Top Post Ad

... अशा व्यक्तीपासून समाजाने सावध राहिले पाहिजे

 


     शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना मधील  १० ऑक्टोबर २०२३ च्या अग्रलेखात शरद पवार विषयी खळबळजनक माहितीचा गौप्यस्फोट केला.बहुचर्चीत गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात आरोपी असलेल्या अमित शहा यांना जामीन मिळवून देण्यात राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी मदत केली.आणि ती माहिती सत्य आहे.असा विश्वास सामना आपल्या अग्रलेखात देतो. त्यामुळे पवारांचा खरा विद्रुप चेहरा पुढे आला.तशी ही त्यांची प्रतिमा कधीही स्वच्छ राहिली नाही.नानाविध गंभीर आरोपांनी न्हावून आहे.त्यांचे आज पर्यंतचे चाल,चलन व चरित्र तसे राहिले आहे.ते अनेकांचे मित्र असले तरी,राजकारणात ते कुणाचेही विश्वास पात्र ठरु शकले नाहीत.

      जेव्हा गोध्रा हत्याकांड घडले तेव्हा केंद्रात कांग्रेस प्रणित युपीए सरकार होते.त्यात शरद पवार युपीएचे घटक पक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री होते.आणि गुजरात मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे राज्य सरकार होते.त्यात अमित शहा हे मंत्री होते.आता केंद्रात प्रधानमंत्री मोदी नंतर दुसऱ्या क्रमांकावर गृहमंत्री आहेत.सर्वांना चांगले ज्ञान आहे, गोध्रा हत्याकांड आणि त्या नंतर गुजरात मध्ये उद्भवून आणलेले नरसंहार मानवतेला काळिमा फासणारे होते.ते घडवून आणण्यास मोदींचे राज्य सरकार पध्दतशीर सहभागी झाले होते.असा ठपका केंद्रातील युपीए सरकारचा होता.त्यातील एक प्रकरण सद्या बिल्कीस बानो बलात्कार व तिच्या नातेवाईकांची क्रूरपणे हत्या प्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या गुन्हेगार नराधमाच्या सुटकेवरुन चर्चीत आहे.अशा प्रकरणातील आरोपी अमित शहा यांना जामीन मिळवून देण्यात तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मदत केली,अशी माहिती दैनिक सामना मधून येते म्हणजे शरद पवार यांची कृती बळीराजाचा बळी घेण्यासाठी वामनावतार घेणाऱ्या कपटी,षडयंत्री विष्णू सारखी समाज घातक आहे.ती अक्षम्य आहे.

ब्राह्मणेत्तर समाजात शरद पवार सारख्यांच्या रुपाने वामनावतारी पैदा झाल्याने या देशातील लोकशाहीला अपेक्षित परिणाम साधता आले नाही.बदनाम बिचाऱ्या शुक्राचार्याला करण्यात आले.आणि वामनाची अनौरस ओलांद मजा मारत जगते आहे.आज फुले-शाहु-आंबेडकरांच्या कर्मभूमीत पुन्हा पेशवाई अवतरलेली दिसत असेल तर त्याला देखील शरद पवार यांचे पाठबळ राहिल्याचे कोणी नाकारू शकत नाही.त्या अकुशल कर्माचे भोग,पवार आयुष्याच्या अखेरच्या वाटेवर भोगत आहेत.शरद पवार यांची पांच-सहा दशकातील राजकीय खेळी लक्षात घेतली तर त्यांना आम्हीच काय तर कोणताही जाणकार व्यक्ती या युगातील कृष्णा भास्कर कुलकर्णी या गद्दाराचा कृतीशील वंशजच शोभून दिसेल असे म्हटल्या शिवाय राहणार नाही.अमित शहाला तेव्हा जामीन मिळाला नसता तर देशाचे राजकीय चित्र आज सारखे भयकंपीत व त्रस्त नसते.गुंड प्रवृत्ती आज सत्तेच्या शिरोधार्य पोहचून हुकूमत गाजवत आहे.पवारांनी कदापि आपल्या आपसी संबंधातून अमित शहाला तेव्हा मदत केली असेल.पण या छोट्या कृत्याचे अत्यंत वाईट परिणाम देशाला आज भोगावे लागले आहेत.

        शरद पवारांनी प्रारंभी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील-नाशिकराव तिरपुडे यांच्या सरकार मध्ये मंत्री राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून पहिल्यांदा आपल्या नेतृत्वात पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार स्थापन केले होते.त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाजवादी म्हणून पाठबळ होतेच.शिवाय उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या प्रभावाचा दलित द्वेष ही होता.याच द्वेषातून मुख्यमंत्री म्हणून मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव पारीत करुन घेतला.जेव्हा की नामांतराची मागणी फारशी कोणत्याही आंबेडकरी संघटने कडून झाली नव्हती. आणि लागलीच दुसऱ्या बाजूने मराठवाड्यात दलित,बौध्दां विरुद्ध आग पेटवली.यात काही बिल्कीस बानो सारख्या घटना घडल्यात.अल्पसंख्यांक व साधनहिन दलित-बौध्दांच्या घरादाराची राखरांगोळी झाली.हा इतिहास लपून राहिला नाही.

त्यापुढे २३ नोव्हेंबर १९९४ रोजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच समोर नागपुरात घडवून आलेले गोवारी आदिवासी हत्याकांड ही विसरता येणार नाही.यात ११४ जणांचा पवारांनी आपल्या पोलिसांकडून हकनाक बळी घेतला होता.त्या अगोदर १९९२-९३ मधील मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगल ही विसरता येणार नाही.तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंबई-ठाण्यातील अंडरवर्ल्ड माफिया विरुद्ध धडाक्यात पोलिस कारवाई सुरू केली होती.यात त्यांनी तेव्हा शरद पवार यांच्या सोबत राजकीय संबंध असलेल्या पप्पू कलानी यांनाही सोडले नाही.अशा छुप्या समर्थकांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला होता.असे म्हणतात,या कारवाई दरम्यान मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक दिल्ली वरुन येणारे फोन उचलत नव्हते.त्यांना पदावरून घालविण्यासाठी मुंबईत तेव्हा दंगल घडवून आणल्या गेली.त्यात एका प्रामाणिक व कर्तबगार मुख्यमंत्री नाईकांचा पदावरून बळी घेतल्या गेला.व शरद पवार हे राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

अनेक निरपराधांचे बळी घेतल्या नंतर दंगल आटोक्यात आली.त्यात अंदाजित ५७५ मुस्लिम, २७५ हिंदू व ५० इतर मृतक होते.याची चौकशी करण्यासाठी केंद्रातील पी.व्ही.नरसिंहाराव सरकारने न्या.श्रीकृष्ण आयोग बसविला होता.त्याच बरोबर राजकारणी व अंडरवर्ल्ड माफिया यांच्या संबंधांची गुप्त चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातील व्होरा नामक एका बड्या अधिकारीच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली होती.त्या समितीच्या अहवालात महाराष्ट्रातील बऱ्याच राजकारण्यांचा अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा उल्लेख आहे.याची वाच्यता नेहमी ब्रिगेडीयर सुधीर सावंत करतात.बाबरी मशिद पाडण्यात ज्या संशयातून तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंह राव यांच्या कडे पाहिले जाते,तसाच संशय तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या वर घेतला जातो.कारण तेव्हा बाबरी मशीदला लष्कराचे संरक्षण दिल्या गेले होते.

         शरद पवार हे नेहमी सत्तेचे राजकारण खेळत, त्यांनी जसे आपल्या पवार घराण्याचे महाराष्ट्रात साम्राज्य निर्माण केले तर त्यांनी फुले-आंबेडकरांचे नाव घेत आपल्या काही चाहत्यांतून नवसरंजाम देखील निर्माण केले.या साध्यतेसाठी त्यांची राजकीय भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे.यात त्यांनी फुले-आंबेडकरी विचारांच्या ध्येयनिष्ठ सामाजिक व राजकीय चळवळींना संपविण्याचा प्रयत्न केला.शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष,डावे व समाजवादी पक्ष आणि संघटनांचा उल्लेख करता येईल.या विपरीत त्यांची भूमिका शिवसेना,भाजपला बळ देणारी राहिली आहे. ते आंबेडकरी समाज व चळवळीच्या विरोधात मनापासून राहिले.अलीकडे महाराष्ट्रात दलित,बौध्दांवरील अत्याचारांच्या घटना घडवून आणल्या गेल्यात,त्याला राजकीय गोळाबेरीजेचा गंध दिसतो.त्या दडपून टाकण्यात पवार व त्यांचे सहकारी छुप्या पद्धतीने विशेष सक्रिय राहिलेत.

मुंबईच्या घाटकोपर, रमाई नगर मधील १९९७ मधील बौद्धांचा सरकारी हत्याकांड घडवून आणणाऱ्या फौजदार मनोहर कदमाला राष्ट्रवादी पक्षाचे पाठबळ लपून राहिले नाही.नंतर तोच मनोहर कदम हा सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याची बातमी झलकली होती.पुणे,सांगली हे राष्ट्रवादी पक्ष नेत्यांचे गड आहेत.याच भागात छुपा संघी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे कार्यक्षेत्र त्यांना देखील मदत करणारे कोण राहिले,हे आता सांगण्याची गरज नाही.मां जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगणाऱ्या स्वयंसेवक भट पुरंदरे यांना आश्रय देणाऱ्यात शरद पवार राहिले आहेत.

       ओबीसी जनगणनेचा प्रस्ताव नाना पाटोळे यांनी विधानसभेत आणला होता, तेव्हा त्या प्रस्तावाला विरोध करणारे नवाब अजित पवार होते.हे ओबीसींनी विसरु नये.१९९४ मध्ये शिवसेना-भाजप सरकारला महाराष्ट्राच्या गादीवर विराजमान करण्यात शरद पवारांचा अपक्ष आमदारा मार्फत दिलेला पाठिंबा तर सर्वांना माहीत आहे.तेथून महाराष्ट्रात भाजपला आपले पाय घट्ट करण्यास शक्ती मिळाली.मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदावरील पसंती शरद पवारांची होती,हे सेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितले.आताही नाशिक मधील एका संघी भटा सोबत त्यांचे व्यवसायिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत.त्यांच्या मदतीने त्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात ब्राह्मणांची बैठक घेतली होती. 

पवार म्हणजे राजकारणातील एक प्रकारे दबंग डॉन म्हणता येईल.ते सत्तेच्या भरवशावर अनेकांचे लाभ पुरुष ठरले.म्हणून त्यांचे विरोधी पक्षात देखील समर्थक आहेत.त्यातून त्यांनी आपल्या हितचिंतकांचा एक मोठा गोतावळा निर्माण केला होता.त्यात नरेंद्र मोदी,अमित शहा, देवेंद्र फडणवीस पंत, नितीन गडकरी आदींची नावे घेता येतील.म्हणून प्रधानमंत्री होताच शरद पवारांनी नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंत यांना आपल्या बारामतीत निमंत्रित करून त्यांचा शाही सत्कार केला होता.तोंड भरुन मोदींचे कौतुक केले होते.त्यात मोदी, फडणवीस यांनी पवारांच्या मदतीसाठी कृतज्ञता व्यक्त करुन गुरूचे स्थान दिले होते.

         असे अनेक कारनामे लक्षात घेतल्या नंतर शरद पवारांच्या भूमिके वरुन ते तर छुपे स्वयंसेवक असल्याचा भास होतो.त्यांची भूमिका ही कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर प्राणघातक वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी सारखी तर कधी  तथाकथित पुराण कथेमधील बळी राजाला पाताळात घालणाऱ्या विष्णू अवतारी वामना सारखी दिसते.जे काही असेल,पण ती बहुजन समाजाला शेवटी मोठी मारक आहे.फुले-आंबेडकरी विचाराला घातक आहे.अशा व्यक्ती व वल्ली पासून महाराष्ट्रातील बहुजन समाजाने सावध राहिले पाहिजे.

 मिलिंद फुलझेले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com