मुंबई शहरात देशाच्या कानाकोपरातून वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गोर गरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठया प्रमाणात के.ई.एम रुग्णालय, टाटा हॉस्पिटल तसेच वाडिया हॉस्पिटलमध्ये येत असतात. परंतु रुग्णालयाच्या आसपास राहण्याची सोय नसल्यामुळे फूटपाथवर झोपण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांचा सुरक्षितेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. या करीता के.ई.एम रुग्णालय व त्याचा आजूबाजूचा रुग्णालय परिसर 'हेल्थ कॉरिडॉर' म्हणून जाहिर करावा, अशी मागणी माजी आमदार प्रमोद शांताराम जठार यांनी केली. याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.
या संदर्भात 26 जानेवारी रोजी रुग्णलय परिसर येथे लाक्षणिक उपोषण करण्याचे पत्र महानगरपालिका तसेच पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यावर दि. 25 जानेवारी.रोजी के.ई.एम रुग्णालयाचे अधिष्ठाता सौ. रावत व भोईवाडा पोलिस स्टेशन निरीक्षक यांनी संयुक्त बैठक आयोजित करून मराठा आरक्षण मोर्चाचा पार्श्वभूमीवर उपोषण स्थगित करावे व आपल्या मागणीकरिता मा. अति. आयुक्त यांच्याकडे बैठक लावतो. असे आश्वासन दिले
त्यानंतर मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे 30 जानेवारी रोजी पत्राव्दारे के.ई.एम रुग्णालय व त्याचा आजूबाजूचा रुग्णालय परिसर 'हेल्थ कॉरिडॉर' म्हणून जाहिर करावा, अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावण्याकरिता पत्र देतो असे सांगितले,
कोकणातील शेतकरीचा प्रमुख उत्पादन असलेला काजू ला रूपये 200/- काजू हमीभाव जाहिर करावा अशी मागणी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली असून त्यासंदर्भात कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या