Top Post Ad

पुन्हा मोदी निवडून आल्यास तिहार कारागृहात जाण्याची तयारी ठेवा


 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत पाठवला नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीला बळकट करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे; मात्र आघाडीत सामील होण्यासाठी औपचारिक पत्राची अपेक्षा आहे. समान अजेंडा असलेल्या संभाव्य राजकीय मित्रांनी कागदावर निमंत्रण द्यायला नको काय, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.  

सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या, अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढविण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील. त्यामुळे त्यावर चर्चा करण्याऐवजी मोदींची सत्ता कशी जाईल, यासाठी एकत्र येऊन प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे फालतू चर्चा बंद करून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील, यासाठी प्रयत्न करा. कारण पुन्हा मोदी निवडून आल्यास तिहार कारागृहात जाण्याची तयारी ठेवा, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नागपुरात सांगितले.

पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीचा धागा पकडत आंबेडकर म्हणाले की, वंचितच्या उमेदवारांनी इतर कोणत्याही गोष्टींचा फारसा विचार न करता केवळ लोकसभा निवडणुकीत विजय कसा मिळवता येईल, याचाच विचार करावा. जागा वाटप, किती जागांवर लढणार याची चर्चा करण्यापेक्षा उमेदवारांनी त्यांना निवडणूक कशी जिंकता येईल, यासाठी प्रयत्न करावा. मग मते पैसे मोजून घ्यावी लागली, मैत्री करून मिळवावी लागली तरी चालतील. पण जास्तीत जास्त मते मिळतील, यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न करावे. येणा-या काळात जर फुले-शाहू-आंबेडकरवाद ही विचारसरणी लोकसभेत पोहोचवायची असेल तर निवडणूक जिंकण्याची खुणगाठ बांधा, असा सल्ला आंबेडकर यांनी यावेळी दिला.

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडियातील नेत्यांकडे ‘वंचित’च्या समावेशाबद्दल पाठपुरावा सुरू ठेवला आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी स्वत: उद्धव ठाकरे याविषयी बोलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधांत पावले उचलावीत, अशीही शिवसेनेची अपेक्षा असल्याचे समजते. प्रकाश आंबेडकर यांनी यासंबंधात उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरू ठेवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत काहीही का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. या दोन्ही पक्षांना जर वेगळा विचार करीत ‘वंचित’ला सामावून घ्यायचे नसेल तर आपण अर्ध्या-अर्ध्या जागा लढू आणि लोकसभेत भाजपला रोखू, असा त्यांचा प्रस्ताव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील तब्बल १० मतदारसंघांत क्रमांक दोनवर होती. एमआयएमने आता वंचितशी काडीमोड घेतला असला तरी आंबेडकर आजही मोठी शक्ती आहेत. त्यांना समवेत घेतले नाही तर मविआच्या उमेदवारांना फटका बसू शकेल, असा उद्धव ठाकरे यांचा अंदाज आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com