Top Post Ad

"दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम"


  
विश्व खाद्य दिवस कृतीत बदलायला पाहिजे तेव्हाच  जगातील "उपासमारी" संपुष्टात येईल.खाद्यांन्नाची समस्या पहाता संयुक्त राष्ट्रसंघाने 16 आक्टोंबर 1945 ला "खाद्य व कृषि संघटन" ( एफएओ ) ची स्थापणा केली."कॉफ्रेस ऑफ द फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गनाइजेश"(एफएओ) ने 16 आक्टोंबर 1979 पासून "विश्व खाद्य दिवस"साजरा करण्याची घोषणा केली.तेव्हापासुन जगात "आंतरराष्ट्रीय विश्व खाद्य दिवस" साजरा केल्या जातो.या दिवसांचा उद्देश म्हणजे जगातील वाढती भुकमरीची(उपासमारी) समस्यांच्या प्रती लोकांना जागरूक करने.उपासमारी, कुपोषण व गरीबीच्या विरूद्ध संघर्षाला मजबुती प्रदान करने.उपासमारीच्या समस्येकरीता संपूर्ण जग संघर्ष करीत आहे व उपासमारी, कुपोषण यातुन बाहेर निघण्यासाठी सर्वांचा संघर्ष सुरू आहे. 

भारताची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत आहे.परंतु आजही कोट्यवधी भारतीयांची भूक भागत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.तर भारताचे एक चीत्र असेही आहे की गोडाऊनमध्ये करोडोंटन अन्न-धान्य  सडत आहे. तरीही भारतात करोडोंच्या संख्येने लोक उपाशी आहेत.याचा परिणाम म्हणजे जगात देशांची छबी मलीन होवुन बदनामी होवु शकते.विश्व खाद्य दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जगातील उपासमारी (भुकमरी) संपुष्टात आणणे.परंतु जगाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की,या कार्यक्रमाच्या इतके वर्षांनंतरही सुध्दा आजही जगातील करोडो लोकांना आम्ही दोन वेळचे जेवन सुध्दा देवु शकत नाही हे जगाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.


"अन्न हे पुर्ण ब्रम्ह" म्हटल्या जाते.कारण अन्नाशिवाय कोणीही जगु शकत नाही. मानव, जीवजंतू वन्यप्राणी जंगल संपदा यांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते.त्यामुळे अन्नाच्या नासाडीबाबत जागरूकता आवश्यक आहे.अन्न-धान्य पिकवीण्याकरीता पाण्याची आवश्यकता असते. त्याचबरोर सजीव व निर्जीव या दोन्ही घटकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.त्यामुळे अन्नाची संपूर्ण प्रक्रिया पाण्यावर अवलंबून असते. अन्न-धान्याला जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्व पाण्यालासुध्दा आहे.कारण पाणी रहाले तरच अन्नाचे उत्पादन होवु शकते.16 आक्टोंबर संपूर्ण जग "विश्र्व खाद्य दिवस"म्हणुन साजरा करतात.कारण खाद्दांनाची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे. आज जगातील प्रत्येक व्यक्ती रोजगार मीळवीण्यासाठी का धावपळ करतो?,मोल-मजुर, कामगार काम मिळावे म्हणून का धावपळ करतो? यामागे एकच उद्देश असतो "वितभर पोटाची खळगी भरणे" कारण काहीना काम मिळाले नाही तर उपाशीपोटी राहावे लागते हे सुद्धा अर्धसत्य आहे याला नाकारता येत नाही.

कोरोणा काळात जगातील अनेक देशांमध्ये उपासमारीची समस्या ओढावली. होती.कारण या काळात करोडो लोकांचा रोजगार हिरावल्या गेला होता.त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये उपासमारीची समस्या दिसून आली.या उपासमारीच्या संकटात अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले.अशाप्रकारचे उग्ररूप कोरोणा काळात दीसुन आले.जगात खाद्यांन्नाला कुठेही तडा जाऊ नये याकरिता शेतकरी वर्ग आपल्या अंगातुन घाम गाळतो व शेती पिकवितो.तेव्हाच देशासह जगातील लोकांच्या "पोटाची खळगी" भरते.म्हणुनच शेतकऱ्यांना "अन्नदाता" म्हणुन संबोधल्या जाते. शेतकऱ्यांनी जर अन्न पिकवीले नाही तर संपूर्ण जनतेवर उपाशी मरण्याची पाळी येवु शकते.परंतु मानवजातीला जिवीत ठेवण्याचे दायीत्व व जबाबदारी शेतकऱ्यांनी घेतली आहे.त्यामुळे सर्वप्रथम 16 आक्टोंबर विश्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने संपूर्ण शेतकरी बांधवांना मी "शतशत प्रणाम" करतो.

कारण उन, पाऊस,थंडी,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ, सुनामी आणि अकाल यांच्याशी संघर्ष करून शेतकरी शेतीतुन उत्पन्न काढत असतो.भारताला शेतकऱ्यांचा राजा संबोधल्या जाते म्हणजेच "कृषिप्रधान देश"परंतु गेल्या 76 वर्षांपासून आजही भारतीय शेतकरी दु:खी असल्याचे दिसून येते.कारण आजही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला सरकार कडून योग्य भाव मिळत नाही.सरकारने कृषिविधेक पास केले परंतु या विधेयकाला शेतकऱ्यांचा आताही कडाडून विरोध आहे. सरकारकडुन बाजार समिती किंवा मंडीमध्ये योग्य भावाची घोषणा केली जात नाही.त्यामुळे भारतीय शेतकरी नाराज असल्याचे दिसून येते.आज शेतकऱ्यांचा विचार केला तर मनाने व स्थावर  मालमत्तेच्या दृष्टीकोनातून करोडपती आहे.परंतु "आर्थिकदृष्ट्या कंगाल" आहे.

कारण भारतात शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम दलाल,व्यापारी व राजकीय पुढारी वर्ग नेहमीच करतांना दिसतात.आज व्यापाऱ्याजवळ, राजकीय पुढाऱ्यांजवळ चारचाकी गाडी, बंगला,सोने-नाने,चल-अचल संपत्ती व अवैध संपत्ती दिसून येते हे आले कोठून? भारतातील शेतकरी राबराब राबतो परंतु आताही त्यांच्या नशिबी "भोपळा" आल्याचे दिसून येते.कारण कोणतीही सरकार असो ती पुर्णपणे व्यापाऱ्यांच्या व पुंजीपती यांच्या पाठीशी असल्याचे गेल्या 76 वर्षांपासून आपण पहात आहोत.त्यामुळे आज शेतकरी वर्ग मागासलेला आहे.भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही भारतीय शेतकऱ्यांनी जनतेला अन्न-धान्याची कमतरता पडू दिली नाही.परंतु चीनमध्ये 1970 मध्ये भुकमरीची महाभयानक लाट आली अशा परीस्थितीत चीनजवळ खायला अन्न-धान्य नव्हते म्हणुन त्यांनी अन्न-धान्याऐवजी कुत्रे, मांजर, पाल, साप,कीडे-माकोडे व अन्य प्राणी खायला सुरुवात केली.

चीनची ही भयावह स्थिती पहाता चीन सरकारने प्रतीबंधीत प्रांण्यांना जनतेला नेहमी करीता खाण्याची परवानगी दिली.अशा कठीण परिस्थितीतुन जावुनसुध्दा आज चीन बलाढ्य देश बनला आहे.याचे संपूर्ण चीत्र आपल्याला वुहान प्रांतातुन दीसुन आले. परंतु भारतीय शेतकऱ्यांनी स्वतंत्र पुर्वकाळात व स्वतंत्र्यानंतरसुध्दा भारत वासीयांना अन्नची कमी पडु दीली नाही ही भारतीय शेतकऱ्यांची महानता आहे. परंतु सरकारच्या अन्न-धान्य साठ्याचे नियोजन गोडाऊन यांच्या कमतरतेमुळे दरवर्षी करोडो टन अन्नधान्य सडत असते आणि यातुनच उत्पन्न होते भुकमरी (उपासमारी)ची सुरुवात.आजही भारतात मेळघाट सारख्या अनेक भागात भुकमरी व कुपोषणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते असे का?याचा अभ्यास राजकीय पुढाऱ्यांनी करण्याची गरज आहे.

आज भारतात उलटी गंगा वाहतांना दीसते देशातील 60 टक्के शेतकऱ्यांकडे करोडो रुपयांची शेती आहे.परंतु आजही भारतीय शेतकरी गरीब आहे.याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे फक्त रक्त पिण्याचे काम केल्याचे दिसून येते.त्यामुळेच आज भारतात अनेक भागातील अन्नदाता शेतकरी आत्महत्यां करतांना दिसतो.कारण त्यांची संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून असते.आतातर वातावरणातील बदलाने शेतकऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत आनुण ठेवले आहे.विश्न खाद्य दिवसांच्या निमित्ताने शेतकरी सरकारला विचारते की मुठभर नगरसेवक,आजी-माजी आमदार- खासदार व मंत्री मेहनत न करता पाच वर्षांत करोडपती व अरबोपती कसेकाय होतात? राजकीय पुढारी शेतकऱ्यांपेक्षा एवढा मोठा आहे का?की त्याला गलेलठ्ठ पगार, पेन्शन,इतर भत्ते सरकार देते व शेतकऱ्यांना भोपळा देते.हे लोकशाहीच्या देशात चालत तरी काय?सर्व राजकीय पुढारी सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.समान अधिकार,समान न्याय असे खोकले आश्वासन देतात.

परंतु आजच्या परिस्थितीत राजकीय पुढारीच शेतकऱ्यांचा घात करतांना दिसत आहे.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रती जागरूकता दाखवुन विश्र्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली पाहिजे.आंतरराष्ट्री माहिती नुसार जगात "उपाश्यापोटी" झोपणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.संयुक्तराष्ट्र खाद्य आणि कृषिसंघटना नुसार 2002 च्या तुलनेत खाद्यान्नवस्तुच्या किंमतीत 140 टक्याने भारीभरकम वाढ झाली आहे.यामुळे डिसेंबर 2007 पासुन 40 देशांना खाद्यांन्न संकटाचा सामना करावा लागत होता.सध्या गेल्या 18 महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध भयावह स्थितीमध्ये आहे आणि आणि आता अचानक इजरायल विरूद्ध हमास आतंकवाद्यांचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे यात हमासच्या बाजुंनी अनेक इस्लामीक देश उडी घेण्याच्या तयारीत आहे म्हणजेच युध्दाचा भडका महाभयानक स्थितीत आहे.याचा परिणाम अन्नसाठ्यावर होवून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

"भारतीय खाद्य निगमने" स्वत: कबुल केले आहे की दरवर्षी गोदामातील 50 करोड रुपयांचा अनाज म्हणजे 10.40 लाख मीट्रिक टन पर्यंत अनाज सडतो किंवा खराब होतो.हीबाब कृषी प्रधान देशाच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर,दु:खद व चिंतेची आहे.कारण खराब होणारे अन्न-धान्य प्रत्येकवर्षी सव्वा करोड लोकांची भुक मीटवु शकते.परंतु भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेला लाखो टन अनाज सडतो आणि यामुळेच भुकमरीची समस्या उद्भवत आहे याला नाकारता येत नाही.यामुळेच भारतात करोडो लोक उपाश्यापोटी झोपतांना दीसतात.भारताची हेही समस्या आहे की सहा वर्षांखालील 47टक्के मुले कुपोषणाची शीकार होत आहे.एफएओच्या माहिती नुसार भारतात 2009 मध्ये 23 करोड 10 लाख लोक भुकमरीचा सामना करीत होते.त्यामुळे 

आजही भारतात भुकमरीची संख्या कमी न होता दीवसें-दीवस वाढतच आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.ग्लोबल हंगरच्या इंडेक्सने जारी केलेल्या 2023 च्या आकडेवारीनुसार भारताचा विश्र्व भुकमरी सुचकांकमध्ये 125 देशांच्या तुलनेत 111 वा नंबर लागतो ही बाब भारताच्या दृष्टीकोनातून अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.या उलट भारताच्या शेजारील देशांचा विचार केला तर त्यांची परिस्थिती भारतापेक्षा चांगली आहे यात पाकिस्तान- 102, बांगलादेश-81, नेपाळ-69, श्रीलंका -60 व्या स्थानावर आहे.गेल्या काही महिन्यांपासून देशातील 20 कोटी लोकांना मोफत अन्न-धान्याची "प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना"असतांना सुध्दा भुकबळीची संख्या वाढत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.भारतात सर्वेमध्ये हेही लक्षात आले की लग्नसमारंभ, महाप्रसाद व अन्य जेवणाच्या कार्यक्रमात हजारो टन खाद्यान्न वाया जाते.याला कोठेतरी रोखलेच पाहिजे.आजच्या परीस्थितीत अन्नाचा प्रत्येक कन वाचवीण्याची गरज आहे.आज अन्नाचा प्रत्येक दाना महत्वाचा आहे. तेव्हाच म्हणतात "दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम" या म्हणीची पुर्तत: होवु शकते.

आज 140 कोटी जनतेचे दायीत्व बनते की अन्नाचा प्रत्येक कण वाचवुन देशातील उपासमारी व कुपोषण यावर अंकुश लावला पाहिजे.विश्व खाद्य दिवसांच्या निमित्ताने मी 140 कोटी जनतेला विनंती करतो की "अन्नाचा एक-एक कन वाचवीण्याची नीतांत गरज आहे.कारण देशातील वाढती लोकसंख्या व जगातील युद्धजन्य परिस्थिती पहाता अन्न-धान्याचे जतन करने अत्यंत गरजेचे आहे.कारण भारतात बालकांच्या कुपोषणाची स्थिती अत्यंत वाईट आहे.त्याचप्रमाणे मी सरकारला आग्रह करतो की अन्न-धान्याचा काळाबाजार ताबडतोब रोखला पाहिजे व जमाखोरांच्या प्रती कठोर पाऊल उचलुन त्यांच्या मुसक्या आवरल्या पाहिजे.तेव्हाच विश्र्व खाद्य दिवसाला खरे महत्व येईल.संपुर्ण जग एकीकडे खाद्यांनासाठी आठा-पीटा करून वन-वन हिंडत आहे तर दुसरीकडे संपूर्ण जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन बारूदच्या ढीगाऱ्यावर बसल्याचे दिसून येते.म्हणजेच आज जगात खाद्यान्ना पेक्षा दारूगोळ्याला जास्त महत्व दील्याजात आहे.याला कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवू शकतो.याकरिता जीवन जगण्यासाठी खाद्यांनाकडे प्रत्येक देशांनी तत्परता दाखवुन उपासमारी, कुपोषण,भुकमरी याला पुर्णविराम लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजे यातच जगाचे कल्याण आहे. 

रमेश कृष्णराव लांजेवार,  नागपूर.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी ,नागपूर)
मो.नं.9921690779,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com