ताव" या YouTube चॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचेही शिंदे यांनी शेवटी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com