Top Post Ad

'बौद्ध' विवाह 'कायदेशीर' आहेत का ?

   हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे रूढी परंपरेचे विवाह व सप्तपदी हा संस्कार विधी केलेले विवाह कायदेशीर आहेत. बौद्ध धर्मीय सप्तपदी किंवा हिंदूंच्या रुढीप्रमाणे लग्न करीत नसल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे लग्नास कायदेशीरपणा प्राप्त होत नाही असा आक्षेप घेतला जातो.

महाराष्ट्र राज्याच्या विधी आयोगाने नवव्या अहवालामध्ये बौद्धांच्या विवाहाची माहिती मिळविली. बौद्ध धर्मातील मान्यवर व्यक्तींनी आयोगाला कळविले, त्यात तत्कालीन  महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रा. सु. गवई  यांची विधी आयोगाने महत्वाची साक्ष  नोंदवली. ते म्हणाले,  "डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर वधु-वर त्रिशरण पंचशील म्हणतात व शेवटी तीन वेळा साधू म्हटल्यावर पुष्पवर्षाव केला जातो...त्यापूर्वी वधु - वर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात, त्यांना पती-पत्नी बाबतची शपथ दिली जाते व विवाह संपन्न होतो, असा विवाहविधी कोणीही बौद्ध व्यक्ती, उपासक किंवा भंते लावू शकतात."   

१४ ऑक्टोबर १९५६ ला देशभरातील लाखो दलित बांधवांनी नागपूर च्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग केला व बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे त्यांनी जुनी विवाहाची पद्धत सुद्धा सोडून दिली व नव्या बौद्ध पद्धतीस प्रारंभ केला, ती पद्धत कलम ३ अन्वये रूढी झाली आहे. 

मा. मुंबई उच्च न्यायालायासामोरच्या "बेबी जयंत जगताप वि  जयंत महादेव जगताप" या प्रकरणात वरील बौद्ध पद्धतीचा प्रश्न उपस्थित करून या पद्धतीला आव्हान दिले असता, मा.न्यायमूर्तींनी विधी आयोगाचा नववा अहवाल लक्षात घेतला, साक्षीदारांनी सांगितलेला बौद्ध विवाहाचा विधी हा अनेक वर्षापासून चालू असल्यामुळे हि पद्धत एक "रूढी परंपरा" असल्याचे मान्य केले. 

हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ (१) अन्वये बौद्धाने रूढी परंपरेने केलेला विवाह कायदेशीर ठरतो या प्रकरणात विधी आयोगाच्या नवव्या अहवालाचा उल्लेख केला आहे. 

धर्मांतरित बौद्धांनी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करावा या बाबत मुंबईच्या एका व्ही.एस. कर्डक नावाच्या शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली होती. त्या पत्राचे उत्तर बाबासाहेबांनी ४ डिसेंबर १९५६ ला (महापरीनिर्वानाच्या अगदी दोन दिवस अगोदर) दिले होते. बाबासाहेबांनी लिहिले होते कि, बौद्ध विवाहात सप्तपदी व हो

[१/११, ९:२५ PM] spakhale37@gmail.com: "बौद्ध विवाह"... "कायदेशीर" आहेत का ? 

हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे रूढी परंपरेचे विवाह व सप्तपदी हा संस्कार विधी केलेले विवाह कायदेशीर आहेत. बौद्ध धर्मीय सप्तपदी किंवा हिंदूंच्या रुढीप्रमाणे लग्न करीत नसल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ प्रमाणे लग्नास कायदेशीरपणा प्राप्त होत नाही असा आक्षेप घेतला जातो.

महाराष्ट्र राज्याच्या विधी आयोगाने नवव्या अहवालामध्ये बौद्धांच्या विवाहाची माहिती मिळविली. बौद्ध धर्मातील मान्यवर व्यक्तींनी आयोगाला कळविले, त्यात तत्कालीन  महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रा. सु. गवई  यांची विधी आयोगाने महत्वाची साक्ष  नोंदवली. ते म्हणाले,  "डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर वधु-वर त्रिशरण पंचशील म्हणतात व शेवटी तीन वेळा साधू म्हटल्यावर पुष्पवर्षाव केला जातो...त्यापूर्वी वधु - वर प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात, त्यांना पती-पत्नी बाबतची शपथ दिली जाते व विवाह संपन्न होतो, असा विवाहविधी कोणीही बौद्ध व्यक्ती, उपासक किंवा भंते लावू शकतात."   

१४ ऑक्टोबर १९५६ ला देशभरातील लाखो दलित बांधवांनी नागपूर च्या दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग केला व बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे त्यांनी जुनी विवाहाची पद्धत सुद्धा सोडून दिली व नव्या बौद्ध पद्धतीस प्रारंभ केला, ती पद्धत कलम ३ अन्वये रूढी झाली आहे. 

मा. मुंबई उच्च न्यायालायासामोरच्या "बेबी जयंत जगताप वि  जयंत महादेव जगताप" या प्रकरणात वरील बौद्ध पद्धतीचा प्रश्न उपस्थित करून या पद्धतीला आव्हान दिले असता, मा.न्यायमूर्तींनी विधी आयोगाचा नववा अहवाल लक्षात घेतला, साक्षीदारांनी सांगितलेला बौद्ध विवाहाचा विधी हा अनेक वर्षापासून चालू असल्यामुळे हि पद्धत एक "रूढी परंपरा" असल्याचे मान्य केले. 

हिंदू विवाह कायद्याच्या कलम ७ (१) अन्वये बौद्धाने रूढी परंपरेने केलेला विवाह कायदेशीर ठरतो या प्रकरणात विधी आयोगाच्या नवव्या अहवालाचा उल्लेख केला आहे. 

धर्मांतरित बौद्धांनी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करावा या बाबत मुंबईच्या एका व्ही.एस. कर्डक नावाच्या शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली होती. त्या पत्राचे उत्तर बाबासाहेबांनी ४ डिसेंबर १९५६ ला (महापरीनिर्वानाच्या अगदी दोन दिवस अगोदर) दिले होते. बाबासाहेबांनी लिहिले होते कि, बौद्ध विवाहात सप्तपदी व होमाची काहीच आवश्यकता नाही. अगदी सध्या पद्धतीने विवाह संपन्न करावा. एक मातीचा पाण्याने भरलेला घडा ठेवा, त्यामध्ये लांब धागा ठेवा, त्याचे एक टोक वरच्या हातात व दुसरे वधूच्या हातात ध्यावे. वधुवर शुभ्र वस्त्र परिधान करून उभे राहतील. कुणीही एखाद्याने मंगलसुत्त म्हणावे अशी साधी पद्धत असावी. 

तसे पाहता बाबासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ कधीही मिटवता येणार नाही... 

परंतु विधी आयोग आणि "बेबी जयंत जगताप विरुद्ध जयंत महादेव जगताप "(1981 महाराष्ट्र लौ जर्नल पेज ६१४ ) या  उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...."बौद्ध विवाह...कायदेशीर" आहेत. 

( टीप - बौद्ध, जैन, शीख यांच्या विवाह, वारसा दत्तक या सामाजिक बाबींचे नियमन हिंदू विवाह कायदा १९५५, हिंदू वारसा कायदा १९५५, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा १९५६ आणि हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५५ मध्ये केलेले आहे. या कायद्यांच्या कलम २ नुसार ते कायदे बौद्ध, जैन, शीख यांना लागू केलेले आहेत. हि तरतूद भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलातून जशीच्या तशी घेतली आहे. तसेच जवळजवळ सर्वच तरतुदी हिंदू कोड बिलातून घेतलेल्या आहेत. ) 

लेख - अॅड.राज जाधव, पुणे...!

(अधिक वाचा - http://advrajjadhav.blogspot.in/2015/08/blog-post.हटमळ)

बाबासाहेबांनी घडवून आणला होता बौद्ध पद्धतीचा पहिला विवाह...

नरेंद्र आणि इंदुमती यांचा विवाह निश्चित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्रिसरण, पंचशील ग्रहण करावे. वरळी स्थित बुद्ध विहारातील सिलोनी भिक्खूंना पाचारण करावे. दोघांनीही आपल्या पसंतीनुसार कपडे खरेदी करावे. मुंडावळ्या, हळद नको. अशाप्रकारे अगदी साध्या पद्धतीने विवाह करा, असे सांगतानाच बाबासाहेबांनी विवाह समारंभासाठी स्वतः पाली गाथा लिहून दिल्या. १३ मे १९५६ रोजी हा मंगलसोहळा पार पाडला. बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणलेला भारतातील तो पहिलाच विवाह होता. आज त्या विवाहाला ६२ वर्षे होत आहेत.

……………इंदुमती ही बाबासाहेबांचे पांचगणी येथील निकटवर्तीय सहकारी सदाशिवराव बंदीसोडे यांची थोरली कन्या होती. कॉलेजच्या शिक्षणाकरिता ती पांचगणीहून मुंबईला आली होती. त्याच सुमारास बाबासाहेबांचे कार्य जोमाने सुरू होते. अनेकांचे त्यांचेकडे जाणे-येणे सुरू होते. त्यामुळे बाबासाहेब इंदुमतीला ओळखायचे. बाबासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येचे नाव इंदू होते. त्यामुळे या इंदुमतीबद्दल बाबासाहेबांना अतिशय जिव्हाळा होता. इंदुमतीची आस्थेने विचारपूस करताना बाबासाहेब तिला म्हणाले, 'तुला मुंबईत एकटे राहायचे असेल आणि पुढचे शिक्षण घ्यायचे असल्यास प्रथम विवाह कर.' ती म्हणाली, 'बाबा मी आता कुठे इंटरला आहे. मला ग्रॅज्युएट तरी होऊ द्या.' यावर बाबा म्हणाले, 'मुली तुला विवाहानंतरही उच्च शिक्षण घेता येईल.' वडिलांना कळव आणि नरेंद्रच्या कुटुंबीयांना भेटून लग्न पक्के कर, अशी सूचना सूचना केली. त्यावेळी बाबासाहेबांकडे सेक्रेटरी म्हणून नरेंद्र कार्यरत होता. बाबासाहेबांनी नरेंद्रला विचारले, 'माझ्याबरोबर काम करत राहणार की घरसंसार करणार? मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे विवाह करणार का?' यावर नरेंद्रने होकार दिला होता.

विवाहाचा दिवस आला. या मंगल परिणयाला बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाची स्वर्णिम किनार लाभली होती. प्रा. एन. एम. कांबळे आणि इंदुमती कांबळे या उभय वर-वधूला भन्तेजींनी समोरासमोर उभे केले. त्रिशरण-पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची बाबासाहेबांची खूप इच्छा होती, मात्र प्रकृती अस्वास्थामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. तरी विवाहाच्या दिवशी त्यांनी स्वतःची मोटार पाठविली. समता सैनिक दलाचा बॅण्ड पाठवला. दोन गुलाबाचे हारही पाठविले होते. या विवाह समारंभाला जगन्नाथ भातनकर, जी. के. माने, बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते आदी उपस्थित होते.

कांबळे दाम्पत्याला चार अपत्ये झालीत. तीन मुलगे व एक मुलगी. मोठा मुलगा नौदलात कॅप्टन पदावर कार्यरत आहे. दोन मुले डॉक्टर आहेत. मुलगी मोनिका सावंत सोमय्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असून त्या इंदुमती कांबळे संस्थेच्या अध्यक्ष आहेत. कांबळे यांनी नुकतीच आपल्या आयुष्याची ९४ वर्षे पूर्ण केली असून पक्षाच्या प्रत्येक कार्यात ते आजही सक्रिय आहेत. पत्नी इंदुमती कांबळे यांचे पाच-सहा वर्षांपूर्वी निधन झाले.

*बौद्ध समाजातील विवाह कसा व्हावा हे सांगणारे एक पत्र बाबासाहेबांनी सिद्धार्थ रात्र प्रशालेतील उपमुख्याध्यापक कर्डक यांना ४ डिसेंबर १९५६ रोजी लिहिले होते. त्या पत्रात बाबासाहेबांनी नमूद केले होते, बौद्ध धम्मात विवाहाची पद्धत अगदी साधी-सोपी आहे. त्यात हवन नाही आणि सप्तपदी नाही. वधू आणि वराच्या मधोमध नवे मडके स्टूलवर ठेवावे. ते काठोकाठ पाण्याने भरावे. एक सुती दोर मडक्याच्या पाण्यात ठेवावा आणि त्याची दोन टोके वधू आणि वर यांनी धरावी. कुणीतरी एकाने मंगलसुत्त म्हणावे. वधू-वरांनी पांढरी वस्त्रे परिधान केलेली असावीत.'

🔹बौद्ध विवाह पद्धती साधी व सोपी🔹

1) न मंगलसूत्र

2) न हळद

3) न कुंकू

4) न बँड-बाजा

5) न हिरव्या बांगड्या

6) न हिरवा मांडव

7) न पायातील जोडवे  न पायातील पट्ट्या

 हे सर्व आपल्या 14 ऑक्टोम्बर 1956 च्या पूर्वश्रमीच्या धर्मातील जुन्या रूढी-परंपरा आहेत ज्या दुर्दैवाने आपण आजही त्यात अडकलेली आहोत.

   🔹  बुद्ध धम्म शिकवतो विज्ञानवादी दृष्टिकोन, वधू-वराने पांढरे शुभ्रवस्त्र धारण करून पाण्याचा पूर्ण भरून गळवा व त्याला कॉटन चा थ्रेड/ धागा वधू वराने हातात घेऊन मंगल गाथेचे पठण करावे व बौद्ध लग्न विवाह पद्धत पार पाडावी. 

संदर्भ- 4 डिसेंम्बर 1956 ला डॉ- बाबासाहेबांनी  भिमराव कर्डक यांना लिहिलेलं पत्र. 

समाज माध्यमातून साभार....

सद्धम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.

सुधाकर ग्यानुजी पखाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com