Top Post Ad

ऐन दिवाळीसुट्टीत बांधकामास सुरुवात... दहिसर-चुनाभट्टी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात


मुंबईतील दहिसर पुर्वेला  एस.एन.दुबे रोडवर असणारी म्हाडाची  दहिसर चुनाभट्टी नावाने प्रसिद्ध वसाहत आहे. या वसाहतीत असणारी श्रमिक गृहनिर्माण संस्था हया संस्थेच्या इमारतींचे रिडेव्हलपमेंन्ट करण्याचा प्रस्ताव म्हाडाला देण्यात आला आहे. परंतु म्हाडा मार्फत अद्यापही या ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आलेली नाही तसेच  सीसी देखील देण्यात आलेली नाही. असे असतानाही या ठिकाणी बांधकाम सुरु करण्यात आले असल्याने परिसरातील लोकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या बांधकामाला कोणत्या खात्यामार्फत परवानगी देण्यात आली आहे  असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

सध्या दिवाळीचा मौसम सुरु आहे. या निमित्त असलेल्या सुट्टीच्या संधीचा फायदा घेऊन या ठिकाणी बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. विकासकाने  खड्डे मारण्याचे काम सुरु केले आहे.   विकसकाने सुरू केलेल्या हया कामामुळे येथे प्रचंड प्रमाणात माती, धुळ उडत आहे. त्यातच दिवाळी असल्याने फटाके वाजवत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरु झाला आहे.

मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ता कमी कमी झाली आहे. याचा परिणाम जीवनमानावर झाला आहे. दिपावलीनिमित्ताने हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने 5 नोव्हेंबर रोजी आक्रमक भूमिका घेतली. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. काही दिवस बांधकामे बंद राहिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेला बांधकाम बंदीबाबत हायकोर्टाकडून अखेरची संधी देण्यात आली असल्याने कोर्टाने स्पष्ट केलं आहे.  हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करणार असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहनं ताडपत्रीनं पूर्णपणे झाकणं बंधनकारक असून फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही, असं असताना दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन करा, असं देखील हायकोर्टाने सांगितलं. 

 या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, प्रयावर विभागाचे सचिव आणि विविध महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालय, पर्यावरण विभाग आदींच्या सुचनांचे पालन करा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. असे असताना देखील दहिसर चुनाभट्टी परिसरात बांधकामाला कशी काय सुरुवात झाली. कोणत्या अधिकाऱ्याने या बांधकामाला परवानगी दिली. ऐन सुट्टीच्या मौसमात येथे खड्डे करण्यास कशी काय सुरुवात झाली असे अनेक प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. 

विकासकांनी तेथे कोणत्या प्रकारची संरक्षण भिंत उभी केली नाही की ज्यामुळे तेथी आजूबाजूस राहणाऱ्या रहिवाशानां त्रास होत आहे. म्हाडा अधिकारी वर्गाने त्वरित तेथे सुरु असलेले  सदर बेकायदेशीर बांधकाम थांबवून विकासकावर कारवाई करावी.तसेच विकासका जवळून आजूबाजूच्या रहिवाशांना माती, धुळीच्या कणाचा त्रास होणार नाही हया गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून घेऊन नंतरच बांधकाम सुरु करण्यासबंधीत परवांणगी द्यावी. अशी मागणी  सामाजिक कार्याकर्ता नित्यानंद हिरवे.यानी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com