Top Post Ad

50 पक्ष संघटनाची भारतीय जन आघाडी निवडणूकीच्या मैदानात


 50 पक्षांना सोबत घेऊन  महाराष्ट्रात तिसरी राजकीय आघाडी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती भाऊसाहेब बावने यांनी मुंबई येथील मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी पत्रकार संघाच्या सभागृहातच यामध्ये सहभागी सर्व संघटना आणि पक्षाची पहिली बैठक संपन्न झाली.  या बैठकीत महाराष्ट्रातील ५० राजकीय पक्ष यांनी भारतीय जन आघाडी स्थापनेस मंजुरी देण्यात आली. सर्व पक्ष संघटनांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय जन आघाडीची घोषणाही करण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित पदाधिकारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात सत्ता टीकविण्या करीता सत्ताधारी आपली सर्व ताकद पणाला लावत असून दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेकडे हे सरकार दुर्लक्ष करून मतदाराच्या भावना सोबत खेळत आहेत. सर्वसामान्य जनता आपले गाऱ्हाणे मांडण्याकरिता मोर्चे, आंदोलने करीत आहे. मात्र हे सरकार आणि त्यांच्या मंत्रीमंडळाकडे या पिडीत जनतेची निवेदने स्विकारण्यास देखील वेळ नाही. अशा तऱ्हेने इथली सर्वसामान्य जनता आता हवालदील झाली असून सरकारने जनतेला दिलेली अभिवचने पूर्ण करण्यास हे सरकार नाकाम झाली असून ओबीसी, शोषित, वंचित, भटकेविमुक्त, मागासर्गीया, अल्पसंख्यांक, शेतकरी, कामगार, महिला यांना त्यांचे न्याय हक्क मिळून देण्याकरिता तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली असून या आघाडीत महाराष्ट्रातील सर्व स्तरातील बेगवेगळ्या भागातील राजकीय पक्ष व संघटना एकत्र आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने लवकरच आघाडीच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहेत. तसेच लोकसभा उमेदवार आणि विधानसभेच्या उमेदवाराची चाचपणी करण्याची तयारी करण्यात येणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात आघाडीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे नंतर आझाद मैदान येथे महामेळावा घेणार असल्याची माहिती भाऊसाहेब बावणे यांनी दिली 

महाराष्ट्रात सरकार कोण बनविणार ही सत्ता समीकरणे तिसरी आघाडीतील पक्ष सर्वांची गणिते बदलविणार यात शंका नाही. महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटीत आणी एकत्रित लढण्या करीता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणी संघटना यांना आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 50 राजकीय पक्ष आणी संघटना एकत्र आल्या असून त्यांनी एकत्रित आघाडीला संमती दिली आहे. ही आघाडी स्थापन करण्याकरीता आघाडीचे संयोजक राजेंद्र वनारसे तथा निमंत्रक भाऊसाहेब बावने यांच्यासह ओबीसी एन टी पार्टी चे अध्यक्ष संजय कोकरे, बाळासाहेब साबळे यांची भूमीका महत्वाची असुन या आघाडी करीता सर्वच घटक पक्ष आणी संघटना यांनी सुध्दा प्रयत्न केले आहेत या आघाडीत खालील पक्ष आणी संघटना यांनी भारतीय जन आघाडी स्थापनेच्या उरावाला एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com