Top Post Ad

लकडावाला बिल्डरच्या फसवणूकीविरोधात वडाळ्यातील झोपडीधारकांचा तीव्र संताप


  लकडावाला हटाव, गणेशनगर बचावचा नारा देत लवकरच एसआरए प्राधिकरणावर मोर्चा

संपुर्ण खोट्या कागदपत्राच्या आधारे मुंबईतील वडाळा (पूर्व) येथील गणेशनगर या झोपडपट्टीचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकास करण्यासाठी में. लकडावाला हाऊसिंग प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला असून याबाबत प्राधिकरणाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गणेशनगर येथील रहिवाशांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती सुशांत जोशी, गणेश पाटील, देविदास पाजणे आणि प्रमोद सावंत यांनी केली आहे. लकडावाला बिल्डरने या अगोदर देखील सन 2000 साली गणेशनगर झोपडपट्टी चा विकास करण्यासाठी प्रस्ताव दिला होता परंतु 10 ते 11 वर्षे त्यांनी काहीच काम न केल्यामुळे दिनांक - 31/3/2012 रोजी एस . आर. ए. कडून त्यांना काढून टाकण्यात आले होते. त्याचबरोबर वडाळ्याच्या आसपासच्या सोसायटी मधून दिनांक - 20/8/2022 रोजी एस.आर.ए.ने स्वतःहून लकडावाला याला काढून टाकले आहे. अशा बिल्डरकडून विकास कसा  होईल असा प्रश्न प्रमोद सावंत यांनी केला. आज मराठी पत्रकार संघ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत लकडावाला बिल्डरच्या संपूर्ण गैरकारभाराबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. 

लकडावाला बिल्डरनी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी एस. आर. ए. चे प्रकल्प हाती घेतले आहेत त्या ठिकाणी झोपडी धाराकांची फसवणूकच केलेली असून, त्यांच्यावर 420, 465, 467, 468, 471, 120 (ब), 34 या कालमान्वये दखलपात्र गुन्हयांची नोंद आहे. अश्या बिल्डरचा प्रस्ताव एस. आर. ए. ने स्वीकारलाच कसा हा प्रश्न झोपडिधारक विचारत आहेत. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे आता गणेशनगर झोपडपट्टी चा प्रस्ताव दाखल करण्यासाठी सुद्धा त्यांनी खोटी कागदपत्रे देऊन फसवणूकच केली आहे. त्याचा पुरावा म्हणजे लकडावाला बिल्डरला नियुक्त करण्यासाठी रविवार दिनांक १३/०८/२०२३ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात अली होती, त्यातही उपस्थिती कमी होती. असे असताना एस.आर.ए. च्या कार्यालयात सोसायटी व बिल्डरने दिलेल्या पत्रामध्ये दिनांक ५/६/२०२२ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याचे व त्यामध्ये लकडावाला बिल्डरला विकासक म्हणून नियुक्त केल्याची खोटी कागदपत्रे सादर केली असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. 

 न झालेल्या सभेच्या खोट्या कागदपत्रांमध्ये बऱ्याच झोपडीधारकांच्या खोट्या सह्या तर आहेतच परंतु अत्यंत भयानक बाब म्हणजे जे झोपडीधारक दिनांक ५/६/२०२२ पूर्वीच मेलेले आहेत अश्या मयत लोकांच्या देखील सह्या या सभेच्या मिनिट्सवर आहेत. अश्याप्रकारे सुरुवातीपासूनच फसवणूक करणारा विकासक भविष्यात   फार मोठी फसवणूक करू शकतो त्यामुळे असा विकासक  नको अशी तीव्र भावना परिसरातील नागरिकांची बनली आहे. सुमारे 2००० झोपडीधारकांची संख्या असलेल्या या परिसरातील  अधिकाधिक नागरिकांनी लकडावाला हटावसाठी राबवलेल्या सह्यांच्या मोहिमेत सहभाग नोंदवला असून, ही मोहिम अधिक तीव्र करण्यासाठी आणि भविष्यातील या फसवणुकीपासून झोपडपट्टीचा बचाव करण्यासाठी " गणेशनगर बचाव संघर्ष समिती " निर्माण करण्यात आली आहे. अशा कुचकामी व खोटारड्या लकडावाला बिल्डरचा प्रस्ताव एस, आर, ए, ने ताबडतोब फेटाळावा अन्यथा एस.आर.ए. च्या कार्यालयासमोर लवकरच झोपडीधारकांकडून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com