पत्रकार दिनेश मराठे यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आप्पा पेडसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून हा सत्कार घेण्यात आला आहे. कारण डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत सारख्या वृत्तपत्रात समाजाचे दुःख मांडून अन्यायाला वाचा फोडली होती. त्यांचा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो या संदेशाची आठवण करून दिली. ही बाब सर्व पत्रकारांनी ध्यानात ठेवून पत्रकारिता करावी अशी सूचना प्रकाश कदम यांनी केली.
रिपाइं आठवले गटाच्या वतीने पत्रकार दिनेश मराठे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला रिपाइं दक्षिण मुंबई अध्यक्ष संजय पवार, सरचिटणीस शिरिष चिखलकर, उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष व कामगार नेते प्रकाश कदम, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, यांचेसह रिपाई पदाधिकारी डी.जी. पडवळ, उषाताई वाघमारे आदी मान्यवर तसेच पत्रकार जॅक, सलिम खतिब, रवी भोजने, उदय कासारे, केतन आदी पत्रकारही उपस्थित होते.
यावेळी संजय पवार म्हणाले की, आज ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी पत्रकार दिनेश मराठेचा सत्कार करीत असताना पक्षाच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी जवळपास ५ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ना. रामदास आठवलेंच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना पत्रकार दिनेश मराठे म्हणाले, जीवनात यश येते. तसेच अपयशही. त्याची जाणीव ठेवून मी पत्रकारिता करीत असतो. आणि माझा हा सत्कार केला जातोय तो माझ्या सर्व सहकारी पत्रकार मित्रांचा ही आहे. इथे युट्यूब, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकेत काम करणाऱ्या संपादकाचा, पत्रकारांचाही सत्कार करण्यात केला जावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ह्याच सोहळ्याचे औचित्य साधून रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन शिरिष चिखलकर यांनी केले. अशी माहिती आमचे पत्रकार सुरेश गायकवाड यांनी दिली.
0 टिप्पण्या