Top Post Ad

महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती


 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटरची 19 रिक्त पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेपर्यंत आलेले अर्जच स्वीकारले जातील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा.  डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याच्याकडे एमएससीआयटीसोबत राठी आणि इंग्रजी, टायपिंग येणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा किमान 6 महिन्यांचा अनुभव असावा.  22 आणि 23 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – 400008 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात टॅक्स असिस्टंटची 18 पदे भरण्यात येतील. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याच्याकडे कॉम्प्युटर हाताळण्याचा अनुभव असावा. याससोबतच डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 शब्दवेग मर्यादा असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. हवालदारची एकूण 11 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असावेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18 हजार ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. उमेदवारांनी आपले अर्ज कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 30 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com