ऐन नवरात्रौत्सवात टेंभीनाक्यावर चित्रिकरण
आनंद दिघे यांनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या नवरात्रोत्सवात दिघे यांच्या हस्ते होणार्या अष्टमीच्या आरतीची आठवण जुणे जाणते ठाणेकर आजही सांगतात. तोच प्रसंग प्रसाद ओक यांनी जिवंत करत दिघे यांच्या आनंदाश्रमातून दिघे यांच्याच 'आरमाडा' गाडीतून टेंभी नाक्यावर एन्ट्री घेतली. यावेळी प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी हे क्षण कॅमेर्यात कैद केले. चिञपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी चिञपटाचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा रविवारी ठाण्यात संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवराञोत्सवात केली होती. त्यानुसार लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पहिल्या भागाप्रमाणेच हा भाग देखील दर्शकांच्या पसंतीला उतरेल. असा आशावाद व्यक्त होत आहे. ऐन निवडणुकीच्या हंगामात हा चित्रपट प्रसारित होण्याची शक्यता असल्याने याचा किती फायदा कोणाला होईल याची चर्चा मात्र ठाणेकरामध्ये रंगली होती.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने सुनावणी वेळापत्रक सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे. यावरुन शिंदे गटातील आमदार-खासदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. जर आपण अपात्र झालो, तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची, असा प्लान शिंदे गटाच्या आमदार-खासदारांनी केल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे. .
0 टिप्पण्या