Top Post Ad

फक्त सर्टिफिकेट घ्यायचं आणि मागास व्हायचं, हे जमणार नाही

 


 मराठा समाज मागास नाही, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. मागास असलेल्या कुणबीमध्ये घुसायचं आणि आरक्षण घ्यायचं, हा आरक्षणाचा मार्ग नाही. शिंदे समितीला कुणी अधिकार दिले, मागास सिद्ध करण्याचे. शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध आहे. त्यामुळे समितीला आम्ही घटनात्मकदृष्ट्या आव्हान देणार आहोत. समिती नेमूण कुणालाही मागास ठरवता येत नाही. शिंदे समिती ही नियमबाह्य असून तिला घटनात्मक अधिकार नाहीत. मराठा समाजाने मागासवर्गीयांचे भोग भोगलेले नाहीत. ते आम्ही भोगलेले आहे. फक्त सर्टिफिकेट घ्यायचं आणि मागास व्हायचं, हे जमणार नाही. असं स्पष्ट मत  ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं. तसेच त्याबाबतीतला व्यापक लढा उभा करत असल्याचेही ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील ओबीसी नेत्यांची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मराठा समाजावर खरमरीत टीका केली.  मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे मराठावाड्यामध्ये आमचे दोन मोठे मेळावे होणार आहेत. पहिला मेळावा अंबड इथं १५ तारखेला होत असून दुसरा मेळावा १६ तारखेला हिंगोली इथं होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असे विभागीय मेळावे होतील, असं शेंडगेंनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना शेंडगे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी या मागणीला समर्थन दिलेलं असून पारदर्शक प्रक्रिया ठरवण्याचं काम सुरु असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदी तपासाव्या अशी मागणी केली आहे.  शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासल्या त्याबरोबर ओबीसीतील सर्व वंचित जातीच्या नोंदी शोधाव्या आणि त्यासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी. कुणबी नोंदी शोधत असताना ओबीसीतील अनेक जातींना लाभापासून वंचित राहावं लागत कारण त्यांना वेळेवर नोंदी सापडत नाहीत. ६७ चे पुरावे न मिळाल्यामुळे ओबीसींना लाभापासून वंचित राहावं लागतात.आम्हाला देखील प्रमाणपत्रासाठी भटकावं लागतं  आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. सरसकट आरक्षणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधीक आत्महत्या विदर्भात होतात. ते ओबीसी आहेत. ओबीसी समाजाला सर्वकाही मिळते, अशी अफवा पसरवण्यात आली. तुम्ही (मराठा) येणार असाल तर आरक्षणाची टक्केवारी वाढवून घ्या, वेगळा प्रवर्ग घ्या, ओबीस आणि मराठा समाजाला दुखवू नका, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर सरकारमध्ये जर दम असेल तर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी  वडेट्टीवार यांनी केली आहे. आज विधानभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावरून छगन भुजबळांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे सूचक इशारा दिला आहे. “कुणीही अन्य किंवा ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये,”  ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  कुणबी दाखल्यावरून शिंदे समिती आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. तर, क्युरेटिव्ह पिटीशन माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल.”,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे पत्रकारांशी बोलत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com