Top Post Ad

तेव्हा सचिन तेंडुलकर का गप्प होता

 *वर्ष 2019 ची गोष्ट*

विश्वचषक सामन्यात पाकिस्थान विरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळेस संपूर्ण भारतातील क्रिकेटप्रेमी निराश झाला होता, परंतू या पराभवाला खेळ म्हणून न स्वीकारता याचे खापर दीडदमडीच्या हिंदुत्ववादयानी मोहम्मद शामी याच्यावर फोडले होते, तो मुस्लिम आहें मुद्दामहून असा खेळला, स्टेडियम मध्ये जय श्रीराम चे नारे सुरू झाले, अगदी भारतभरात त्याचे पुतळे जाळले गेले, या गोष्टी मुळे कॅप्टन म्हणून विराट कोहली याने पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली, मोहम्मद शामी याची पाठराखण करत या हिंदुत्ववादयांना कणाहीन म्हणून सबोधले.

यावर हे दीडदमडीचे हिंदुत्ववादी आता मोहम्मद शामी सह विराट कोहली वर घसरले, ते इतक्या खालच्या आणि विकृत पातळीवर घसरले की विराट कोहली ला ट्रोल करता करता त्याच्या बायकोवर आणि मुलीवर (जी त्यावेळेस फक्त 10 महिन्यांची होती.) बलात्कार करण्याची धमकी देवू लागले, हे सत्र इथेच थांबले नाही मोहम्मद शामी व विराट कोहली च्या घराबाहेर जय श्रीराम चे नारे देत त्यांचे पुतळे जाळले, ते जिथे जातील तिथे जय श्रीराम च्या घोषणा देणे सुरू झाले, अशानें विराट कोहली सारखा खेळाडू नैराश्यात गेला, हे सलग दोन वर्ष सुरू होतं, या काळात नैराश्यात तविराट कोहली याने कॅप्टन पद सोडले, गृहमंत्री अमित शाह यांचा दिवटा जय शाह याच्या हातात असलेले भारतीय क्रिकेट मंडळ ही यावेळेस विराट कोहली च्या पाठीशी उभे राहिले नाही, याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला, शतकाची मशीन असलेल्या विराट कडुन या वर्ष 2020 व 2021 मध्ये एकही शतक होऊ शकले नाही.

विषय हा आहें की या काळात देशाच्या कॅप्टन सोबत हे घडत असताना स्वतः ला क्रिकेटचा देव समजणारा सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर किंवा धोनी यांच्यासह देशाचे प्रधानमंतत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळेस या हिंदुत्ववाद्याना शांत राहण्याचे आवाहन करून त्यांची चुकी दाखवून देणे ही अपेक्षा असताना त्यांनी शांत राहणे स्वीकारले, ज्या सचिन तेंडुलकरला 2011 च्या विश्व चषकानंतर खांद्यावर घेवून विराट कोहली याने फिरवले, त्या सचिन तेंडुलकरनें एक वाक्य जरी बोलला असता  की खेळात धर्म बघू नका, विराट कोहली याच्या सोबत मीउभा आहें, आणि या दीडदमडीच्या हिंदुत्ववाद्याना झापले असतें तरी सगळ्या देशाने पून्हा या खोट्या देवाला डोक्यावर घेतले असतें.

पण या सर्वांनी त्यावेळेस घाबरून शांत राहून हिंदुत्ववादी सरकारची पालखी वाहण्यात सुख मिळविले.

असो या वर्षीच्या 2023 च्या विश्व चषकात हिच दोघं विराट कोहली व मोहम्मद शामी हिरो म्हणून जागतिक स्तरावर आलेले आहेत, सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त विकेट तसेच सर्वात जास्त वेळ सामानवीर घेवून यांनी या दीडदमडीच्या हिंदुत्ववाद्याना मुस्काटात मारली आहें, व न बोलता हेच दाखवून दिले आहें की खेळाडू ला धर्म नसतो म्हणून दीड दमडीचे हिंदुत्ववादी त्यावेळेसही चुकीचे होते व आजही चुकीचे आहेत.

असो निदान आता या वेळेस या दीडदमडीच्या हिंदुत्ववाद्यानी विराट कोहली, त्याची पत्नी व मुलीची व मोहम्मद शामी यांची माफी मागावी, आणि मान्य करावं की खेळात धर्म नसतो. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जय शाह व सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर  यांनीही माफी मागावी आणि स्वीकारावं की राजकारणात धर्म आणू नये. चुकीला चूक म्हणत सत्य स्विकारल्याने माणूस मोठा होतो, शांत राहिल्याने तो षंढ ठरतो.


प्रमोद शिंदे

प्रवक्ता, मुंबई

संभाजी ब्रिगेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com