Top Post Ad

मला कोणीही अन्धभक्त नको आहे

 


 ज्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी या देशाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला आहे. त्यांना हे माहित असेल की भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रसाराचे अधिक श्रेय  “नाग’ लोकांकडे जाते. नागलोक हे आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्य व अनार्य (नाग लोक) यांच्यात आपापसात नेहमीच छोटी मोठी युद्धे होत असत. आर्यलोक नागलोकांचा समुळ नाश करण्याची इच्छा बाळगून होते. या संदर्भात बऱ्याच पुराणकथा आहेत जसे अर्जुनाने नागांना जिवंत जाळले होते. अगस्त ऋषीने सर्प या नागाची रक्षा केली होती त्याच वंशाचे आपण सर्वजण आहोत. या नागांना कपटाने अस्पृश्य बनविले गेले. या अवस्थेतून उठण्यासाठी त्यांना एका महापुरुषाची आवश्यकता होती. त्यांना तो महापुरुष भगवान बुद्धांच्या रुपात मिळाला. नाग लोकांनीच संपूर्ण भारतात बौद्धधम्माचा प्रचार व प्रसार केला. आपण  सर्वजण नागांची मुले म्हणजेच  नागवंशीय आहोत. वीर नागांची प्रमुख जनसंख्या नागपुरात होती, यामुळेच या स्थळाला नागपूर असे नाव पडले. नागपुर पासून 27 मैल अंतरावर नागनदी आहे. या सर्व गोष्टींवरुन हे सिद्ध होते की या नदीच्या आसपास नागांची जनसंख्या जास्त आहे. नागपुर या शहराला निवडण्यामागचे हेच एकमेव कारण आहे.  यामागे दुसरे कुठलेही कारण नाही, तरी या संदर्भात कोणाचीही कुठलीही गैरसमजूत होऊ नये. दुसऱया कारणासाठी स्वंयसेवक संघाचा विरोध संभव आहे. परंतु या स्थानाला निवडण्यामागे दुसऱयाला चिडवण्याचा कुठलाही उद्देश नाही. 

मला कोणीही अन्धभक्त नको आहे. ज्या लोकांना बौद्धधम्मात यायचं आहे त्यांनी संपूर्ण विचार करुन बौद्धधम्माचा स्विकार करावा. ज्यायोगे ते या धम्माचे कट्टर अनुयायी होतील. मनुष्यमात्राच्या प्रगतीसाठी धर्माची आवश्यकता असते. मला हे चांगल्याप्रकारे माहित आहे की कार्लमार्क्सच्या सिद्धांतानुसार एक नवे मत झाले आहे. त्याच्या कथनानुसार धर्मामध्ये काहीही नाही. त्यांच्यासाठी धर्माचे काहीही महत्व नाही. त्यांचा धर्म केवळ असा आहे की सकाळी नाष्ट्यासाठी लोणी लावलेला टोस्ट खाणे, दुपारी स्वादिष्ट भोजन खाणे, झोपण्यासाठी मखमली बिछाना व पाहण्यासाठी सिनेमा असं त्याचं तत्वज्ञान आहे. मला अस तत्वज्ञान पटत नाही. माझ्या वडिलांच्या दारिद्री अवस्थेमुळे मला असलं कुठलही सुख प्राप्त झाले नाही. माझ्या आयुष्यात जितके कष्ट यातना मी सोसल्या आहेत. तेवढं कुणीही सोसलं नसेल. म्हणूनच गरीबांचे जीवन किती कष्टप्रद असते याचा मला अनुभव आहे. आर्थिक बाजू समोर ठेवूनच आमचे आंदोलन सुरु आहे. आणि म्हणूनच मी आजपर्यंत आपल्या लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी संघर्ष करीत आहे. फक्त एवढंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीची आर्थिक प्रगती झाली पाहीजे.  

बंधुनो आणि भगिनींनो जे मला सांगायचे होते ते सर्व मी सांगितले आहे. हा धम्म सर्वात चांगला धम्म आहे. या धम्मात कोणताही दोष नाही. हिंदुधर्मात अशी काही तत्वे आहेत, ज्यामुळे कोणालाही उत्साह मिळत नाही. हजारो वर्षापासून आपल्या समाजातील कोणालाही विद्वान बनु दिले नाही. 

वैचारिक दृष्ट्या देशातील कोणत्याही वाईट रुढीला विरोध करणे मला कठीण नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय व ब्राम्हणांनी जो जातीसंस्थेचा पर्वत उभा केला आहे. तो जातीसंस्थेचा पर्वत कोणत्या प्रकारे उलटा करायचा किंवा तोडायचा हा एक वास्तविक प्रश्न आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं की या धम्माचे पूर्ण ज्ञान तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे आणि या कार्यासाठी मी पुस्तक लिहून तुमच्या सर्व शंका दुर करुन तुम्हाला बौद्धधम्माचे पुर्ण ज्ञान देणार आहे. आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा. 

आता तुमच्यावर बरीच मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ही बरीच मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला असे काम करावे लागेल ज्यायोगे सर्वजण तुमचा आदर करतील. तुम्ही या धम्माचा स्विकारुन असं समजू नये की आपण गळ्यात एक मातीचे मडके बांधून घेत आहोत. बौद्धधम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ओसाड जंगलासारखी आहे आणि म्हणूनच तुम्ही या शुन्यवत पवित्र धम्माचे उत्तम रितीने पालन करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. नाहीतर या धर्म परिवर्तनाची निंदा होईल आज तुम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करा की बौद्ध धम्म स्विकारुन तुम्ही फक्त स्वतचे नव्हे तर स्वतबरोबर या देशाचे आणि याबरोबर साऱ्या जगाचा उद्धार करायचा आहे. जगाचा उद्धार बौद्धधम्मामुळेच होऊ शकतो. जगात जोपर्यंत न्यायाला योग्य स्थान मिळत नाही तोपर्यंत जगात शांतता नादु शकत नाही.  

हे नविन कार्य खुपच जबाबदारीचे आहे. हे कार्य पुर्ण करण्यासाठी आपण दृढ संकल्प केला पाहिजे. आमच्या तरुणांना बरच काही करायचं आहे. या गोष्टी तुम्ही पुर्णपणे लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुम्ही फक्त पोटाचे पाईक बनु नका. तुम्ही कमीत कमी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा या पवित्र धम्मकार्यासाठी देण्याचा निश्चय करा. मला तुम्हा सर्वांना माझ्याबरोबर घेऊन जायचे आहे. तथागतांनी पहिल्यांदा फक्त थोड्याच व्यक्तींना धम्माची दीक्षा दिली व त्यांना आदेश दिला की या पवित्र धम्माचा प्रचार  करा. त्यानंतर यश नावाचा एक विद्वान आणि त्याबरोबर 40 व्यक्तींनी धम्माची दीक्षा घेतली. यश् सुद्धा एका श्रीमंत  घराण्यातील मुलगा   होता.  त्यांना भगवान बुद्ध म्हणाले की हा धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकम्पाय आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यवसान कल्याणं अर्थात बहुजनांच्या हितासाठी आहे. बहुजनांच्या सुखासाठी आहे. आणि सर्व लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आहे. हा आदि, मध्य आणि अन्ती कल्याणकारक आहे. भगवंतांनी परिस्थितीनुसार धम्मप्रचाराची वेगवेगळी पद्धत सांगितली आणि आम्हालाही वेळेनुसार ह्या धम्माची दीक्षा स्वत घ्यायला हवी. या गोष्टींची मी घोषणा करतो की बौद्धधम्माची अनुयायी असणारी प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला त्रिसरण पचंशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन बौद्धधम्माची दीक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
१९५६ अशोक विजयादशमी दिनी धम्मदिक्षेवेळी केलेल्या भाषणातील काही भाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com