महासंमेलानाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष म्हणून पद्मश्री, पद्भषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) आणि सरबानंद सोनोवल (केंद्रीय आयुष मंत्री), श्रीपाद नाईक (केंद्रीय मंत्री) डॉ. महेंद्र मुंजापरा (केंद्रीय आयुष राज्यमंत्री) यांच्यासह पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार), श्रीमती आरती अहुजा (सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ लेबर अॅण्ड एम्प्लॉयमेंट, भारत सरकार), वैद्य जयंत देवपुजारी (चेअरमन, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसीन), डॉ. मनोज नेसारी (अॅडव्हायजर (आयुर्वेद) मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार) आणि वैद्य राकेश शर्मा (प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ इथिक्स अँण्ड रजिस्ट्रेशन, एनसीआयएसएम) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयुर्वेदिक महासंमेलनात होणार आहेत.
नागरिकांसाठी, कायचिकित्सा / जनरल मेडिसीन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून ओपीडी सुद्धा उपलब्ध असणार आहे. आयुर्वेदिक तज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच श्री समर्थ सेवक मंडळ येथील मैदानात ५५ नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स असतील, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील. तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या