भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना देशाला अर्पण केली. भारतीय संविधानामुळे मनुस्मृतीच्या कायद्याच्या गुलामीच्या बंधनातून सर्व भारतीय नागरीक मुक्त झाले. खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. तो दिवस म्हणजे दिनांक २६ नोव्हेंबर हा सुवर्ण दिवस म्हणून सर्व भारतीय नागरिक दरवर्षी साजरा करीत असतात. यावर्षी देखील भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्हा विभागीय कमिटी, ठाणे तालुका कमिटी व ठाणे शहर कमिटी तसेच तमाम संविधान प्रेमी जनतेच्या विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी ठाणे मानपाडा ते कोर्टनाका येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भारतीय संविधान गौरव रॅलीचे काढण्यात आली होती.. सदर रॅलीस मानपाडा, पातळीपाडा, डोंगरीपाडा, आदी विभागातील संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोर्ट नाका येथे संविधान उद्देशिकेचे वाचन करून या रॅलीची सांगता झाली.
कोकण विभागीय अध्यक्ष रवींद्र गुळचर , ठाणे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाढविंदे, ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष मंगला यशवंत बिरारे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजयविश्व गायकवाड, ठाणे जिल्हा संघटक गणेश बहारे, विभागीय अध्यक्ष, रमेश जाधव ,विभागीय सचिव चंद्रकांत कांबळे ठाणे तालुका अध्यक्ष यशवंत बिरारे, ठाणे ठाणेतालुका संघटक कैलास धनेश्वर,ठाणे तालुका संस्कार लीला पवार, ठाणे शहर अध्यक्ष सुनिता धनेश्वर , ,फुलाताई जाधव , कासारवडवली विभाग अध्यक्ष रंजना मुन,मेघा सेंडे रेश्मा कांबळे,मंगेश कांबळे,सुमित सेंडे,अनिल आठवले,संदिप कर्डक,बाळू सोनावणे, संगिता घुगे, सुनिता सोनावणे, निर्मला कांबळे, ममता बिरारे दिलीप पवार, संदीप रणवीर, प्रल्हाद जाधव, क्षिरसागर, भुपती मोरे, सुभाष सोमा कांबळे, तसेच नवी मुंबईहून युवराज खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारत देशातील नागरिकांचे उद्धारकर्ते विश्वरन भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रदिन २ वर्षे ११ महिने १८ दिवस आपल्या विद्या विभूषण विद्वत्तेने, बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या ध्येय व उद्देशाने भारतीय संविधान लिहून मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक मुलभूत हक प्राप्त करून दिले आहेत, म्हणूनच आर्थिक, सामाजिक, सैक्षणिक व राजकीय स्वरांवर पुरुष व महिला समान हकांचे आपण जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना भविष्यात हक्काचे जीवन त्यांनी प्रथम अपमान व हालअपेष्टा सहन केले. हे आपण अनेक पिढ्यान पिढ्या विसरू शकत नाही. कारण भारतीय संविधानातील तरतुदींमुळे तमाम भारतीय नागरिक मग ते स्त्री असो अथवा पुरुष यांचे शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे करणेस हक्क प्राप्त झाल्याने विकास झाला. त्यामुळे सामाजिक दृष्ठीने आपण समाजाचे देणे आहोत, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश असा आहे की, आपल्या उत्पन्नातून विसावा हिस्सा समाज कार्यासाठी खर्च करावे हा संदेश आपण विसरता कामा नये.
महाराष्ट्र हे वैचारिक दृष्ट्या प्रगत राज्य समजले जाते. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून संबोधले जाते. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व इतर सुधारणावादी नेत्यांच्या धोरणातून व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकांड पांडित्यातून व असीम त्यागातून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती काही प्रमाणात झाली आहे. देशात असलेले बैसर्गिक संसाधने व देशाने केलेली प्रगतीची भागिदारी / हिस्सा हा जाती जातीमधील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रामाणिकपणे विभागणी झालेली नाही. त्यामुळे गरिबी रेषेखाली २७.५%, कुपोषणात १६.६% आणि बेकारी-बेरोजगारी ८.११% प्रतिशत देशातील नागरिक जीवन व्यतित करीत आहेत. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थ व्यवस्था आहे. कुणीही श्रीमंत होण्याला हरकत नाही, परंतु कुपोषीत मोठा घटक निर्मीत होण्यावर हरकत घेतलीच पाहिजे. राष्ट्र उभारणीत अर्थकारणाचे फार मोठे महत्त्व आहे आणि या अर्थकारणाचा लाभ राष्ट्राच्या शेवटच्या घटक माणसापर्यंत पोहचला तरच ते राष्ट्र सक्षम आणि सुरक्षितरित्या वाटचाल करू शकते.
म्हणून डॉ. बाबासाहेबांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला राष्ट्राला प्रबोधन करित असतांना म्हणाले की आपण राजकीय समता प्रस्थापित केलेली आहे. परंतु आर्थिक समानता जो पर्यंत प्रस्थापित होणार नाही तो पर्यंत संविधानीक लोकशाही राष्ट्राचा डोलारा आर्थिक विवंचनेत सापडलेले नागरिक हा डोलारा कधिही उध्वस्त करतील हे सांगता येणार नाही. आर्थिक समानता देशातील नागरिकांमध्ये आणणे अत्यावश्यक आहे. संविधानाच्या ७४ व्या वर्षानंतर सुध्दा देशातील नागरिकांना गरिबी रेषेखाली, कुपोषणग्रस्त व बेरोजगारी समस्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे देशातील नागरिकांचे कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य बिघडतच चालले आहे. तेव्हा देशातील सर्वच बहुजन समाजाला एकत्र संघटीत होऊन संविधानाची मुल्ये खऱ्या अर्थाने आमंलात आणण्यासाठी संघर्ष उभा करणे गरजेचे आहे. तेव्हाच देशातील सामान्य नागरिकाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व आरोग्याच्या समस्या कमी होतील व तेव्हाच सामाजिक समतेची सरमिसळ होऊन देशात काँटुबिक व सामाजिक स्वास्थ्य लाभुन जगात भारत देश विकसित उदयास येईल, याची सक्त ताकीत बहुजनानी घेणे आवश्यक आहे. असे आवाहन सुभाष सोमा कांबळे आणि त्यांचे सहकारी डॉ. मिलिंद रणवीर, संजय जाधव, संजय खरात, डॉ. शशिकांत शिंदे, अॅड. प्रविण आसगेकर, तुकाराम पोटे भूपती मोरे, . राजाराम होल्लम, संजय मोरे, विश्वनाथ थोरात, . राजेश जाधव, यांनी संविधान प्रचार-प्रसारक, महाराष्ट्र संघटकच्या माध्यमातून यावेळी केले.
0 टिप्पण्या