कॉंग्रेसने रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने कॉंग्रेसवर चांगलेच तोंडसूख घेतले. काँग्रेसने राम मंदिर कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार काँग्रेसचा भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माला असलेला विरोध दर्शवतो. अशी जळजळीत टीका भाजपच्या वतीने करण्यात आली. तर भाजपसह विविध संघटनांनी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. यावर काँग्रेसनेही मंदिरात जायला एखाद्या राजकीय पक्षाच्या निमंत्रणाची गरज आहे का? असा प्रश्न भाजपला केल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच राम मंदिरातीस कार्यक्रमासाठी तारीख निवडली गेली नाही तर निवडणूक पाहून तारीख निवडली गेली म्हणत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकाही केली. त्याचप्रमाणे हिंदू धर्मात चार शंकराचार्यांना मोठे महत्व आहे. हे चारही शंकराचार्य अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला जाणार नाहीत. या कार्यक्रमात धर्मशास्त्राला महत्व देण्यात आले नाही. अर्धवट मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करता येत नाही असे चारही पीठांच्या शंकराचार्यांनी सांगितले. हा कार्यक्रम धार्मिक नसून पुर्णपणे राजकिय आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परीषद घेत कॉंग्रेसचे राष्ट्रीय़ प्रवक्ते पवन खेडा आणि सुप्रिया श्रीणेत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
यावेळी बोलताना पवन खेडा म्हणाले की, एका व्यक्तीच्या राजकीय नाटकासाठी आम्ही आमच्या आस्थेचा खेळ मांडु देणार नाही. प्रभु श्रीराम अयोध्येत आले तेव्हा संपूर्ण प्रजा त्यांच्या स्वागतासाठी आली होती मात्र इथे व्हीआयपी लोकांची रांग लावली आहे आणि सामान्य माणसाला दुर ठेवण्यात आले आहे. हिंदू धर्मातील सर्व शंकराचार्यांची इच्छा होती की रामनवमीला विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मात्र केवळ एका व्यक्तीसाठी या कार्यक्रमाचे राजकीयीकरण केले जात आहे. कॅमेऱ्याची फौज घेऊन प्राणप्रतिष्ठा करणारे तुम्ही कोण आहात असा सणसणाटी टोलाही त्यांनी लगावला. काही जाहिरातींचा संदर्भ देते पवल खेडा म्हणाले की, प्रभू श्रीराम लोकांना चांगल्या मार्गावर चालायला शिकवतात, असे सर्वांना वाटते मात्र आता देवालाच बोट धरून मंदिरात नेले जात आहे. निवडणूक आयोग, माध्यम संस्था, महालेखापाल निरीक्षक अशा महत्वाच्या संस्थांवर एकच व्यक्ती नियंत्रण ठेवतात. आता ते धार्मिक क्षेत्रातही नियंत्रण ठेवू पाहत आहेत. धर्म हा व्यक्तिगत आस्थेचा विषय आहे. मात्र त्याचे राजकीयीकरण केले जात आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सुप्रिया श्रीणेत म्हणाल्या की, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी १५ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात जाणार आहेत. धर्म हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे काँग्रेसबद्दल बोलणाऱ्या लोकांनी सर्व शंकराचार्य का या कार्यक्रमाला जाणार नाही आहेत, याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान चारही शंकराचार्य या कार्यक्रमाला जाणार नाहीत याबाबत स्वामी निश्चलानंद म्हणाले, पंतप्रधान मोदी हे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला स्पर्श करणार आणि मी तिथं उभं राहून टाळ्या वाजवणार? हे शिष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा स्थितीत तो मर्यादा पुरुषोत्तम यांच्या प्रतिष्ठेचा भंग झाल्याचे साक्षीदार होऊ शकत नाही. राम मंदिरातील मूर्तीचा अभिषेक हा धर्मग्रंथानुसारच झाला पाहिजे जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे, धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे, ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये, असेही शंकराचार्यांनी सूचित केले. प्रभू राम यांची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा होत नाही. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणे योग्य नाही. प्राणप्रतिष्ठापणेसाठी मुहूर्ताकडे लक्ष ठेवणे आवश्यक होते. कोणी मूर्तीला स्पर्श करावा, कोणी करू नये, कोणी प्रतिष्ठापणा करावी, कोणी करू नये याकडे लक्ष देणे आवश्यक होते. स्कंद पुराणानुसार, देवी-देवतांच्या मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा केल्यास त्यामध्ये तेज येईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठापणा न केल्यास, शास्त्रांचे पालन न केल्यास देवांच्या मूर्तींमधील तेज कमी होते. शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा न केल्यास भूत-प्रेत, पिशाच्च या मूर्त्यांमध्ये वास करतात आणि संपूर्ण परिसराला, क्षेत्राला उद्धवस्त करतात, असेही शंकराचार्य यांनी म्हटले. प्राणप्रतिष्ठापणा, मूर्ती प्रतिष्ठापणा हा काही खेळ नाही. यामध्ये दर्शन, व्यवहार आणि विज्ञान तीन हे एक तत्व आहे. पंतप्रधान मोदीं यांनी दोन वर्षानंतरही राम मंदिराचे उद्घाटन केले असते तरी आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापणा होणार की नाही असाच प्रश्न विचारला असता, असेही त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त
अयोध्येत जिथे राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर होतं. उत्खनन केलं तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशिद आणि राम मंदिर यांच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. बाबरी मशिदीला पाच एकर जागा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तर आता रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. या वादात आपण पडून समाजात फूट पाडणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यात पडलो नाही. पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात बुद्ध मंदिराचे अवशेष सापडले आहेत. अडीच हजार वर्षे या गोष्टीला झाली. त्यानंतर राम मंदिर त्या ठिकाणी आलं. आता अयोध्येत गौतम बुद्धांचं मंदिर व्हावं यासाठी आपण प्रयत्न करु - रामदास आठवलें, केंद्रीय मंत्री
0 टिप्पण्या