Top Post Ad

जातीय द्वेषातून केलेली याचिका अखेर कोर्टाने रद्द केली


   दीक्षाभूमी येथे देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या धम्म अनुयायी पुस्तकप्रेमी अभ्यासक यांच्या विरोधात चुकीचे आरोप लावत करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावत रद्द केली आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्थानिकांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका (पीआयएल) ‘अप्रासंगिक’ असल्याचे सांगून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 25 ऑक्टोबर 2023 बुधवारी फेटाळून लावली. 

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून राज्याच्या दुसऱ्या राजधानीत मोठ्यासंख्येने प्रवास करणाऱ्या लोकांमुळे गैरसोय होत असल्याचा दावा करत याचिकाकर्ते अविनाश विष्णुपंत काळे यांनी जनहित याचिका दाखल केली होती.या संदर्भात ऍड. अविनाश काळे यांच्या तर्फे ऍड कळमकर यांनी बाजू मांडली तर रेल्वे तर्फे सौरभ चौधरी, तसेच मध्यस्ती अर्ज सादर करणारे अनिकेत कुत्तरमारे, वैभव कांबळे, आशिष फुलझेले, सिद्धांत पाटील यांच्या वतीने ऍड. पायल गायकवाड व ऍड. राहुल तेलंग,दीक्षाभूमी स्मारक समिती तर्फे ऍड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.

दीक्षाभूमी वर भेट देण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या विरोधातील ही याचिका अप्रासंगिक सांगून रद्द केली याचिकेच्या संदर्भात न्यायालयाने विचारलं की, रेल्वे व इतर प्रशासनाद्वारा योग्य त्या सुविधा पुरविल्या जातात काय? यावर सौरभ चौधरी यांच्याकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले. यावेळी ऍड. पायल गायकवाड यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, याचककर्त्यांनी गुंडशाही आणि झुंडशाही हे शब्द केवळ आकसापोटी वापरले आहेत. ६७ वर्षाच्या धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमात मोठ्या संख्येने अनुयायी शिस्तीने दीक्षाभूमीला येत असतात.आजवर एकही अपघात, पोलीस तक्रार, चेंगराचेंगरीची घटना इथे झालेली नाही हे आंबेडकरी अनुयायांमध्ये असणारी स्वयंशिस्त दाखवते.

सदर याचिका ही केवळ जातीय मानसिकतेतून टाकण्यात आली आहे. ऍड. तेलंग यांनी बाजू मांडताना म्हटलं की, याचिका कोणत्याही प्रकारे प्रासंगिक नाही. दीक्षाभूमी तर्फे ऍड. शैलेश नारनवरे यांनी सांगितले कि याचिका ही एका संकुचित मानसिकतेतून टाकण्यात आली आहे व एका व्यक्तीचा त्रास हा सगळ्यांचा त्रास कसा गृहीत धरला जाऊ शकतो? तेव्हा हि याचिका रद्द करण्यात यावी.

सर्व प्रकारचे दावे समजून न्यायालयाने दीक्षाभूमी वर भेट देण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांच्या विरोधातील ही याचिका अप्रासंगिक सांगून रद्द केली आहे. सदर खटला रद्द झाल्यानंतर स्पष्ट होते की संकुचित आणि एका विशिष्ट्य जातीबद्दल असलेला द्वेष दाखवणारी ही याचिका करण्यात आली होती,मात्र,हा विजय आंबेडकरी जनतेची शिस्त,अनुशासन आणि वैचारिक बुद्धीवादाचा विजय असल्याचं मत अनिकेत कुत्तरमारे, वैभव कांबळे, सिद्धांत पाटील, आशिष फुलझेले, पायल गायकवाड, आणि ऍड राहुल तेलंग यांनी यानंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com