Top Post Ad

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीविरूद्ध संघर्ष... The Origin


 The Origin नावाचा हॉलिवुडी चित्रपट आठ डिसेंबर रोजी अमेरिकेतल्या निवडक चित्रगृहात प्रदर्शित होणार आहे. नंतर तो १९ जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.  The Origin of Our Discontents: Exploring 'Caste' as the Root of Discrimination या पुस्तकाच्या लेखिकेचा संघर्षपट आहे.  या चित्रपटातून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीविरूद्ध संघर्ष दिसणार आहे.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा हॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहेत.  त्यामुळे भारतात सुद्धा त्याबद्दल उत्सुकता आहे.  एव्हढ्या मोठ्या स्केल वरच्या चित्रपटात बाबासाहेबांवरच्या लढ्याची दखल  घेतली जात आहे.   मात्र भारतीय मीडीयात  एखाद दुसरा लेख वगळता सामसूम आहे. 

मांजरेकर सावरकरांवर चित्रपट बनवणार अशी नुसती फुसकुली सोडली तर त्यावर बातम्या येऊ लागल्या. मागे सुधीर फडके सावरकरांवर चित्रपट बनवणार होते. वीस पंचवीस वर्षे ते निधी जमवत होते.  पण तोपर्यंत बाबूजी बाबूजी म्हणून सातत्याने या चित्रपटाबद्दल सकारात्मक लिखाण केले गेले.   काही काही लेखात तर सुधीर फडके तपस्वी असून त्यांच्या या कार्यात प्रत्येक मराठी माणसाने योगदान दिले पाहिजे असा सूर असायचा.  त्या काळात कॉंग्रेस पक्षही सावरकरांचे गोडवेच गात असे.  आजच्या सारखा सावरकरांवर तुटून पडत नव्हता. अ‍ॅटनबरोने गांधी चित्रपट बनवला तेव्हां गांधीजी आंतरराष्ट्रीय झाल्याचा साक्षात्कार मीडीयाला झाला. भरभरून लिहून येत होतं. शूटींगचे रिपोर्ट्स येत होते.  बेन किंग्जलेने दात पाडल्याच्या बातम्या आल्या. चित्रपट रिलीज होईपर्यंत त्याबद्दल भरभरून आले.

पण ओरिजिन बद्दल असं काहीही वातावरण नाही. भारताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय झाले याचा आनंद नाही का  ? कि खबरच नाही ? असे कसे होईल ? खबर नाही हे शक्य आहे का ? म्हणूनच अतिचिकित्सक असलेल्या काही आंबेडकरी विद्वानांना आवाहन आहे कि चित्रपट कसाही असू द्यात, आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन टाळा. काही काळ इसापनीती, पंचतंत्राला शरण जा. विद्वत्ता हे सुद्धा शस्त्र आहे आणि शस्त्राचा वापर कसा करावा याचे शहाणपण हे बोधकथांमधून येते. नीती आणि विद्वत्ता एकाच इसमाच्या ठायी असेल असा काही नियम नाही. 

एक तर ज्या  महिलेने हा सिनेमा  लिहिला ती कृष्णवर्णिय आहे.  निर्माती सुद्धा कृष्णवर्णिय आहे.  कृष्णवर्णियांचा लढा तिला भारतातल्या जातीय लढ्याशी रिलेट करता आला. एकंदरीतच जगभरातल्या मूळच्या रहिवाशांना बेदखल करून गुलाम बनवणायांच्या विरोधातला हा लढा चित्रपटात मांडताना तिला बाबासाहेब सापडले.   तिला बाबासाहेब समजल्यावर आपलेसे वाटले.  हा प्रचंड मोठा प्लॉट आहे.  शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकात जगभरातल्या गुलामीचा आढावा घेतला आहे. तसाच हा प्लॉट असावा असे ट्रेलर पाहून वाटते.  नक्की माहिती नाही.

या चित्रपटाशी काही  वादग्रस्त नावे जोडली गेली आहेत. पण हा स्वतंत्र विषय आहे. त्यांचा समाचार स्वतंत्रपणे घेता येईल.  अर्थात त्यांनी जर कुटिल हेतूने माहिती पुरवली नसेल  तर. कारण या चित्रपटाची सुरूवात होणे आणि साहेबांना इथल्या  मिडीयाने इथे प्रसिद्धी देणे याचा संबंध नसेलच असे नाही.  जर चित्रपटात  ७०% किंवा जास्त प्रामाणिकपणा असेल  आणि  उर्वरीत ३०% मुळे प्रचंड बदनामी होत नसेल तर काही  गोष्टी कानाआड टाकायला लागतील.   

चित्रपट किंवा कोणतीही कलाकृती जी मास कम्युनिकेशनशी निगडीत आहे ती १००% आपल्या विचाराबरहुकूम असण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक असते.  तिसराच कुणी जर निर्मिती करत असेल तर किमान आपण त्यात सहभागी व्हायला  पाहीजे. आपण आपला सिनेमा बनवत नाही. आपण पैसे लावत नाही. वर्गणी काढत नाही.  आपल्या सिनेसृष्टीसाठी संस्था काढत नाही आणि इतरांनी सिनेमे बनवल्यावर फुदकत राहणार तर त्याने नेमके काय साध्य होईल ? जे काही मनासारखे वाटत नाही ते पोहोचवण्यासाठी आपल्याला हात पाय मारावे लागतील.  ते न करता फक्त चिडचिड करून काहीही होणार नाही.   कृष्णवर्णियांनी त्यांचा  लढा जागतिक सिनेमाद्वारे मांडला.  आपण आपला कधी मांडणार ? सव्वा कोटी जनता आहे.  सरासरी शंभर रूपये देणगी दिली तरी सव्वाशे कोटीमधे चित्रपट बनू शकतो. हे करायचे तर किमान व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सने तरी आपण एकमेकांशी बांधलेले असायला हवेत.  मराठा  क्रांती मोर्चा किंवा ब्राह्मणांची मराठी मंडळे असतात तसे. 

 तोपर्यंत थोडीशी सहनशक्ती वाढवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्तरावर शक्तिशाली माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचताहेत याचा आनंद मानूयात.  जगाने या माध्यमातून बाबासाहेबांमधे रस घ्यायला सुरूवात    केली.  जगभरातल्या सामान्य माणसापर्यंत बाबासाहेब पोहोचतात, कार्य पोहोचते   हे  यश सेलिब्रेट करूयात. नंतर सावकाशीने त्रुटींवार बोलू.   रणनीती पण महत्वाची असते गड्यांनो ! द मूकनायकचे हे भाष्य "बोलके" आहे.

For the Ambedkarites, the film holds special significance as it is the first Hollywood film to feature the character of Babasaheb Dr. Bhim Rao Ambedkar, played by Gaurav J. Pathania, a Professor in the United States. The film briefly portrays Ambedkar, who as a child suffered enormous indignities but overcame all the hardships to study and fight against caste.

However, it is worth noting that Ambedkar is yet to be extensively explored in Bollywood, which is not only the cinema industry of his home country but is based in the city where Ambedkar spent a significant part of his life. Earlier, Ava DuVernay had made "Selma" in 2014, which was a biopic of Martin Luther King Jr., a Black civil rights activist. The film also premiered at the Toronto Film Festival in Canada on September 11th.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com