ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी केली दादर येथे निदर्शने.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते ऍड. असीम सरोदे व विश्वभर चौधरी यांच्यावर पुण्यामध्ये दिनांक : 8/2/24 रोजी भाजप च्या गुंडाकडून भ्याड हल्ला करण्यात आला. हा हल्ला संविधानिक बाजू मंडणाऱ्या एका पत्रकारा वरील व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या हल्ल्याचा तसेच भाजपाच्या गुंडाशाही चा निषेध करण्यासाठी आंबेडकरी संघटनाच्या वतीने दिनांक 12/2/24 रोजी सायंकाळी 5.00 वाजता दादर स्टेशनच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी हल्लेखोरांवर कलम 307 नुसार गुन्हे दाखल करावेत तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपस्थितानी केली. आंदोलकांनी यावेळी हल्लेखोरांच्या विरोधात व सरकारच्या विरोधात घोषणानी परिसर दनानुन सोडला. या आंदोलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते दिवाकर दळवी, बांधिलकी सामाजिक संघटनेचे प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे, रुपेश पुरळकर, नागेश पेडणेकर, प्रदीप शिंदे, साळवे, मनोहर सकपाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे नांदाकिशोर तळाशीकर, विजय परब इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या