Top Post Ad

लोकशाहीचा जागर करण्यासाठी प्रा.मधु दंडवते शताब्दी सोहळ्याचे आयोजन:

 


 सध्या देशाची वाटचाल दहशतवादाकडे सुरु असल्याने देशासह जनतेचे भविष्य अंधारमय होण्याची दाट शक्यता असल्याने येथील जनतेला जागे करण्यासाठी लोकशाहीचा जागर म्हणून प्रा. मधु दंडवतेचा शताब्दी सोहळा २१ जानेवारीला २०२४ रोजी मुंबईच्या दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयाजवळ पार पडणार आहे

 या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी.जी. परिख उपस्थित राहणार आहेत.:  प्रा.मधु दंडवते यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवताना लोकशाही तत्व सोडले नाही. त्यामुळे विविध लोकशाहीवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जे.के. एनसीचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे, राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव , एम महासचिव सिताराम , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , सीपीआय महासचिव डी.राजा ,एम.पी. आर एसपी आई एम के प्रेम रामचंद्रन, रालोद अध्यक्ष जयंत , खासदार दानिश , जनता दल युनायटेडचे माजी खासदार केसी त्यागी, आमदार जयंत पाटील आदी मान्यवर तसेच प्रा. मधू दंडवते  जन्मशताब्दी समारोह समितीचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी खासदार हुसेन दलवाई उपस्थित राहणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com