Top Post Ad

उठ गुलामा जागा हो , स्वातंत्र्याचा धागा हो ।


 गुलामीच्या देशा, भारत देशा अशी ओळख असलेल्या देशात आपण गुलाम म्हणूनच राहात आहोत असे म्हटल्यास वावगे ठरू नयें . कारण भारत देशाची परंपरा पाहिली तर तथागत सिद्धार्थ गोतम बुद्ध यांच्या २५०० वर्षाचा सुवर्णकाळ सोडला तर हजारो वर्षे या देशान आपण गुलाम म्हणूनच जगत आलो आहोत . त्यासाठी जगातील देशातील गुलामीचा विचार केला तर आपल्या सारखे गुलामातील गुलाम म्हणून आपली ओळख आहे . आणि ही ओळख आजतागायत कायम आहे. त्यामुळेच आपण आपल्या खऱ्या खुऱ्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास सिद्ध होत नाही . त्या जोखडाच्या विरोधात रणशिंग फुंकत नाही. काही महाशय, याठिकाणी विचारतील अहो, आपण तर १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झालो आहोत आणि ह्या स्वातंत्र्याची चव गेली ७५ वर्षे चाखत आहोत . 

परंतु खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का? जरी आपण शारीरिकदृष्ट्या स्वतंत्र झालों आहोत असे आपणांस वाटत असले तरी मानसिक दृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्टया, पारतंत्र्यातच आहोत नव्हे गुलामीतच जगत आहोत . मग, ती गुलामी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, न्याय, आदी मूलभूत गरजांसाठी कायम आहे . अहो, ह्या मूलभूत हक्कासाठी लोकांना कित्येक वर्षे मंत्रालया समोर प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे, आंदोलने, उपोषण, आत्मदहन, रास्ता रोको वगैरे वगैरे रित्या हक्कांसाठी लढावे लागते. त्यासाठी लाठीमार - गोळ्या खाण्या लागतात. जिवाला मुकावे लागते . अगदी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो मग, कसले आले आहे स्वातंत्र्य ? ही गुलामी च ना! अशा गुलामीतील जगणे पाहून काही वयोवृद्ध मंडळी बिटिशांच्या काळाची आठवण करून देतात त्यावेळी ते म्हणतात की , ब्रिटिशांचे राज्य तरी चांगले होते. कुण्या आया, बहिणीवर अन्याय अत्याचार झाले तर लगेच त्याला कणेर शासन होत होते. अगदी त्याकाळात स्त्रिया सोन्याचे दागिने खुलेआम घालून फिरू शकत होत्या .

 परंतु कुण्या भामटयांची चोरी करण्याची हिम्मत नसायची . त्याकाळात अनधान्य आदी जीवनाश्यक वस्तूसाठी माणूस सुखावत जीवन जगायचा ती गुलामी ह्या स्वातंञ्या पेक्षा चांगली वाटायची त्या गुलामीत देखील स्वातंत्याचा उपभोग घ्यायचा, ठीक आहे. इंग्रज राजवटीत अन्याय-अत्याचार होत होते. परंतु समाजकंटकांना , गुन्हेगारांना माफी नव्हती . अशा गुलामीत येथील लोकांना शिक्षणाचे दालन खुले केले होते त्यांच्या उत्कर्षासाठी रेल्वे, पोस्ट आदी साधने निर्माण केली त्यासाठी आपल्या महापुरुषांनी , क्रांतीकारकांनी, सुधारकांनी, नेत्यांनी मोलाची कामगिरी बजावली त्याचाच परिपाक मृणून इंग्रजांच्या काळात काही सुधारणा झाल्या आणि देशाच्या स्वातंत्यासणी रणशिंग फुंकले आणि फार मोठे बलिदान देऊन त्याग करून देशाला पारतंत्र्यातून, गुलामीतून मुक्त केले असा हा स्वातंत्र्याचा १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस. ह्या स्वातंऱ्याच्या दिवसापासून आपण शारिरीक दृष्ट्या स्वतंत्र झालोत पण मानसिक गुलामी आतही कायमच आहे त्या गुलामीमुळे आजही ८५ टक्के समाज नरकयातना भोगतो आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी झगडतो आहे. अन्याय अत्याचार सहन करतो आहे. 

परंतु स्वतंत्र देशातील आपली समाजव्यवस्या लोकांवर अन्यायच करीत आहे . त्यांना पायदळीच तुडवत आहे अजूनही बहुजनांना गुलामीच्या खाईत लोपत आहे. त्यांना आत्मा, नशीब, देववाद , परमात्मा आदी खूळ कल्पनांचा आधार घेऊन कंगाल केले आहे आणि ही कंगाल झालेली मंडळी त्या गर्तेत अडकल्याने ते खुलेआम गुलामीचे समर्थन करीत आहेत. गुलमीतय आनंद मानीत आहेत. त्यांना जरी आपल्या गुलामीला जबाबदार असणाऱ्या मनुवादी व्यवस्था( ज्या समता, स्वातंत्र्य, बंधुता , न्याय आदीना नाकारते), याची माहिती असूनही ते गुलामीतच गुलामीचे लाडू खात बसले आहेत . आणि हे लाडू बहुजनांनी असेच खात रहावे म्हणून हो समाज व्यवस्था अधिकच बळकटी द्यायचे काम करीत आहे . अशा गुलामीच्या विरोधात सिद्धार्थ गौतम बुद्धां पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरां पर्यंत जिवाचे रान केले आहे . त्या महापुरुषांच्या त्यागामुळे ,अनमोल संदेशामुळे मूलनिवासी समाज आज पेटतो आहे ,न्याय हक्कांसाठी लढतो आहे. परंतु तो गटागटानेच. परंतु १ जानेवारी १८१८ ला बहुजनांनी लढाई लढली ती सांघिक भावनेने ज्यांनी जवळ जवळ 300000 पेशव्यांचा खात्मा अवघ्या ५०० महार रेजीमेन्ट च्या शूर वीरांनी, जवानांनी केना आणि मोठा इतिहास घडवून पेशवाईतील गुलामी गाडली . अशा शूर वीरांना १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावला विजयी सलामी देण्यासाठी लाखो लोक येतात 

परंतु तेही गटा तटानेच ! त्यावेळी अशा गटा तटांनी मानवंदना करण्याऱ्या ह्या बांधवाना प्रश्न विचारावासा वाटतो की, आपण सारे गटातनेच मरण पत्करणार आहोत का? अजून किती वर्षे गुलामीत खितपत पडणार ? किती वर्षे आपल्या आया बहिणीवरचा अन्याय अत्याचार सहन करणार ? अजून किती वर्षे मोर्चे , आंदोलने, उपोषणे, धरणे, लाठ्या काठ्या आणि गोळ्या छातीवर झेलणार ? अगदी किती वर्ष ? अहो, शत्रू एवढा बलाढ्य आहे तो क्षणोक्षणी जळू ' या प्राण्या सारखा आपले शोषण करतो आहे. अगदी क्षणोक्षणी रक्त शोषून घेत आहे . तरी देखील आपण सांघिक भावनेने, एकोप्याने १ जानेवारी १८१८ च्या भीमा-कोरेगाव या विजयी स्तंभाला मानवंदना देत नाही . जर का गटागटाने मानवंदना देत असू तर आपल्या सारखे ना (लायक) आपणच.

तेव्हा १ जानेवारी १८१८ च्या भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जात असताना आपल्या देशातील बहुजन नेत्यांनी ' कार्यकर्त्यानी आपल्या संघाचे, राष्ट्रीय अध्यक्षांचे जानवे टाकून सर्व पक्ष, संघटना , संघ, फेडरेशन आदी एकरूप होऊन आंतरराष्ट्रीय संघटनेशी बांधिलकी पत्करून मोठ्या सांघिक भावनेने, तन मन अर्पण करून सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्याच्या लढाईत उतरले पाहिजे तर आणि तरच ह्या दिनी ह्या शूर वीरांना दिलेली मानवंदना सार्थकी ठरेल. अन्यथा ऊठ गुलामा जागा हो, स्वातंत्र्याचा धागा हो । असा राग आळवत रहावे लागेल या पलिकडे काही नाही.


 सुरेश गायकवाड ९२२४२५०८७३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com