Top Post Ad

सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण... मंत्री आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणार


  राज्य सरकारच्या शिक्षक.  यासह सर्व जागा तसेच पोलीस दलाच्या खाजगीकरणावरून भीम आर्मी आक्रमक झाली आहे.यासंदर्भात सर्व मंत्री तसेच सत्तेतील लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी जाब विचारण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे ,शिवाय लवकरच पुणे ते मंत्रालय असा सर्वसमावेशक लाँग मार्च काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावलेला आहे.त्यातच राज्य सरकारनेही देखील आपल्या शासकीय उपक्रमात सर्वच पदांसाठी खाजगी संस्थांना कंत्राटी भरतीसाठी परवानगी दिली आहे .सरकारचा हा निर्णय म्हणजे मागच्या दराने शासनाचे खाजगीकरण असल्याची टीका भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी केला आहे.

राज्य सरकार सरकारमधील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये अद्याप आरक्षण दिलेले नाही हा विषय प्रलंबित असतानाच आता आडमार्गाने खासगीकरण सुरू केले असून या निर्णयामुळे एस सी एस टी ओबीसी व एन टी या सर्व मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या अधिकारावर  केलेले हा प्रहार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात काल सोलापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वर झालेली शाई फेक हा सरकारच्या धोरणाविरोधातील नाराजी असून यापुढे जिल्ह्याजिल्ह्यात भीम आर्मीचे कार्यकर्ते जिल्ह्यातील मंत्री सत्तेतील खासदार व आमदार यांच्या कार्यालयावर निवेदन देवून हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन करणार आहेत. शिवाय राज्य सरकारने हा निर्णय रद्द करावा यासाठी लवकरच  पुणे ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्याचे नियोजन असून या विषयावर सहमती असलेल्या सर्व संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे.

 राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा या मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी मुंबई भीम आर्मी च्या वतीने  येत्या बुधवारी भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा अशी भूमिका घ्यावी असे यावेळी आमदार कदम यांना पत्र देवून सांगण्यात येणार असल्याचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com