Top Post Ad

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा चलो बुद्ध की ओर चा नारा


महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात हजारो बौद्ध अनुयायांच्या साक्षीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा चलो बुद्ध की ओर चा नारा

 बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंम्बर 1956 रोजी महालक्ष्मी  रेसकोर्स  मैदानात धम्म दिक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वतीने 16 डिसेंम्बर रोजी मुंबईतील रेसकोर्स मैदानात धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्मपरिषदेत हजारो बौध्द अनुयायांनी उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात चलो बुद्ध की ओर चा नारा देण्याचा संकल्प पूर्ण केला. आज बौद्ध उपासकांच्या साक्षीने  जगभरातून आलेल्या बौद्ध प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्खूंच्या उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी चलो बुद्ध की ओर चा नारा दिला.

 पिढ्या पिढ्या आम्ही मागत होतो दुसऱ्यांची  भिक्षा ;
आमच्या भीमाने दिली आम्हाला दिली बौद्ध धम्माची दिक्षा ;
फुलून गेले आहे मैदान रेसकोर्स ; 
कारण या ठिकाणी पोहोचली आहे बौद्ध धर्मियांची फोर्स;
आमच्याकडे तसा कसला नव्हता सोर्स
तरी या ठिकाणी आला बौद्ध धर्मीयांचा फोर्स
अशी नेहमीच्या शैलीत कविता सादर करुन आपल्या भाषणाला ना.रामदास आठवले यांनी प्रारंभ केला. 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.जगात सर्वत्र बौद्ध धम्म प्रसारित झाला आहे त्याबाबत आम्हाला अभिमान आहे. जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन नवजीवन दिले आहे. धम्म क्रांती घडविली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांची संकल्पना आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे वारसदार म्हणून आपण काम करीत राहू असा निर्धार आठवले यांनी व्यक्त केला.

महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात सभास्थळी पोहोचण्यास ४ ते ५ किमी अंतर चालत मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचावे लागत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती तरी लोक जमिनीवर बसून धम्मपरिषदेत सहभागी झाले.  यावेळी पूज्य भिक्खू संघाला ना.रामदास आठवले यांच्या कुटुंबाच्या वतीने कठीण चिवरदान  आणि धम्म दान करण्यात आले.  परिषद यशस्वी करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून अथक परिश्रम करणारे अविनाश कांबळे तसेच  पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो;  पद्मश्री कल्पना सरोज, अविनाश महातेकर यांच्यासह  अनेक मान्यवर तसेच भिक्खूसंघ उपस्थित होता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com