Top Post Ad

आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला रतन टाटांचा वाढदिवस साजरा


 आधुनिक भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक जडणघडणीत उद्योगपती  रतनजी टाटा आणि टाटा ग्रुपचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. रतनजी टाटा यांनी उद्योग समुहाला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव मदत केलेली आहे. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने सन २००० मध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्यविभुषण देवून उद्योगपती रतनजी टाटा यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.  

अशा महान उद्योगपतींच्या वाढदिवसानिमित्त इंडिया मिडिया लिंक संस्थेच्यावतीने  "इन्सपायर्ड  फ्राॅम रतनजी टाटा आयएमएलइएम अॅवार्ड - २०२३"  हा पुस्कार सोहळा आणि भव्य रक्तदान शिबीर आदि कार्यक्रम, दिनांक २८ डिसेंबर रोजी यशवंत नाट्य मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा  मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी रतन टाटा यांना जवळून ओळखणारे सिनेक्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उद्योगपती रतनजी टाटा यांच्या वाढदिवस सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला.  यावेळी प्रथमच रतनजी  टाटा यांच्यावर कविता, मुशायरा विशेषत: हिंदी बाॅलीवुड गीत यावेळी प्रदर्शित करण्यात आले.

 इंडिया मिडिया लिंक अँड इव्हेंटस् मॅनेजमेंटच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तसेच समाजसेवक के.रवी (दादा) यांच्यासह स्वामी बिजवनदास गुरुजी, प्रसिद्ध माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी, अभिनेता अली खान प्रसिद्ध शायर सागर त्रिपाठी,प्रसिद्ध माजी पोलिस अधिकारी तसेच वकील सुभाष सुर्वे,सुशील जाधव, बाॅलीवुड अभिनेता अली खान,अभिनेता अरविंद भानुशाली (ज्युनियर देव आनंद )  समाजसेवक आरिफ भाई आदि मान्यवर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.i             

कार्यक्रमात सागर त्रिपाठीसह धनराज वंजारी,सुभाष सुर्वे  यांच्यासह अनेकांनी रतनजी टाटांसह के۔ रवि दादांचेही आपल्या भाषणात भरभरून कौतुक केले۔ याप्रसंगी इतिहासात प्रथमच रतनजी टाटांवर लिहिल्या गेलेल्या मनोरंजनात्मक गाण्याचे प्रदर्शन करण्यात आले तसेच इतिहासात प्रथमच रतन टाटांवर मुशायरा,कविता व प्रसिद्ध हास्य कलाकार दिवेश शिवडकर आदिंनी आपापल्या कलेद्वारे रतनजी टाटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या۔ तसेच याप्रसंगी रतनजी टाटा यांच्या वाढदिवसा निमित्ताने टाटा रूग्णालयातील      कॅन्सर रूग्णांसाठी रक्तदान    शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेषत: टाटांच्या वाढदिवसा निमित्त के.रवि दादांनी उपस्थितांसमोर मिडियांच्या माध्यमातून देशाला सामाजिक संदेश देताना शासनाकडे मुंबईत रतन टाटांचा सेल्फी पॉइंट बनविण्याकरीता जागेच्या परवानगीची  मागणी केली. आणि जनतेस आव्हान केले की, उद्यापासून २९ डिसेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत रतन टाटांच्या वाढदिवसा निमित्त निदान फक्त १० मिनिटे जनतेने आपआपल्या घरातील वीज बंद केली तर देशामध्ये अर्बो युनिट विजेची बचत होईल. ज्यामुळे टाटा पावरची वीज मुंबई शहराला स्वस्त्यात मिळेल. त्याचबरोबर के۔रवि दादांनी आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींना विनंती केली की, येणाऱ्या वर्षांत रतनजी टाटांचा वाढदिवस देशाने सामाजिक पातळीवर वेग दवेगळ्या स्वरूपात व उत्साहाने साजरा करावा.

    सदर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला अधिक आनंदमयीॆ करण्याकरिता डॉ. विजय सानप, राहुल रवि, राजेंद्र साळसकर,  तानाजी कांबळे, शरद रणपिसे,राम तांबे, विलास घडशी,प्रभाकर (बाळा) वडियार, दिपक पडीये, डॉ.रतन पवार,रमजान सिद्धिकी,विक्रांत कश्यप,राहुल खैरे, राजा सोनटक्के۔ सौ۔अनिता पाटोळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com