Top Post Ad

इस्रायल आणि हमास युद्धामुळे प्रभू येशू यांच्या जन्मस्थळावर शांततेचं सावट

 


जगभरात  प्रभू येशूचा जन्मदिवस अर्थात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पॅलेस्टिनीमधील बेथलेहेम येथे  प्रभू येशू यांचा जन्म झाल्याचे ख्रिश्चन धर्मीय मानतात. दरवर्षी या ठिकाणी जल्लोष असतो. मात्र, यावेळी या शहरात शांतता आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पर्यटक आणि यात्रेकरू या पॅलेस्टिनी शहरापासून लांब आहेत. मागच्या वर्षी ख्रिसमसला पॅलेस्टिनी शहर बेथलेहेम गजबजलेले होते. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले होते. मात्र, या वर्षी हमास आणि इस्राइल युद्धामुळे हे शहर ओसाड पडले आहे. . या ठिकाणी फक्त लष्कराचा वावर दिसत आहे. बॉम्ब हल्ले आणि गोळीबारामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वर्षी पर्यटक या युद्धामुळे आलेले नाही. परीणामी येथील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसाईकांचे नुकसान झाले आहे. बेथलेहेमची अर्थव्यवस्था प्रामुख्याने जगभरातून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात. 

खरे तर दक्षिण इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संघर्ष उफाळला आहे. हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्य गाझासह अनेक पॅलेस्टिनी शहरांवर हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत २० हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे. प्रभु येशूचे जन्मस्थान बेथलेहेम देखील इस्रायली हल्ल्यांपासून लांब राहिलेले नाही. या युद्धामुळे पर्यटक येथून लांब असल्याचे स्थानिक नागरीक सांगतात. 

असं असलं तरी काही विद्वानांनी येशूचा जन्म भारतातच झाला असल्याचा दावा केला आहे.  लोकांना येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनाबद्दल फारशी माहिती आजही कोणालाही नाही. त्यांच्या आयुष्यातील 18 वर्षांची माहिती 'न्यू टेस्टामेंट' यामध्येही नाही मिळतं. त्या निनावी वर्षांना हरवलेली वर्षे किंवा मूक वर्षे असं म्हटलं जातं. 1887 मध्ये निकोलस नोटोविच या रशियन विद्वान आणि युद्ध पत्रकाराने येशू ख्रिस्ताविषयी वेगळा सिद्धांत जगासमोर मांडला. स्पीकिंग ट्रीच्या अहवालानुसार, लडाखमधील हेमिस मठात ठेवलेल्या 'लाइफ ऑफ सेंट जीझस, बेस्ट ऑफ द सन्स ऑफ मेन' या दस्तऐवजाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक सिद्धांत 1894 मध्ये फ्रेंच भाषेत प्रसिद्ध केला आहे. लेहमधील एका मठात वेळ घालवत असताना तिथल्या लामांनी त्याला येशूबद्दल सांगितलं होतं, असा त्यांचा दावा आहे. 

त्यांच्या दाव्यानुसार, येशू एक महान देवदूत होते आणि सर्व दलाई लामांमध्ये महान होते. इस्रायलमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या येशूने वयाच्या 13 ते 29 व्या वर्षी एका मठात ज्ञान प्राप्त केल्यानंतर जेरुसलेमला आले होते. तिथे ते इस्रायलचा मसिहा बनले होते. लामा यांनी दावा केला की, येशू ख्रिस्ताने भारतात येऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि देशातील अनेक शहरांमध्ये दीक्षाही दिल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मणांचा राग आल्यानंतर तो हिमालयात निघून गेले होते, दावा लामा यांनी केला आहे.  

अमेरिकेतील धर्मोपदेशक लेव्ही एच. डोलिंग यांनी1908 मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. 'अ‍ॅक्वेरियन गॉस्पेल ऑफ जिझस द क्राइस्ट' या पुस्तकात येशूच्या आयुष्यातील हरवलेली वर्षे आणि इतर सर्व माहिती त्यांना अलौकिक शक्तींद्वारे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं की, तरुण असताना येशूने भारत, तिबेट, ग्रीस, इराण आणि इजिप्तचा दौरा केला होता. 

ऋषिकेश हरिद्वारमधील येशू गुहा ही ऋषिकेशच्या उत्तरेकडील असून जिथे येशू काही काळ वास्तव्य केला होता, असा दावा करण्यात आला आहे. 1148 मध्ये लिहिलेल्या राजतरंगिणी नावाचा आणखी एक काश्मिरी इतिहासात असा दावा करण्यात आला आहे की, येशू नावाचा एक महान संत दल सरोवराच्या काठी इसाबार इथे राहत होता. 

काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एक समाधी बांधलेली आहे, असा दावा स्थानिक लोकांनी केला आहे.  काही लोक असा दावा करतात की, येशू ख्रिस्ताने वधस्तंभातून सुटल्यानंतर आपले उर्वरित दिवस काश्मीरमध्ये व्यतित केले आहेत. या श्रद्धेमुळे श्रीनगरमध्ये त्यांची समाधी बांधण्यात आल्याचं बोलं जातं. हे स्थान परदेशी प्रवाशांसाठी महत्त्वाचं स्थान मानलं जातं. काश्मीर मधील जुन्या शहरातील या जागेतील एका इमारतीला रुजाबाल (Roza Bal, Rouza Bal, or Rozabal) म्हणून ओळखली जातं. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, स्थानिक लोकांनी पुष्टी केली की येशूने काश्मीर खोऱ्यात बरीच वर्षे व्यतित केली आहे. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत ते इथेच राहत होते, असं त्यांचा विश्वास आहे. यानुसार, जर येशूने किशोरावस्थेतील 16 वर्षे आणि आयुष्यातील शेवटची 45 वर्षे येथे घालवली असती, तर ते सुमारे 61 वर्षे भारत, तिबेट आणि आसपासच्या भागात राहिलचा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो. याबाबत बीबीसीची एक टेलीफिल्म देखील आहे. 

Why 'DA VINCI CODE' या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली खरी, पण जगभरात हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात येशू ख्रिस्त यांनी लग्न केले आणि त्यांना मुलंही झाली होती त्यानंतर ते भारतात आले होते, असं दाखविण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अनेक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 'येशू नावाचा एक बौद्ध भिक्षू होता. या डॉक्युमेंटरीमध्ये येशूला सुळावर चढवण्याची कल्पना नाकारण्यात आली आहे.
शिवाय जेव्हा येशू 30 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या आवडत्या ठिकाणी आले होते, असा दावा करण्यात आला आहे.  (Tomb of Jesus Christ in Jerusalem or in India What is the relationship with Kashmir mystery of isa masih life Christmas Special) जर्मन विद्वान होल्गर कर्स्टन यांनी येशूंच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल लिहिताना असा दावा केला आहे की, येशू सिंध प्रांतात आर्यांसोबत स्थायिक झाले होते. यावरुन असा प्रश्न उपस्थित होतो की, मग येशू ख्रिस्त कधी भारतात आले होते का? हा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे आणि अनेक ख्रिश्चन मिशनरी संस्था, ज्यात एव्हिडन्स फॉर ख्रिश्चनिटी (evidenceforchristianity.org) आहेत त्यांनी ही शक्यता पूर्णपणे नाकारल्याचं वारंवार दिसून आलं आहे. 

भारतीय विचारवंत तत्वज्ञानी ओशो अर्थात आचार्य रजनिश यांनीही येशू ख्रिस्त भारताशी संबंधित असल्याचं म्हटलंय. ओशो म्हणतात, 'जेव्हा कोणी सत्यासाठी तहानलेला असतो, तेव्हा तो उत्स्फूर्तपणे भारताबद्दल उत्सुक होतो आणि पूर्वेकडे प्रवासाला निघतो. ही केवळ आजची गोष्ट नाही. अडीच हजार वर्षांपूर्वी पायथागोरसही सत्याच्या शोधात भारतात आले होते. अगदी येशू ख्रिस्तदेखील... बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या 13 ते 30 वर्षांच्या जीवनाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यात त्यांना वयाच्या 33 व्या वर्षी वधस्तंभावर खिळले होतं. 17 वर्षांचा लेखाजोखा बायबलमधून जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्याचं ओशो यांचा दावा आहे. जेव्हा येशू भारतात आले तेव्हा बुद्ध निघून गेले होते पण बौद्ध धर्म खूप जिवंत होता. येशू यांचा मृत्यूही भारतात झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे ख्रिश्चन विद्वानांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून येशू आणि बौद्ध धर्म यांच्यातील संबंधाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा आजही सापडलेला नाही. ओशो सारख्या तत्वज्ञानी, निकोलस नोटोविच आणि लेव्ही एच डॉलिंग सारख्या विद्वानांच्या दावाचं काय असा प्रश्न उपस्थित होतो. या दाव्यांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. हा आपआपल्या श्रद्धेचा विषय आहे.
सोशल माध्यमांवरून साभार.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com