राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. अशा स्थितीत सदावर्तेंनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या वक्तव्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीवर आता कॉंग्रेसने प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासंदर्भात गुणरत्ने सदावर्ते काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण म्हणजे शरद पवारांचे राजकारण आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी सदावर्तेंवर टीका केली. यामुळे या आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग प्राप्त झाला. याआधी सदावर्तेंनी एसटी आंदोलकांच्या संपाच्या मुद्द्यावरुनही वक्तव्य केले होते. हेच अनुकरण आता सदावर्तेंनी सुरू असलेल्या मराठा आंदोलनात केले आहे. यावर आता सदावर्तेंनी काही वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. अशा आशयाचे वक्तव्य केले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण का टिकले नाही. सर्वोच्च न्यायालायत मराठा आरक्षणाविरोधात लढणारे कोण याचे सर्व संदर्भ सदावर्तेंना लागू होत आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट कॉंग्रेसने केला आहे. ट्वीट करत कॉंग्रेसने २०२१ या वर्षात सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला माझा नेहमी विरोध असेल, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर बीबीसी मराठीने बातमी केली होती. त्याच बातमीचा स्क्रीनशॉट काढून कॉंग्रेसने सदावर्तेंवर टीका केली.
- मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणाऱ्या कोण?
- उत्तरः जयश्री पाटील
- जयश्री पाटील कोणाच्या पत्नी आहेत?
- उत्तरः गुणरत्न सदावर्ते
- गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे?
- उत्तरः एका उपमुख्यमंत्र्यांचा
- मराठा आरक्षणाचा छुपा मारेकरी कोण?
- उत्तरः शहाणा असेल त्याला वरील तीन प्रश्नांच्या उत्तरातून बरोबर कळेल,
असे ट्वीट करत कॉंग्रेसने सदावर्तेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी गावात पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. सरकारने मराठा आरक्षणाबाबत ४० दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. अजूनही सरकार यावर पाऊल उचलत नाही. म्हणून जरांगे-पाटील उपोषण आंदोलन सुरु केले मात्र त्यापूर्वी आंदोलन मागे घेण्याबाबत भाजपचे नेते गिरीष महाजनांनी जरांगेंना फोनवर साद घातली. मात्र जरांगेंनी उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. आपण दोन दिवसात गुन्हा मागे घेणार होता. ते अजून मागे घेतले नाहीत. तुम्ही आरक्षण देणार काय देणार? असा प्रतिसवाल करीत जरांगेंनी आपले उपोषण सुरु केले आहे..
मनोज जरांगे-पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद
- गिरीश महाजन – आमचं काम सुरू आहे. आम्ही काम करणारच आहोत. आरक्षण देणारच आहोत. मागच्यावेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. चांगला मार्ग मिळत असेल तर वेळही दिला पाहीजे.
- जरांगे-पाटील – तुम्ही एक महिना मागितला, आम्ही ४० दिवस दिले. अजून किती वेळ देऊ?
- गिरीश महाजन – शिंदे समिती काम करत आहे. यावर मार्ग निघेल.
- जरांगे-पाटील – ते वर्षानुवर्षे काम करतील. आम्ही काय फाश्या घ्याव्यात का? गुन्हे मागे घ्या म्हटलं तर मागे घेत नाहीत. आरक्षण काय देणार?
- गिरीश महाजन – ते काम लगेच होईल. आपल्या हातचं काम आहे. आंदोलकांना पोलीस ठाण्यात, कोर्टात बोलावले नाही.
- जरांगे-पाटील – २ दिवसांत गुन्हे मागे घेतो म्हणून सांगितले होते.
- गिरीश महाजन – २ दिवसांत गुन्हे मागे घेता येत नाही. काही तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्या लागतात.
- जरांगे-पाटील – आमच्यावर डाव ठेवला आहे
- गिरीश महाजन – नाही तसं नाही, सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
- जरांगे-पाटील – १६ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने साधी सहानुभूती दाखवली नाही. ४० दिवसांत सरकारनं काय केलं? २ दिवसांत गुन्हे मागे घेतो सांगितलं ते अजून केलेलं नाही. म्हणजे आम्ही आंदोलन केलं की गुन्हे बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे.
- गिरीश महाजन – तसं नाही, हे सर्व लवकर केले जाईल.
महाजन यांनी बराच वेळ जरांगे पाटील यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तरीही जरांगे-पाटील यांनी अखेर सरकारचा मान राखतो, मुख्यमंत्र्यांचा मान राखतो पण उपोषण सुरूच राहणार, असे सांगत महाजनांना धन्यवाद म्हटले आणि संभाषणाला पूर्णविराम दिला.
मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. पण १ सप्टेंबर रोजी पोलिसांंनी उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर लाठीमार केला आणि अंतरवाली सराटी गाव संपूर्ण भारताला ठावूक झाले. यामागे संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांचा हात होता असे काही संघटनांनी जाहीर करूनही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र त्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळले. जरांगे-पाटील उपोषणावर ठाम राहिले. अखेर १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी सरकारने मागितलेल्या एक महिन्याच्या मुदतीत आणखी दहा दिवस दिले. त्यानंतर कसूभरही मागे हटणार नाही, हेही स्पष्ट केले. या ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात सरकारने मुदतवाढ मागितली आणि जरांगे-पाटील आक्रमक झाले. त्यांना जाहीर केल्याप्रमाणे २५ ऑक्टोबर अंतरवाली सराटी गावात पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
शरीरात रक्ताचा एक थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी काम करणार, कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देणार, मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही वाट्याचं काढून घेणार नाही, मराठा समाजाला न्याय देणार. मराठा समाजाला आरक्षण देताना सर्वच समाज घटकाला न्याय कसा मिळेल हे पाहिले जाईल, मराठा समाजाला निश्चितच आरक्षण दिले जाईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (दसरा मेळावा:मुंबई आझाद मैदान)
0 टिप्पण्या