16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेले ठाणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक ओळखले जावे यासाठी सन 2014 पासून रेल्वे स्थानकातील धोकादायक झालेल्या इमारती तोडण्यात आल्या होत्या स्टेशन मास्तर कार्यालय व इतर कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेले आहेत . रेल्वे मंत्रालयाने देशातील 1253 रेल्वे स्थानके आदर्श स्टेशन या योजनेतून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता त्यामधून ठाणे रेल्वे स्थानक वगळू नये यासाठी 3 जुलै 2019 ला खासदार राजन विचारे यांनी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर (RLDA) रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मार्फत मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ,दादर, ठाणे ,कल्याण व ठाकुर्ली या पाच रेल्वे स्थानकाचा नियोजित मास्टर प्लॅन तयार केला व त्याला 3600 कोटीची मंजुरी ही रेल्वे मंत्रालयाने दिली त्यातील पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल साठी 2500 कोटी मंजूर असून त्याचे कामही सुरू झालेले आहे व ठाणे रेल्वे स्थानकासाठी 983 कोटी मंजूर करण्यात आले होते त्याचे काम 2024 पर्यंत सुरू होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात याच्या निविदा प्रक्रियेस देखील सुरुवात झालेली नाही. संसदेत हा मुद्दा उपस्थित करून खासदार विचारे यांनी या ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामास गती दिली
ठाणे रेल्वे स्थानकातील सात ते आठ लाखाहून अधिक प्रवाशांना अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधा लक्षात घेऊन निष्कसित केलेल्या रेल्वे वसाहतीच्या जागेवर पी पी पी च्या माध्यमातून तीन कमर्शियल टॉवर उभ्या राहणार आहेत. त्यातील रेल्वे वसाहतीतील 164 घरे व मल्टी लेवल पार्किंग विकसित करून प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सन 2024 पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे
0 टिप्पण्या