Top Post Ad

त्यामुळे इथली प्रस्थापित व्यवस्था भयभीत होत आहे

दिवाळी आली की "बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करु नये"  या विषयावरील चर्चेला उधाण येते. मोठ मोठे महारथी या विषयावर आपले ज्ञान पाजळतात. सोशल मिडीयावर तर काही ग्रूप्स मध्ये सौम्य तर काही ठिकाणी अगदी हमरीतुमरी वर येईस्तव वादविवाद होतात. पण बिहारमधल्या बौद्धांच्या महाविहारावर आजही हिन्दुंचे प्रशासन का आहे यावर मात्र कोणी चर्चा करीत नाही. दिवाळीच्या सणाचा आणि बौद्धांचा ताळमेळ घालू पाहणारे आणि न घालणारे याबाबत मात्र मुग गिळून गप्प बसलेले दिसतात. आजही बौद्ध संस्कृती लेण्यांच्या रुपाने भारतभर पसरलेली आहे. तिला विद्रुपीकरण करण्याचे कार्य करणाऱ्या हिन्दुंच्या कारभारावर मात्र कोणी चर्चा करीत नाही. पण बौद्धांना शहाणपणाचे सल्ले देणारे मात्र हल्ली पायलीचे पचास झालेले दिसतात.  खरे तर सण साजरी करावे की न करावे हे ज्याच्या त्याच्या खिशावर अवलंबून असते. बोनसचे पैसे खुळखुळायला लागले की दिवाळीच असते. मग ती कशी साजरी केली जाते हे प्रत्येकजण आपल्यापरीने ठरवत असतो. त्यासाठी संपूर्ण समाजालाच ज्ञानाचे ढोस पाजणारे तेही अबौद्ध यांना काय म्हणायचे हे आता आम्ही ठरवले पाहिजे.

 दीपावली अर्थात मुळ प्राचीन दिपोत्सव  साजरा न करण्याचा सल्ला देऊन प्रस्थापित ब्राह्मणवादी लोक आज भयभीत होऊन बहुजन वर्गाला मूळ भारतीय बौद्ध संस्कृतीशी जुळवुन घेऊ देत नाहीत  मागील काही वर्षापासून बौद्ध धम्मात प्रचंड प्रमाणात धर्मांतरीत होत असलेल्या लोकांना संभ्रमीत करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरु करण्यात आले आहे. त्याला आपले विचारवंतही बळी पडत आहेत. काय घ्यायचं काय नाही हे आता नवदिक्षीत समाजाला सांगण्याची गरज असताना भडक भूमिका घेऊन विषयाचे विषयांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बौद्धांनी दीपावली साजरी करू नये असे सर्वाधिक मेसेज इथला प्रस्थापित ब्राह्मणीवर्ग जाणीवपूर्वक खुप मोठ्या प्रमाणावर प्रसारित करत आहेत. उद्देश एकच  जाग्रुत बौध्दांना इतर समूहापासून दूर ठेवणे व इतरांमध्ये वैचारिक चिकित्सक समज निर्माण न होऊ देणे.  मुळात जर दीपोत्सव बौद्ध धम्म परंपरेशी निगडित असेल तर त्यांची चिकित्सा करुन तपासणे,  शोध घेणे योग्य ते स्विकारणे, विकृत असेल ते सोडुन देणे. या बाबीला त्यांचा विरोध का असावा. बौद्ध धम्मात कुठल्याही पद्धतीच कर्मकांड नाही हे सर्वज्ञात असताना याउलट या सणांपासुन दूर राहण्याचा सल्ला आम्हाला ब्राम्हणवादी का देत आहेत..? ते जेवढं सांगतील तेवढेच ऐकावं का?  त्यावर  चिंतन मनन अध्ययन अभ्यास निरीक्षण काहीच करू नये का.

अखंड जम्बुदिप आणि या जम्बुदिपातील सर्व तमाम जनता जर बौद्ध परंपरेशी निगडित होती तर ती मूळ बौद्ध परंपरेशी निगडित असणारी  जनता गायब  झाली कशी  हे ते मनुस्मृतीकार सांगतात का.  त्या सर्व बौध्द समुहाने सामुहिक आत्मदहन केले का?  याच तथाकथित ब्राह्मणवाद्यांनी त्यांना बौद्ध धम्माशी तोडून हिंदू नावाच्या आवरणाखाली ब्राह्मणीधर्मात गुरपटून टाकलेले आहे आणि त्यांचे आज हे बिंग फुटतांना भयभित होऊन बौद्धांनी आपल्यापुरतच बघावं हिंदूंना त्यांचे सण साजरे करून द्यावे असा सल्ला देतात. मुळात नव अभ्यासक इतिहासकारांच असं म्हणणं आहे की हिंदू इथे कोणीच नाही आहेत ते सर्व बौद्ध आहेत आणि त्यांचेच हे मूळ उत्सव आहेत जे आज वेगळ्या पद्धतीने ब्राह्मणवाद्यांनी विकृत करून ठेवलेले आहेत. आज सर्वच मंदीरातील मुर्त्या या कशा बुद्ध प्रतिमा होत्या हे सोशल माध्यमातून सर्वत्र माहिती होत आहे. तेव्हा यांना आता त्याची धडकी भरली आहे. मुळ संस्कृती पुन्हा डोकं वर काढते आहे. म्हणून हे तथाकथित उत्सव धुडकावून मूळ स्वरूपाचे उत्सव साजरी करावेत हा नव अभ्यासाचा आग्रह आहे.आणि जर आज पुन्हा इथली सत्य,  मूळ सभ्यता आणि इतिहास, नवीन तथ्य आणि पुराव्याच्या आधारावरती चिकित्सा करून तपासून बहुजन समाज स्वीकारू पाहत आहे.  त्यामुळे इथली प्रस्थापित व्यवस्था भयभीत होत आहे. 

 हिंदूंना हिंदूंचे सण साजरे करू द्यावेत  बौद्धांनी ते करू नयेत असा आग्रह त्यांचा का आहे. मुळात या जंम्बुदिपात अर्थात अखंड भारतात हिंदू नावाचा धर्मच अस्तित्वात नाही. मूळ बुद्धिष्ट समुहालाच त्यांनी गुरफटून हिंदु धर्माच्या आवरणात बंदिस्त केलेले आहे आणि ही सत्यता जर सर्वांसमोर आली तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल वर्ण श्रेष्ठत्वातील त्यांचे स्थान नष्ठ होईल. त्यांच्या मते बौद्ध लोक केवळ सध्याचे वर्तमान नवबौद्ध एवढेच मर्यादित आहेत. जर अखंड जम्बुदिप  बुद्धमय होता तर त्याच्या परंपरा सण उत्सव हे देखील बौद्ध पद्धतीचेच असतील. मनुवादी ब्राह्मणाने घुसखोरी करून ते विकृत केलेले आहेत विकृत स्वरूप कोणीही स्वीकारू नये हे आधीच आपण सांगत आहोत. बौद्ध परंपरेला संयुक्तिक बौद्ध धम्माच पालन करून बुद्ध धम्माला अनुकूल उत्सव साजरे करावे जे पूर्व पारंपार चालत आलेले होते. जर ही भूमीच बुद्धाची आहे तर या  भूमीतील उत्सव परंपरा देखील बौद्ध धम्माशीच निगडित असतील त्याला विकृत मनुवादी ब्राम्हणानी केलेले आहे. आणि आता सत्य बाहेर येत असताना भयभीत होऊन अशा पद्धतीचे संकुचित मेसेज तयार करून ते इथल्या संस्कृतीला पुन्हा आणखीन बंदिस्त करू इच्छितात.  तेव्हा सुज्ञ लोकांनी सत्य साक्षीपुरावा आणि नवनवीन सत्य उघड होणाऱ्या संदर्भावरून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्या भुलथापांना आता यापुढे आधिक बळी पडता कामा नये. सध्या प्रसिद्धी माध्यमांना मॅनेज करून हवं ते प्रसिद्धीस देऊन लोकांना कसं भूलभुलय्या केलं जात आहे हे दिसतच आहे. आज संपूर्ण मिडीया त्यांच्याच हातात आहे. हवं ते हवं तेव्हा प्रसिद्ध केलं जात. मग त्यावेळी पुरातन काळात तर इथल्या बहुजनांना शिक्षणालाही बंदी होती तेव्हा यांनी काय काय केलं असेल कसं सगळं आपल्या मर्जीने प्रसारित केलं असेल याचा विचार केल्यास हे सर्व थोतांड लगेच लक्षात आल्याशिवाय रहात नाही. 

बाबासाहेब म्हणाले होते.... गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो आपोआप बंड करून उठेल.... मागील ५०-६० वर्षापासून आंबेडकरी समाज बहुजन जोडोच्या नावावर हेच करत आला आहे. मात्र त्या गुलामांना गुलामीतच राहायचे आहे त्याला काय करणार.... मग निदान आपली संस्कृती लेण्या आणि स्तूपाच्या रुपात आहे ती वाचवणे फार गरजेचे आहे.... त्यांनी  विहारांवर कब्जा केला मंदिरे बनवली , त्यानी लेण्यांवर हक्क सांगितला..त्यांनी साहित्यावर कब्जा केला .त्यांनी   सण, उत्सवावर कब्जा केला आणि काही महाभाग म्हणताहेत यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर काही बोलले नाही...पण भारत फक्तं बौद्धमय होता हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे ? जर धम्माला साहित्य नाही. सण नाही तर यामुळे एक दिवस असा येईल की भारत बौद्धमय होता हे लोकांना कळणार नाही...या भारतात जे काही आहे ते सर्व धम्माचे आहे हे ठासून सांगायचे सोडून सत्यापासून पळ काढू नका..

---------------------------------------------------


Diwali is an important Buddhist festival and 
it is ancient Dipotsav of Emperor Ashok.

According to Ramayana, Ram Ayodhya had come to Chaitra Mahane. Valmiki Ramayana tells that,

"चैत्रः  श्रीमानय  मासः  पुण्य पुष्पित  काननः । यौवराज्याय रामस्य सर्व मेवोयकल्पायताम् ।।" 

That is, Ram came to Ayodhya after winning Ravana in the month of Chaitra and then people welcomed him with flowers.

But, Diwali is celebrated in the month of Ashwin. This means, Ayodhya and Diwali have no connection.

Indeed, Tathagat Buddha returned to his Kapilvastu city after gaining knowledge. Tathagat Kapilvastu is about to come, his father Shuddhodan had decorated the city to welcome him. When Tathagat Buddha Kapilvastu came in the month of Ashwin, Suddhodan made good sweets and lighted the city with lamps at night.

These memories of Buddha's life were mostly celebrated in Ashoka period. When Buddha had left the Rajkaj and held the Chivar, Samrat Ashok and Samrat Harshvardhan also celebrated every fifth year named "Fiveth year" and used to sacrifice their entire Rajkaj and become a beggar for few days. (Ref. The legend of King Asoka- John S Strong)

Considering Buddha's Kapilvastu Nagri visit, Emperor Ashok had also decided to make 84000 stupas in Ashwin month and completed it in Ashwin month. All the stupes were lit on them after they were made. The scene in Mahavansa has stated that Ashok stood in Pataliputra to see all the stupas shining and the whole Jambudweep shined in the dazzling of the lamps. People indulged in happiness and celebrated it as "Dipotsav". (Ref. Geiger, tr. Mahavamsa, p. 52)

Samrat Harshvardhan also called this festival as "Deeppratipdotsav" in his play 'Naganand'.

Emperor Ashok had visited Buddha's birthplace Lumbini by walking after Vijayadashami. After that, on returning to his capital Pataliputra, he had decided to make 84000 stupes. People wanted Buddha very much, but all the people from remote regions could not go to Lumbini. At that time people used to worship Buddha as stupa. Keeping this purpose in mind, Ashok announced to make the same stupa considering the 84000 words of Buddha. They started it by digging bras in the earth (Vasu), which is now called "Vasubaras" (Konshila's program).

Hearing the announcement of the emperor, millions of people gathered in the capital Pataliputra and along with the emperor, everyone donated their own funds. It was raining so much of money from all sides that a huge amount of money was collected. That is why people started calling that memorable festival "money zodiac (dhanteras)".

After collecting money she was counted and worshiped the mother of Buddha Mahamaya, which is now called "Lakshmi Pujan". Even today people worship Buddha Mata Mahamaya as the goddess of wealth as Mahalakshmi goddess, called Laxmipujan. Buddhist beggars guided the Dhamma late at night. Other creatures sleep at night, but the owl bird stays awake. So, owl The bird is considered the symbol of Dhamma and the Buddhist emperor Minander had pointed the owl bird on his stamps.

Along with the stupas, the decision to construct the feet of Buddha (Buddhapad) in three places was taken on the second day in Pataliputra's meeting. Mahabali Emperor had established Buddhapad in three places in the world. Mahabali Ashok (Bali) had created a replica of Buddhagaya's Buddhist posts in many places, so people remembered the second day of Dhanteras as "Balipratipada". "Balipratipada" means the day to worship the Buddha's protests established by Mahabali Emperor Ashok (Bali King).

People got happy and started saying that Mahabali Emperor Ashok's rule should come again and again generation to generation, may it never end. Brahminist Indra had destroyed the great Indus civilization, whose memories were refreshing on the minds of people even at the time of Ashok. That's why people used to say that Indra (Ida)'s pain should never come, but Mahabali Ashok's rule should come again and again.

The big task of construction of stupas was fulfilled, one big task of life was completed, so Ashok celebrated it as "Padav or Padava". Even today Padwa is celebrated at the end of Diwali.

Emperor Ashok had sent his son Mahendra to South India and his daughter Sanghamitra to Ceylon for dhammaprachar on completion of Dipotsav in the memory of Buddha. The last visit of both siblings was celebrated "Bhai Duj", which is now known as Bhaubeej.

In the memory of Ashok, these five incidents started celebrating later as a five-day Diwali celebration. Ashok's Dipotsav was also celebrated as Dipapradipotsav during Samrat Harshvardhan. Thus Diwali festival is ancient Buddhist festival.

To erase Ashok's great history, the "Vamanpuran" story was written in the 8th century after Ashok's nearly a thousand years. Ashoka had established the feet of Booth (Buddhapad) at three places in the world (in Nagarjukonda in South India, Afghanistan's Navvihar Stupa and Arabistan) and conquered the whole world through them (Ashoka's 2nd conquest by the Dhamma, which Ashoka's Dhamma Vijay or Dhamma Conquest is called ).

To forget Ashok's Dhammavijay, Vishnu had conquered the world in three positions as Vaman Avatar, such a false, fictional and fantasy story was written. This fictional myth story and Diwali has no connection. Such false myths have been written aimed at erasing Buddhist history. There is no connection between Deepawali and Brahmin religion, because Brahmin religion is the religion of darkness. Buddhism is the religion of light of knowledge, therefore Dipotsav is importance in Buddhist tradition. Thus, Deepawali is complete As a Buddhist festival is.

-Dr. Pratap Chatse, Buddhist International Network

------------------------------------------------------------



कोणी कोणते सण व  ऊत्सव साजरे करावे हे ज्याचे त्याच्यावर सोडून दिले पाहीजे.

आज समाजामधे सण व ऊत्सवांप्रती मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.कोणी कोणता सण साजरा करावा,कोणता ऊत्सव साजरा करावा या बद्दल मोठी दूविधा आहे.तसे पाहील्यास मनुष्य हा एक ऊत्सव प्रिय प्राणी आहे.म्हणूनच तो ऊत्सव साजरा करण्याची संधी शोधीत असतो.मनुष्य जेव्हा आनंदीत होतो तेव्हा तो ऊत्सव साजरा करतो.व जेव्हा दूख्खी होतो तेव्हा तो शांत राहणे पसंत करतो.देशात एक वर्ग शुद्रातिशुद्र हजारो वर्षे विषमतावादी सामाजिक व्यवस्थेमुळे गुलामीचे जीवन जगत होता.त्यामुळे सहाजिकच त्याच्या जीवनामध्ये दूख्ख व दारिद्र्यच होते.परंतू वेळोवेळी त्यांच्या दुख्खाचे मुळ कारण चातुर्वर्ण व्यवस्थेचा शोध घेऊन ती नष्ट करून शुद्रातिशूद्रांच्या जीवनात आनंद निर्माण केला.तोच खर्या अर्थाने ऊत्सव होता.परंतू विषमतावादी व्यवस्थेचे निर्माते म.फुलेंच्या भाषेत शेटजी-भटजीच्या हटवादिपणामुळे संत-महापुरूषांचे कार्य मागे पडले व विषमतावादी व्यवस्थेने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शुद्रातिशूद्रांचे जीवनात पुन्हा दूख्ख निर्माण झाले आहे.आज खाजगीकरणाच्या नावाखाली पुन्हा बेरोजगार,बेघर,अशिक्षीत व अपमानीत केले जात आहे.त्यामुळे या विषमतावादी व्यवस्थेला नष्ट करण्यास प्रथमिकता दिल्या गेली पाहीजे.त्यामुळे ईथे समतेचे वातावरण निर्माण होईल.त्याचा लाभ शुद्रातिशुद्रांना होईल,त्यांच्या मुलभूत गरजातर पुर्ण होतीलच परंतू समता,स्वातंत्र्य,बंधूत्व व न्याय ही मानवी मुल्ये प्रस्थापित होऊन सन्मानपुर्वक जीवन प्राप्त होईल.तो दिवस हाच त्यांच्याकरीता सण असेल तेव्हा ते मोठा ऊत्सव साजरा करू शकतील.त्यामुळे आज जे काही सण व ऊत्सव लोक साजरे करत असतील त्यावर कोणतेही भाष्य करणे अनावश्य वाटते.परंपरेने व सवयीमुळे,अथवा लोकलाजेस्तव ते कोणतेही चूकीचे सण साजरे करीत असतील तर त्यांना साजरे करू दिले पाहीजे.परंतु त्यांना आपला खरा ईतिहास समजवून सांगून शुद्रातिशुद्र हे भाऊ-भाऊ असून ते एकाच पित्याची संतान आहेत,त्यांचा पिता एक आहे.हा म.फुलेंचा संदेश त्यांना समजावून सांगितलातर त्यांच्या परंपरा,सण,ऊत्सव यामध्ये मोठा बदल दिसून येईल.त्यामुळे शुद्रातिशूद्रांना संघटीत करणे त्यांच्यामध्ये बंधूभाव निर्माण करणे या कार्यास प्राथमिकता देणे गरजेचे वाटते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com