कोलशेत येथे कल्पतरू पार्कसिटीमध्ये सुमारे २०.५ एकरवर तयार करण्यात आलेले ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेकरांना भुषणावह ठरणार आहे. या उद्यानात सुमारे ३५०० विविध प्रकारची झाडे आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यात, मुघल, चिनी, मोरोक्कन आणि जपानी अशा चार पद्धतीचे संकल्पनेवर आधारित उद्यानेही आहेत. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगींग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटींग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट या सुविधाही या उद्यानात आहेत, गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. ठाणेकरांसाठी है उद्यान खुले करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिली.
याच परिसरात मोठे अॅम्पी थिएटर, कॅफेटेरीया, प्रसाधनगृहे यांची व्यवस्था आहे. शाळांच्या सहली, पर्यावरणविषयक सहलींचे आयोजन करण्यासाठी या उद्यानाचा उपयोग करता येणार आहे. आयोजित करता येऊ शकतील. या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे जतन करण्यात आली असून नवीन वृक्षारोपणही करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने सुविधा भूखंड विकास प्रकल्पांअंतर्गत हे उद्यान विकसित करून घेतले आहे. शहरातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ठाणे शहरातील हेरिटेज ट्री व दुर्मिळ वृक्ष यांची माहिती व्हावी यासाठी 'स्पीकिंग ट्री' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्पीकिंग ट्री म्हणजे सेंट्रल पार्कमधील 10 हेरिटेज ट्री (50 वर्षावरील) व दुर्मिळ वृक्षांवर व्हिडीओ क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. सदर क्यू आर कोड स्मार्ट फोनद्वारे स्कॅन केल्यानंतर त्या झाडांची माहिती देणारा व्हिडीओ सादर होईल व झाड जणू प्रत्यक्षात आपल्याशीच बोलत आहे याची अनुभूती नागरिकांना अनुभवता येईल.
माजिवडा मानपाडा प्रभागसमितीमध्ये कल्पतरू या विकासकाने ठाणे ग्रँड सेंट्रल पार्क विकसित केले आहे. सेंट्रल पार्क मधील वड, बारतोंडी, भोकर, जांभूळ, कडूनिंब, कापूर, शिरीष, ताम्हण, करंज व कैलासपती इत्यादी वृक्षांवर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने सेंट्रलपार्कमधील इतर वृक्षांवर सुद्धा क्यू आर कोड लावण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक वृक्षांची माहिती इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये नागरिकांना वाचायला मिळणार असल्याची माहिती उपायुक्त (उद्याने) मिताली संचेती यांनी दिली. स्पीकिंग ट्रीच्या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना हेरिटेज ट्री व दुर्मिळ वृक्षांची माहिती मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे. तसेच वृक्षांचे मानवी जीवनातील महत्व पटवून देण्यासाठी दर रविवारी हेरिटेज ट्री टेल आयोजित करण्यात येणार आहे. या ट्रेलसाठी एकूण 10 ठिकाणांवरील 23 वृक्ष निवडली जाणार असून सदर वृक्षांनाही क्यू आर कोड बसविण्यात येत आहेत.
सोमवारी पत्रकारांना याबाबत माहिती देण्यात आली त्यावेळी, माजी नगरसेवक संजय भौईर, उपायुक्त (उद्यान) मिताली संचेती आदी उपस्थित होते.
ग्रॅण्ड सेंट्रल पार्कची वैशिष्टये
• २०.५ एकरवर पार्कवरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान
• उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्ती जातींचा अधिवास.
• ३५०० पेक्षा जास्त झाडे
• न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा
• चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा
• मोरोक्कन, चिनी, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित संकल्पना उद्याने
• सर्वात मोठी खुली आणि हरित जागा
• सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध मनोरंजनाच्या संधी
• एक ट्रीहाऊस, तीन एकरांचा विस्तीर्ण तलाव, स्केटिंग पार्क यांचा समावेश
लोकार्पणानंतर ठाणेकरांनी या ठाणे ग्रँड सेंट्रलपार्कला भेट द्यावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
थीमपार्क घोटाळ्याचे काय झाले ?
0 टिप्पण्या