Top Post Ad

आणि म्हणून भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला


   टीम इंडियाचा वर्ल्ड कप 2023 मधील शानदार प्रवास 19 नोव्हेंबरला निराशाजनक पराभवाने संपला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेटने जिंकून सहाव्यांदा विश्वचषकावर कब्जा केला  आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टिम इंडियाने चांगला खेळ दाखवला. विश्वचषकात दहा सामने विजयी झाले.  मात्र एका अंतिम सामन्याने खेळाडूंचे स्वप्न अपूरे राहिले आहे.  टीम इंडिया अंतिम सामना विजयी होईल आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरेल मात्र तसं झालं नाही. यावर सध्या अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. यज्ञ-याग, होम-हवन. जोतिषांचे भकित असे सर्व असताना अंतिम सामन्यात पराभूत झालाच कसा? असा प्रश्न सोशल मिडीयावर रंगला आहे. अंतिम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सामन्याला हजेरी लावली होती. याच्यासह अमित शाह उपस्थित होते. मात्र या सामन्याला ज्यांनी या आधी विश्वचषक भारताला मिळवून दिला त्या खेळाडूंना मात्र डावलण्यात आले यामुळे सर्वच क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सुर होता. त्यातच सुरूवातीला टिम इंडियाने १० षटकांमध्ये चांगली कामगिरी केली  कर्णधार रोहित शर्माच्या बाद होण्यानंतर मात्र सामन्याचं चित्र अवघड होऊन बसलं. आणि भारत विश्वचषकापासून दूर झाला. यामुळे देशभरातून सोशल मिडीयावर पनौती ट्रेंड सुरू झाला. तसा तो आधीही होता. मात्र तो सावधगिरीने होता. अंतिम सामना हरल्यावर  राजकीय नेत्यांनीही पनौतीचा ट्रेंड सुरू केला  सोशल मीडियावर अद्यापही पनौती ट्रेंड सुरूच आहे. 

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र त्यांच्या येण्याने सामन्यात पराजय पत्करावा लागला असल्याचे काही भारतीय जनता सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. मुंबई क्रिकेटची पंढरी असताना अहमदाबादला अंतिम सामना का खेळवण्यात आला, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अंतिम सामन्यात नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावर अनेकांनी पनौतीचा ट्रेंड सुरू केला.  राहुल गांधी भाषण देत असताना काही युवक पनवती, पनवती असे ओरडत होते. क्रिकेट विश्वकप अंतिम सामना झाल्यानंतर पनवती हा शब्द समाजमाध्यमावर प्रचलित झाला आहे. त्यामुळे पनवतीमुळे भारतीय संघ हरला असे राहुल गांधी म्हणाले.
  तर दुसरीकडे या ट्रेंडला थोपवण्याकरिता जगप्रसिद्ध आयटी सेलच्या कार्यकर्त्यांनी चक्क विश्वचषक ऑस्ट्रेलियन कप्तानाच्या पायाखाली दाखवून पनौती ट्रेंड थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्याच अंगाशी आल्याने आता हे आयटीसेल कार्यकर्ते संतापले असल्याचे चित्र सोशल मिडीयावर दिसत आहे. जर भारतीय संघ जिंकला असता तर सारे श्रेय कदाचित प्रधानमंत्र्यांनीच घेतले असते. मग हरले त्याचेही श्रेय त्यांच्याकडेच जाते असा सूरही काही नेटकऱ्यांनी लावला आहे.

साखळी सामन्यात एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचलेल्या मेन इन ब्लू संघाला ऑस्ट्रेलियाने मोठा धक्का दिला. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. युजर्सनी त्याच्यावर फिक्सिंगचा आरोपही केला आहे. अनेक युजर्स आता जय शाहवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अंतिम सामना कोलकाता, बंगळुरू किंवा मुंबईत होऊ शकला असता, असे चाहत्यांना वाटते. भारतीय संघाचा बळी फक्त पैसा कमवण्यासाठीच दिला गेला. आता या प्रकरणावर चाहते सोशल मीडियावर शाह यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. वास्तविक, 19 नोव्हेंबरला विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. अहमदाबादमध्ये हा सामना झाला. आता अहमदाबादमधील सामन्याच्या ठिकाणाबाबत सोशल मीडियावर युजर्स जय शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम खराब असताना वर्ल्डकपचा ​​अंतिम सामना अहमदाबादमध्ये आयोजित करण्याची काय गरज होती, असे चाहत्यांचे मत आहे. याशिवाय जय शाहने केवळ कमाईसाठी अहमदाबादमध्ये सामना आयोजित केला होता, कारण त्याला पैसे कमवायचे होते, असा आरोपही केला जात आहे. 

 अहमदाबादचे नांव पूर्वी मोटेरा स्टेडियमअसें होतें.तें जुने नाव बदलून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिवंत असताना "नरेंद्र मोदी स्टेडियम " ठेवले हे मोटेरा स्टेडियमच्या मातीला, खेळपट्टीला मान्य नव्हते. क्रिकेटचा सामना अहमदाबाद येथे असल्याने गुजराती व्यापाऱ्यांनी क्रिकेट मॅचचा सट्टा बाजार तेजीत केला. भारत हरला तरी चालेल पण त्या सामन्यामधून प्रचंड पैसा मिळाला पाहिजे ही व्यापारी भूमिका ठेवल्यामुळे सामन्याचे व्यापारीकरण झालें.   नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी भारतीय चाहत्यांना चांगलीच माहिती आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक सर्वात मोठी भूमिका बजावते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत केवळ पैशासाठी या मैदानावर अंतिम सामना ठेवणे टीम इंडियासाठी अडचणीचे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. 

भारतातल्या लाखो मंदिरामधून वैदिक पुरोहितांनी ओमहवन , पूजापाठ, यज्ञ करणे, लाखो नारळ फोडणे, उदबत्ती अगरबत्ती लावणे, कर्मकांड करुन भारतीय क्रिकेटच्या टीमचे मनोबल, शारीरिक क्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जगामध्ये भारतातल्या मंदिराच्या पुरोहितांचा नावलौकिक असा झाला कीं, भारत हा अवैज्ञानिक, "अतांत्रिकपणा", अविवेक, अंधश्रद्धा आणि कर्मकांडवादी भूमिकांचे समर्थन करत असल्यामुळे तो विश्वविजेता, विश्वगुरू, आणि महासत्ता बनू शकत नाही हे सिद्ध झालेलें आहें. तो संदेश जगात गेला

येथील पुरोहितांना असे वाटले कीं, कोरोना काळामध्ये  वाजवा टाळी आणि वाजवा थाळी याप्रमाणे होम हवन केले, त्याप्रमाणे याही वेळेस आपला वरचढपणा दाखवता येईल,  लाखो किलोचे तूप जाळले तर क्रिकेटच्या विश्वकप जिंकण्यामध्ये कर्मकांड अंधश्रद्धांचा आणि पुरोहितांचा सिंहाचा वाटा आहे असा संदेश जगात गेला असता. आता या अवैज्ञानिक, अविवेकी, आणि अंधश्रद्धानिर्माण करणाऱ्या लोकांना तांत्रिक मांत्रिकांना कोणते बक्षीस देणार? त्यांच्या विरुद्ध कोणती प्रतिबंधात्मक स्वरूपाची कार्यवाही करणार?

-------------------------------------------

Who got what in the Cricket World Cup !!
6558.80 crores to BCCI.
7-7 crore to Rohit, Kohli, Jadeja and Bumrah and Rs 6-6 lakh separately per match.
5-5 crore to the remaining player and 5-5 lakhs separately per match.
33 crores to the winning team.
The team that loses is 16.5 crore rupees.
19676.4 crore to ICC.
What did the blind devotees like us who are crazy about cricket got?
Money, waste of time, sadness of losing and depression.
Air companies, trains, buses, hotels, taxis, jerseys, stickers, flag sellers and betters have no idea how much they earned.
So now stop doing PhD on cricket and get involved in earning lentils and bread






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com