Top Post Ad

नागरिकांच्या पालिकेकडून अपेक्षा व सर्वसमावेशक विकासाबाबत मुंबई विकास समितीचा अहवाल


  एक कोटी चाळीस लाख नागरिकांना सेवा देणाऱ्या व पंच्चावन्न हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल, कामकाजाबद्दल, मिळणाऱ्या सेवेबद्दल, विविध आश्वासनांबद्दल व विकासाबद्दल, एक ग्राहक नागरिक' या नजरेतून पाहात मुंबई विकास समिती व राष्ट्रीय मतदाता मंच यांतील विविध विषयांचा अभ्यास असणाऱ्या तज्ञ गटाने अहवाल तयार केला आहे.  अभियंते, वास्तुविशारद, उद्‌योजक, व्यावसायिक सल्लागार, आणि नागरी समस्येतील जाणकारांचा यामध्ये सहभाग आहे. मुंबईच्या विकास प्रक्रियेतील "धोरणात्मक रणनीती व प्रत्यक्षातील वास्तव', या बाबींवर आधारित "नागरिकांच्या मनपाकडून अपेक्षा व सर्वसमावेशक विकास" हया संकल्पनेसह व सूचनांना प्राधान्य या अहवालात देण्यात आले आहे. 

सदर अहवालामध्ये मनपातील ८०% कामाचा भार उचलणाऱ्या अभियांत्रिकी विभागातील प्रणालीवर यानिमित्ताने सुधारणांची आवश्यकता समितीने सुचवली आहे. प्रकल्पात होणारा विलंब, प्रशासनाच्या कारभारात त्यासाठी लागणारा कालावधी, किमान ३० वर्षे मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना असलेला प्रदीर्घ अनुभव हा नेहमीच केवळ ३ वर्षे कालावधीकरिता बाहेरुन येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा उजवा ठरतो, याबाबतीत अभियंत्यांकडे तांत्रिक ज्ञान, निर्णयक्षमता यांचा विचार करता, अधिक अधिकारांसह जबाबदारी सोपविल्यास, तसेच प्रशासनाच्या प्रणालीत (system) / रचनेत काही बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय होणे व सर्वसामान्य जनतेस योग्य त्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक वाटत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी समितीची निरिक्षणे व त्यावर उपायही पुढे सुचविण्यात आले आहेत .  सामाजिक जीवनाशी संबंधित असलेल्या, विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या "जनचेतना, जनकर्तव्य, सामाजिक जबाबदारी, वाहतुक नियम व नियमन, नैसर्गिक संपतीचा वापर, स्वच्छता, अतिक्रमण रोखणे, परिसर स्वच्छता, वेळेवर करभरणी असे विविध विषय हाताळणाऱ्या संस्था, कार्यकर्ते जे मुंबईत उपलब्ध आहेत त्यांचा सदुपयोग करून घेणे गरजेचे आहे. तेव्हा दोन्ही बाजूंकडून ' हक्क आणि कर्तव्य' यांचे पालन अनुशासनपूर्वक व्हावे अशी अपेक्षा या अहवालाद्वारे समितीने व्यक्त केली आहे. 

आपली मुंबई, प्रत्येकासाठी एक स्वप्ननगरीय देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली कायम मिरविणारी, माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक, धार्मिक, संशोधन, समाजकारण-राजकारण आदी विविध स्तरावर आणि समाज जीवनाशी संबंधित असणाऱ्या संस्था, व्यक्ती-प्रवृत्ती अशी ओळख असणारी "आपली मुंबई अर्थातच आपली स्वप्ने, गरजा, आशा-आकांक्षा साकार करते, देशभरातून येणाऱ्या व स्थानिक मुंबईकर, यांना विविध सेवा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिका (मनपा) या स्थानिक संस्येवर अवलंबून राहणे अनिवार्य असते.  - नंदकुमार साळवी  (प्रवक्ता: मुबई विकास समिती)

मनपाने " काय आश्वासित नियोजन केले व प्रत्यक्ष काय लोकार्पित केले?" याचा एक धावता आढावा म्हणून सदर अहवालाकडे पाहता येईल. मनपा कारभाराचे मुल्यांकन व नवनिर्वाचित नगरसेवक आणि मनपाकडून पुढील पाच वर्षातील अपेक्षांचा पाढा या अहवालात समाविष्ट आहे. प्रशासनाच्या बाबतीत विचार करता, परिणामकारक अपेक्षा- पूर्तता करण्याकरीता आवश्यक ते मनुष्यबळ व प्रशासन प्रणालीत काही मुलभूत सुधारणाही आवश्यक ठरतात. त्या दृष्टीने या अहवालाकडे पहावे असे आवाहन याद्वारे करतो - डॉ.प्रसाद आकेरकर (सदस्य: मुंबई विकास समिती) टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com