Top Post Ad

सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन


 मनोज जरांगे यांनी आंतरवाली गावातून उपोषण करुन मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुंबईत धडकताच शिंदे सरकारला त्यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला. नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही ही मागणी सरकारने मान्य केली. कुणबी नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि शपथपत्र घेऊन सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. 

आता सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला केले. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. उद्या, 29 जानेवारी रोजी जरांगे रायगडावर जाणार आहेत तसेच परवा रायगडावर दर्शन घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हणाले. 

तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणार नाही असे फडणवीस म्हणाले. यावर आंदोलन सुरुच राहणार, असे जरांगे म्हणाले. आता लाख मराठाऐवजी लाख ओबीसी, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली होती. यावर उत्तर देताना दोन्ही आम्हीच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.  तसेच भुजबळांसह वकील गुणरत्न सदावर्ते यांचाही खरपूर  समाचार घेताना ते म्हणाले,  'वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका' 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com