Top Post Ad

कमी पडायला लागले ५० खोके म्हणून मुंबई गिळायला निघाले बोके


 धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी सरकारने अदानि समुहाला दिलेल्या प्रचंड सवलतीविरोधात शिवसेनेने धारावी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या दरम्यान काढलेल्या विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रचंड प्रमाणात धारावीकरांनी सहभाग घेतला होता.. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे. कोरोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही. मग, विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत. अद्यापही मिठागराचा निर्णय झाला नाही. म्हणजे मिठागराची जागा सुद्धा ९९ वर्षांच्या करारावर अदाणींना देणार आहेत. आता ५० ते ५५ हजार लोक पात्र आहेत. तर, लाखांच्यावरती लोक अपात्र आहेत. धारावीतील नागरिकांना मिठागरात पाठवून त्याचंही पुर्नविकास करण्याचासाठी अडाणींना देण्यात येईल. विकासाच्या नावाखाली सगळंच अदाणींच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. धारावीकरांना ५०० फूटांचं घर मिळालं पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. धारावीकरांना जिथल्या-तिथे घर मिळाले पाहिजेत. तसेच, रेल्वेलाईनमध्ये अदाणींनी त्याचं घर बांधावे. धारावीकरांचा घर बांधू नये,”

अनेक  वर्षांपासून हा प्रकल्प चर्चेत आहे. अनेक नेते इथे आहेत. अनेक जण या प्रश्नासाठी आवाज उठवत आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, फक्त मुंबईच काय, संपूर्ण महाराष्ट्र आज धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे फक्त मुंबईतली आपले कार्यकर्ते आज रस्त्यावर आलो आहेत. याचं वर्णन करण्याची गरज नाही. मी माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी हे दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा. एकतर हे असंविधानिक सरकार आहे. यांना असं वाटतंय की, आपल्याला कुणी जाब विचारु शकत नाही. वर्षाताई तुम्ही म्हणालात की, तुम्ही अदानींना प्रश्न विचारता तर भाजप उत्तर देत. तरी नशिब तुमचं अजून महुआ मोहित्रा नाही केलं. कारण त्यांनी त्यांना प्रश्न विचारले म्हणून थेट निलंबित करुन टाकलं. नशिब तुम्ही आता सभागृहात जात आहात.  सरकारचा मध्ये कार्यक्रम चालला होता की, सरकार आपल्या दारी. पण हे सरकार अदानींच्या दारी आहे. आम्ही उतरलो आहोत, धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदानींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीय. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलींता एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही. देवेंद्र आणि कंपनी म्हणतेय म्हणजे… संजय राऊत यांनी म्हटलंय भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडत आहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डरधार्जींन तुम्ही आहात. हा लढा केवळ मुंबईचा राहिलेला नाही तर हा लडा संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचा झालाय. मुंद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ. या सगळ्यांचा परिणाम मुंबई आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यांना वाटत असेल की सब भूमी गोपाल की, तशी सब भूमी अदानी की, तर तसं होऊ देणार नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले,

 


या मोर्चामध्ये शिवसेनेच्या जवळपास सर्वच नेत्यांसह मुंबई काँग्रेस, शेकाप आणि इतर राजकीय पक्षांनी सहभाग नोंदविला. अनेक दिवसांपासून परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या या मोर्चासाठी शुक्रवारी रात्री परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली होती. टी जंक्शन येथे दुपारी १ वाजण्याच्या आसपासच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याने सकाळपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल होताच त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. धारावी टी जंक्शनपासून या मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर तो बीकेसी मैदानापर्यंत आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, बाबूराव माने आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड .यांच्यासह ॲड राजेंद्र कोरडे - शेकाप, , विठ्ठल पवार- शिवसेना,  वंचित बहुजन आघाडी सदस्थ आणि जनकल्याण गृहनिर्माण विकास समितीचे सरचिटणीस अनिल शिवराम कासारे, उल्लेश गजाकोश- एन सी पी, संदीप कटके- आप, श्यामलाल जयस्वार- बी एस पी, संजय भालेराव, शैलेंद्र कांबळे- सी पी एम, मिलिंद रानडे- सी पी आय या मोर्चात सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी टी जंक्शनपासून सर्वच नेते पायी बीकेसी मैदानापर्यंत आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार आणि अदानींविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com