Top Post Ad

तंबाखू मुक्त शिक्षक तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात


 देशात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. महाराष्ट्रात तर संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहे. राज्यातील याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असून या अंतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ति म्हणून सादर करण्यात येत आहे. नवी मुंबई येथील हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ, यूएसए मधील हारवर्ड टी. एच. चैन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (एचएसपीएच) आणि डाना फारबर कॅन्सर इन्स्टिट्यूट (डीएफसीआय) यांनी एकत्र येऊन बिहार शिक्षण विभागाच्या सहकार्याने (डीओई) एकत्र येऊन महत्त्वपूर्ण अशा तंबाखू मुक्त शिक्षक तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात केली असल्याची माहिती मुंबईतील प्रेस क्लबमध्ये  डॉ. प्रकाश सी गुप्ता आणि डॉ. मंगेश पेडणेकर  प्रसिद्धी माध्यमांना दिली. 

पत्रकार परिषदेत हेलिस सेखसारिया इंस्टीट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. प्रकाश सी गुप्ता पुढे म्हणाले,  हा उपक्रम म्हणजे शिक्षकांशी संबंधित असा तंबाखू नियंत्रणासाठी उपयोगात आणला जाणारा पहिला कार्यक्रम आहे. तंबाखू मुक्त शिक्षक तंबाखू मुक्त समाज हा संशोधनात्मक पुराव्यांवर आधारीत उपक्रम असून या अंतर्गत शिक्षकांना तंबाखू मुक्त करण्या बरोबरच बिहार मधील शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण योजनांवर अंमलबजावणी करण्यात येते, २००९- २०११ दरम्यान काही निवडक शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आणि या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळून ५० टक्के शिक्षकांनी तंबाखू पासून मुक्ती मिळवली तर १२ टक्के शाळांनी तंबाखू मुक्त शाळेची यशस्वी अंमलबजावणी केली.

महाराष्ट्रात तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणावर असून अंदाजे २७ टक्के जनतेला तंबाखू सेवना मुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या हानीकारक व्यसनाचे प्रमाण हे खूप मोठे आहे, यामुळे राज्यभरातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील गर्दी बरोबरच पुण्यातील निसर्गरम्य परिसरात सुध्दा तंबाखू मुळे रोज होणार्या मृत्यूची संख्या ही खूप मोठी असून यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे केवळ मृत्यूच होत नाही तर या मुळे श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कॅन्सर सारख्या आरोग्य समस्याही निर्माण होतांना दिसतात. सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज असून तंबाखू मुक्त शिक्षक तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून यामुळे महाराष्ट्रातील समाज, शिक्षक आणि व्यक्तींना तंबाखूच्या घातक परिणामांवर मात करण्यास सक्षम केले जाणार आहे. तंबाखूच्या विरोधात शिक्षकांना बदलाचे निर्माते म्हणून सक्षम करताना आम्ही आपल्या समाजाला तंबाखू मुक्त आणि आरोग्यपूर्ण भविष्य देऊ करत आहोत. तंबाखू मुक्त शिक्षक तंबाखू मुक्त समाज कार्यक्रम म्हणजे शिक्षणातौल बदलाची उर्जा मिळून आरोग्यासाठी असलेला धोका कमी करत असल्याचे उत्तम द्योतक आहे. असेही डॉ. प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

बिहार मधील यशानंतर नुकत्याच हाती आलेल्या अभ्यासानुसार हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात येत आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या टिमने मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी एक स्वयं-मदत पुस्तिका हे पुराव्यांवर आधारीत उपक्रमानुसार तयार केले आहे. या स्वयं-मदत पुस्तिकेच्या माध्यमातून शाळांमधील प्रमुखांना तंबाखूच्या वापरापासून मुक्ती मिळवण्यासह शाळांमध्ये तंबाखू मुक्त शाळांचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे हेलिस सेखसारिया इंस्टीट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. मंगेश पेडणेकर म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com