चेंबर मध्ये गप्पा सुरू असताना रावसाहेबानी बाबासाहेबांना सांगितले की,आज आपल्या महाविद्यालयात इतिहास मंडळाचे उदघाटन असून त्यानिमित्त इतिहासाचे गाढे अभ्यासक डाॅ. राधाकुमुद मुखर्जी यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.इतिहास म्हणजे बाबासाहेबांचा आवडता विषय.त्याना राहावले नाही.व्याख्यान ऐकण्यासाठी बाबासाहेब,माईसाहेब व रावसाहेब मिळून कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले.श्रोत्यानी सभागृह खच्चून भरले होते.बाबासाहेबांना पाहाताच विद्यार्थ्यानी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.मंचावर खुर्च्या मांडण्यात आल्या.डाॅ. बाबासाहेब आंबेडकराना मंचावर बसण्याची विनंती करण्यात आली.मात्र ती त्यानी नम्रपणे नाकारली.मी नियोजित आणि आमंत्रित वक्ता नाही,मी डाॅ.मुखर्जी यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलो आहे.आम्ही तिघेही मंचावर नव्हे तर मंचासमोर बसून व्याख्यान ऐकणार आहोत.आर्जव करूनही बाबासाहेबानी मंचावर बसण्यास नकार दिला.मंचावरील खुर्च्या खाली मंचासमोर ठेवण्यात आल्या.डाॅ.मुखर्जी यांचे संपूर्ण व्याख्यान डाॅ.बाबासाहेब,माईसाहेब व व्ही.जी.राव यानी समोर बसून ऐकले.
वास्तविक बाबासाहेब पीईएस द्वारा संचलित सिध्दार्थ महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष होते,भारताचे घटनाकार होते,विदेशातून उच्च पदव्या त्यानी प्राप्त केल्या होत्या परंतु ज्ञानाचा,पदाचा अंहकार कुठे ही दिसून आला नाही.विनम्रता हा महत्वाचा सदगुण त्यानी अंगी जोपासला होता.
बी. एन. साळवे यांच्या वॉलवरून
0 टिप्पण्या